पाळीव प्राण्यांना स्वच्छतेच्या सवयी कशा लावाव्यात?

Submitted by गायत्री१३ on 30 September, 2013 - 01:43

मांजराचं छोटं पिल्लू या आठवड्यात घरी आणणार आहे. तर
- त्याला स्वच्छतेच्या सवयी उदा. शी-शू करण्याबद्दल, स्वयंपाकघरात/ओट्यावर जायचं नाही इ. कशा लावाव्यात?
- घरी छोटी मुलगी आहे, तिच्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागेल का?

कोणाचे काय अनुभव आहेत ते वाचायला आवडेल. त्यातून बरंच शिकायला मिळेल अशी खात्री आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मांजराला शिस्त लावणे तसे बरेच अवघड असते
त्याला स्वच्छतेच्या सवयी उदा. शी-शू करण्याबद्दल <<< या बाबतीत मांजर तसे हुशार असते, या गोष्टीसाठी घराच्या बाहेर बागेत / आंगणात करतात आणि केल्यावर त्यावर माती पसरवून टाकतात,

घरी छोटी मुलगी आहे, तिच्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागेल का?<< मुलगी किती वयाची आहे ?? मांजराचे केस त्रासदायक असतात

>>>> मांजराचं छोटं पिल्लू या आठवड्यात घरी आणणार आहे. <<< Uhoh
अहो कशाला आणताय? काय गरज आहे?

मांजर खरे तर वरकरणी तरी अतिशय स्वच्छ प्राणी, मात्र जर त्याची वाढ आईविना होत असेल, तर त्यास नेमक्या सवई लावणे महाकर्मकठीण, व त्याचे दृष्टीने उपयुक्त जागी जसे की टेबल्/कॉट/सोफा इत्यादी खाली मलमूत्रविसर्जन करणे हे पुन्हा त्याचे दृष्टीने स्वच्छ असले तरी आपल्या दृष्टीने अतिशय अवघड होते. मांजराच्या व एकूणच प्राण्यांच्या मलमूत्राचा वास भयानक तीव्र सहन होण्यापलिकडचा असतो, व त्याने कुठे शीशू केली आहे ते अक्षरषः हुंगत फिरत शोधुन काढणे व नन्तर स्वच्छ करणे हे महादिव्य असते.
शिवाय घरात लहान मूल असेल, तर आधीपासून पाळलेले सवईचे जनावर सोडून अन्य कोणताही प्राणी नव्याने घरात आणू नये/येऊही देऊ नये, असे निदान माझे तरी मत आहे.
बाळाचे अंगाकपड्यास तेल/दुधातुपाचा वास रहात असतो व प्राण्यातील पिल्लास त्याचा फरक कळला नाही तर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो.
हा भाग झाला पाळीव प्राण्याबाबत, मात्र वरील कारणानेच, मुंगी/डोंगळे/झुरळे इत्यादीसहीत चिचुन्द्र्या/घुशी/उंदिर्/पक्षी इत्यादी अनेक बाबीपासून बाळास जपावे लागते.
तेव्हा जे काय करायचे ते विचारपूर्वक, व बाळाचे संगतीत चौविस तास हजर रहाणारी व्यक्ति असेल तरच करा.

मला प्राणि अतिशय आवडतात, तरीही वरील मजकुर लिहीला असे.

धन्यवाद Happy
स_सा,
मुलगी ७ वर्षांची आहे.

जाई, बागुलबुवा यांना नक्की संपर्क करते.

पिल्लु बर्‍याचदा लहान असल्याने खुप त्रास देते शी/सू तर अंथरुणातही करते. त्याचा वास भयानक असतो. शिवाय बोक्यापासुन बरेच जपावे लागते. घरी मायलेकी आहेत फक्त दूध टाकतो २ टाईम घरात घेत नाही. स्वच्छता बाहेरच्या बाहेर करता. सकाळी ६ ला दूध प्याल्या नंतर बरोबर सायंकाळी ४ पासुन पुन्हा मॅव मॅव सुरु

घरात लहान मांजर आणणार असाल तर कोणत्याही एका कोपर्‍यात पसरट मातीच्या भांड्यात माती पसरून ठेवावी, (शक्यतो बाल्कनीत) आणि पिल्लू शी करायला लागलं की लग्गेच उचलून त्यात ठेवावं. त्याला आपोआप सवय लागते. बाकी लहान बाळं फार उत्सुक असतात खेळायला त्यामुळे नखं लागणे आणि चावणे हे प्रकार होऊ शकाअत.

दक्षिणाताईने सांगितलेला उपाय हमखास लागू होतो.

लहान पिल्लू असेल तर ओट्यावर वगैरे आत्ता चढणार नाही. सोफा वगैरे ठिकाणी उचलून ठेवणे टाळा. एकदा सवय लागली की सुटत नाही त्यांची. समजा चढलंच कुठे तर चांगला फटका मारा. हळूहळू शिकतात. त्याच्या त्या पसरट मातीच्या भांड्याजवळ त्याची झोपायची व्यवस्था करा.

आणि महत्वाचं, मुलीला सवय लावा फार हात न लावायची. या वयात मुलांना फार खेळावंसं वाटतं मऊ मऊ मांजरांशी, आणि त्यांची खेळायची कल्पना म्हणजे अक्षरशः त्यांना कुस्करणे ही असते. मोठी मांजर असेल तर सहन करते लहान मुलांचं असं वागणं. पण पिल्लू घाबरतं आणि बिथरतं. मग बोचकारणं वगैरे प्रकार होतात.

आणि पिल्लू जास्त अंगाखांद्यावर नकोच. मग ती बारकुडी होतात आणि केस गळू लागतात त्यांचे.

कुठलाही पाळीव प्राणी घरी आणण्याआधी
- घरातील सर्व सदस्यांना मान्य असणे आवश्यक असते. कुठलाही प्राणी घरी आणला की स्वच्छता पूर्वीसारखी रहात नाही. इकडे तिकडे प्राण्यांचे केस पडतात. लहान असताना ते इकडेतिकडे शूशी करत रहातात, ते सगळं डिसइन्फेक्टन्टने साफ करत रहावं लागतं. ते तापदायक वाटू शकतं
- त्या प्राण्याची जबाबदारी असते. दुखलं, खुपलं, आजारी पडलं हे ते सांगू शकत नाहीत. तेव्हा आसपासचा चांगलासा व्हेट माहित करून घेणं गरजेचं असतं.
- व्हेटला विचारून दरवर्षी, काही महिन्यांनी वगैरे प्राण्यांना काही इन्जेक्शन्स द्यावी लागतात ती विचारून घेणं.

मांजरासाठी -
- आपल्याकडे मांजरं घरी पाळली तरी बराचसा वेळ बाहेर भटकण्यात घालवतात. त्यांना हवं तेव्हा घरी येतात (खायला, झोपायला, इ). तेव्हा आपण घरात नसलो तरी त्या मांजराला सहज येजा करता येईल अशी खिडकी वगैरेची सोय असलेली बरी पडते. अपार्टमेन्टमधे वरच्या मजल्यावर रहात असाल तर हे जास्तच लागू पडतं. शिवाय शेजार्‍यापाजार्‍यांना त्रास होऊ शकतो/ त्यांना नावड असू शकते
- त्यांच्या भटकण्यामुळे घरात कुठलेकुठले जंतू/विषाणू येतात त्याची गणती अशक्य आहे. त्यामुळे घरच्या मांजरांनी ओचकारलं तर लगेच डॉक्टरला विचारून अ‍ॅन्टीरेबीज डोस घ्यावा (सध्या WHO च्या म्हणण्यानुसार भारत हा अतिशय रेबीजप्रोन देशांमधे मोडतो आणी मांजरं हीपण त्याची प्रमुख कॅरीअर्स आहेत - इति आमचे फॅमिली डॉक्टर)
- जिथे मांजराने जाऊ नये, बसू नये असं वाटतं तिथे त्यांना पहिल्यापासूनच मज्जाव करावा. उदा: स्वैपाकघर, बेडरूम/बिछाना.
- त्यांच्या खाण्यापिण्यासाठीची जागा पहिल्यापासूनच ठरवून द्यावी व तिथेच वाट्या/बशी ठेवावी (थर्माकोलचे छोटे बोल्स/वाट्या मिळतात ते सगळ्यात उत्तम. स्वच्छ ठेवायची कटकट नाही. दर दोनतीन दिवसांनी/आवश्यकतेनुसार बदलावे). प्यायच्या पाण्यासाठीही सोय करावी.
- जे चालणार नाही असं वागल्यावर (मज्जाव असलेल्या ठिकाणी जाणे, खाद्यपदार्थांना तोंड लावायला जाणे, इ.) ओरडावं किंवा एक चापट मारावी. त्यांना आवाजाच्या टोनवरून हळूहळू लक्षात येतं की ते करतात ते 'अ‍ॅक्सेप्टेड' आहे का नाही. सहसा वेळच्यावेळी खायलाप्यायला मिळालं, त्यांच्या डिशमधेच, की चोर्‍या करत नाहीत.

एवढं करूनही मांजर प्रत्येक वेळेला शिस्तीने वागेलच याची गॅरंटी नाही. पण कुत्र्याएवढं मांजराचं सहसा काही करावं लागत नाही (ते आजारीच पडलं तर गोष्ट वेगळी). आणि थोडीशी अस्वच्छता आणि गैरसोय सोसायची तयारी असेल तर आवर्जून घरात पाळीव प्राणी असू द्यावा असं वाटतं. अतिशय उत्तम स्ट्रेसबस्टर असतो. स्वानुभव Happy

दक्षिणा, मांजरांची शू, शी, उलटी, व्यवस्थित इन्फेक्शस असते गं.. डेटॉल, फिनाईल, गरम पाणी वगैरेने साफ करायला लागतं आणि सफाईची फडकी डायरेक्ट फेकून द्यायची प्लॅस्टिकच्या बॅगमधे घालून...

शिवाय मांजरं त्यांच्या शूशीचा वास कुठे येत असेल तिथेच परत शू-शी करतात. तेव्हा तो वास घालवणं हेही ते डिसइन्फेक्ट करण्याबरोबरच महत्वाचं.
जर बोका असेल तर मोठा झाल्यावर कुत्र्यासारखंच टेरिटरी मार्किंग करायला सगळीकडे थोडी थोडी शू करतो - अगदी घरातही.. तेव्हा कसून लक्ष ठेवून ओरडून ती सवय कमी करायला लागते.

आमच्याकडे कोल्हापूरला मांजरी होती आणि तिला दर ३ महिन्यांनी ३-४ पिल्लं होत असत. ती मोठी झाली की २ कुणीतरी घेऊन जात पण एक रहात असे. असं करत करत एक काळ असा होता की आमच्या घरी ९ मांजरं होती. शीचा त्रास अगदी एकदा दोनदा झाला, पण शू करण्याचे (टेरिटरी मार्किंग साठी वगैरे) पाहण्यात आले नाही. उलटी तर आमच्या मावडीने कधीच घरात केली नाही. मांजरं मोस्टली घराबाहेरच असतात घरी अगदी कमी....

दक्षिणा, आई मांजर पिल्लाला बाहेर शी-शू करायचं, ट्रेनिंग देते पण आईविना पिल्लू असलं की ते आपल्याला द्यावं लागतं...
आमच्याकडे इथे अनेक मांजरं पाळून झालीत. सध्याही आमच्या घरी बोका आहे. तो लहान असतानाच त्याची आई निघून गेली (आधीचा एक होता त्याचीही तीच कथा.. ). त्यामुळे ही सगळी तापत्रयं आम्हालाच करावी लागली - अगदी आजारपण काढण्यापासून. तसंच आमच्या घरातल्या इतर सदस्यांना विविध प्राणी, पक्षी पाळायचा जबरा अनुभव आहे. त्यातून बाहेर पडलेले हे ज्ञानकण आहेत Proud

मात्र जर त्याची वाढ आईविना होत असेल, तर त्यास नेमक्या सवई लावणे महाकर्मकठीण,>>>>> आईबरोबर मोठी होताना घाण वगैरेचा त्रास अजिबात नसतो, आई बरोबर शिकवते त्यांना, अगदी उंदीर मारुन आणला असेल तरीदेखिल घाण करण्याची शक्यता खुप कमी. पण त्याला आई नसेल तर शब्दशः महाकर्मकठीण.

घरात लहान मांजर आणणार असाल तर कोणत्याही एका कोपर्‍यात पसरट मातीच्या भांड्यात माती पसरून ठेवावी, (शक्यतो बाल्कनीत) आणि पिल्लू शी करायला लागलं की लग्गेच उचलून त्यात ठेवावं. त्याला आपोआप सवय लागते +१००००००

प्राण्यांच्या मलमूत्राचा वास भयानक तीव्र सहन होण्यापलिकडचा असतो >>> इतका वास तीव्र असतो तर हुंगत कशाला फिरावं लागणार आहे शी-शू काढायला?

वरदाने बहुतेक सगळी माहिती दिलीच आहे. मांजराची शी प्रेगनन्ट बाईस हानीकारक असते असे ऐकले, वाचले आहे. तेव्हा घरात कुणी प्रेग असल्यास त्यांनी सांभाळून राहावे. बाकी मांजरं जात्याच हुशार असतात. त्यांना पटापट सवयी लागतात.

स_सा | 30 September, 2013 - 11:32 नवीन

मांजराला शिस्त लावणे तसे बरेच अवघड असते<<<

मांजराला शिस्त लावणे अवघड असते हे ससा सांगतोय. काय दिवस आलेत.

Rofl

ससा.:दिवा:

कुत्रा आणा. त्याला बाहेर नेता येते. शू शी करायला. तरीही आपण थकले असताना किंवा नको त्या जागी ते घाण क रू शकतात. उगीच मुलाच्या हौसेसाठी पेट आणायचे आणि मग जमले नाही तर टा कून द्यायचे असे हो णार असेल तर त्या प्राण्याव् र अन्याय करू नये. खूप धीराने ट्रेन करायला लागते. स्नूटी बायका काय ग बै ही कुत्री जिथे तिथे घाण क रतात असे तु. क टाकतात त्याची तयारी ठेवावी.

मानसिक तया री असल्या शिवाय पेट आणू नका.

अश्विनीमामी | 30 September, 2013 - 20:36 नवीन

कुत्रा आणा. त्याला बाहेर नेता येते. शू शी करायला<<<

एखाद्या प्रस्तावात मुळापासून दुरुस्त्या सुचवणे हे मला फक्त महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील कार्य वाटायचे. आंध्रमध्येही तेच?

एखाद्या प्रस्तावात मुळापासून दुरुस्त्या सुचवणे हे मला फक्त महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीतील कार्य वाटायचे. >> बेफी आज काय एकदम सुसाट Wink

पण वळण लावायला त्यांच्या आई ला कसा ठेवणार>>> काय राव आई नाही झाली म्हणुन काय झाले? मावशी असेल ना? ती लावेल छान छान सवयी... हाकानाका Wink

Pages