पाळीव प्राण्यांना स्वच्छतेच्या सवयी कशा लावाव्यात?

Submitted by गायत्री१३ on 30 September, 2013 - 01:43

मांजराचं छोटं पिल्लू या आठवड्यात घरी आणणार आहे. तर
- त्याला स्वच्छतेच्या सवयी उदा. शी-शू करण्याबद्दल, स्वयंपाकघरात/ओट्यावर जायचं नाही इ. कशा लावाव्यात?
- घरी छोटी मुलगी आहे, तिच्यासाठी काही विशेष काळजी घ्यावी लागेल का?

कोणाचे काय अनुभव आहेत ते वाचायला आवडेल. त्यातून बरंच शिकायला मिळेल अशी खात्री आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>कुत्र्याने फिरायला नेल्यावर रस्त्यात शी केली तर मालक साफ करतात का?
भारतात?>>> काहीही काय साती!! त्यासाठीच तर त्याला बाहेर न्यायचे. Wink

पण ऑन सीरिअस नोट मी १-२ अपवाद वगळता भारतात तरी हे पाहिलं नाहीये. निदान १० वर्षांपूर्वी. आता माहीत नाही.

मांजराचे पिल्लू बहूदा सकाळी एखाद्या कोप-यात जाऊन किंवा अडचणीच्या जागेत शी करते तेव्हा लक्ष ठेवावे. त्याच्यासमोर शी साफ करावी वास राहू देऊ नये. बाथरूममध्ये नेऊन त्याच्या पायाखालून पाणी वाहू द्यावे हे एकदोनदा केल्यास त्याला बाथरूममध्ये शी शू करायची सवय लागेल. बाल्क्नीमध्ये मातीचे भांडे ठेवण्याचा उपाय चांगला आहे पण दर दोन तीन दिवसांनी माती बदलणे आवश्यक. मांजराचे पिल्लू तेच मातीचे पाय घेऊन घरभर फिरू शकते. काही गोष्टी मांजर ऐकत नाही, तुम्ही चापटी दिलीत तरी तुमच्या नकळत ते ती करणारच !
शी शू पेक्षा धोकादायक म्हणजे पिसवा, त्या होऊ देऊ नका.

मुंबईत तरी कुत्रेचालकाने कुत्र्याची घाण साफ न केल्यास फाइन पडते. जुहू बांद्रा साइडला जास्त वसूल करतात असे वाचले आहे. मी तरी माझ्या कुत्र्यांच्या मागून साफ करते. ह्यासारखे आत्मविश्वास घालविणारे काम दुसरे नसावे. अर्थात त्यामुळे जबाबदारी समजते. आमच्या इथे काही लेव्हलस वर कुत्रे चालवायला परवानगे नाही कारण हिरवळीवर म्हातारे, मुले इत्यादी खेळतात.

एकूणच घराची स्वच्छता एक नॉच डाउन होते पाळीव प्राणी असले कि. चिकन वगैरे लांब कु ठे तरी बसून खातात मग ते तुकडे साफ करा! शिवाय घर भर केस पडतात वास येतात इत्यादी. पण एकट्या लहा न मुलास किंवा म्हातार्‍या माणसास सोबत म्हणून आणि उत्तम कंपॅनिअन म्हणून पेट सारखे कोणी नाही. मुलांची वाढ निकोप होण्यास मदत होते. पण हे स्वच्छता व्गैरे काम घरच्या मोठ्यांनाच करावे लागते.

आपल्या उश्या चादरी हे लोक्स फाडतात. बुटेचपला चावून ठेवतात. डॉग मेस असा गूगल सर्च केला तरी
सापडेल. केनेल चा ,,, अन्नाचा इ खर्च आहे हे सर्व खरे आहे. किटी चे मला एवढा अनुभव नाही

>>> इतका वास तीव्र असतो तर हुंगत कशाला फिरावं लागणार आहे शी-शू काढायला? <<<
कारण तीव्र वास खोलीभर पसरतो अन त्यामुळे नेमके उगम स्थान सापडत नाही त्यामुळे तीव्र वासात अधिकतम तीव्र वास कुठुन येतोय हे समजुन घ्यायला हुंगतच फिरावे लागते. असो.

पण ऑन सीरिअस नोट मी १-२ अपवाद वगळता भारतात तरी हे पाहिलं नाहीये. निदान १० वर्षांपूर्वी. आता माहीत नाही.
अजूनही नाही कोणी काढत. आमच्या समोर तर great Den आहे . कोणताही सवय त्या कुत्र्याला लावलेली नाही

हो. संध्याकाळी मरीन ड्राईववर कुत्रे फिरवणारे पण आरामात कुत्र्याला कुठेही शी शू करू देत असलेले पाहिले होते.

आमच्याकडे पण ग्रेट डेन आणि जर्मन शेफर्डचे क्रॉस ब्रीड आहे. तिला सवयी लावायचा खुप प्रयत्न करतात सासरे.. पण फार थोड्या सवयी तिने लाऊन घेतल्या आहेत स्वतःला Happy

वरदाची पोस्ट अतिशय उत्तम... (अनेक प्रॅक्टिकल सूचना/ काळजीही छान सांगितली आहे)

Toxoplasma gondii, the cause of toxoplasmosis, is a parasite that is frequently found in cats. It can infect people as well and can be quite serious under certain circumstances, particularly for a pregnant woman and her fetus. Toxoplasma is also a protozoan parasite and not a worm. Pregnant women can take precautions to protect their unborn baby from this disease, however.
(http://vetmedicine.about.com/od/diseasesandconditions/tp/FelineParasites... येथून साभार)
माझ्या ओळखीतली एक मुलगी आहे जिला हा त्रास (toxoplasmosis) प्रचंड झालेला होता. डॉ.नी तिला मांजरांना हातही लावयचा नाही अशी सक्त ताकीद दिलेली आहे.

रेबीजकरता देखील काळजी घेणे अतिशय आवश्यक (मांजराला अँटी रेबीज लस देणे अतिशय गरजेचे)

वरदाची पोस्ट उत्तम. मांजरी असेल तर तिचे ऑपरेशन करून घ्या म्हणजे पिल्ले होणार नाहीत. हे क्रूर वाटेल पण बहुसंख्य पाश्चात्य देशात कुत्र्यांचे (मांजरांबद्दलचे नियम नाही माहिती) ऑपरेशन करतात.

मांजराच्या केसांची अ‍ॅलर्जी बर्‍याच लोकांना असते. तुमच्या मुलीची/घरातल्यांची आधी टेस्ट करून घ्या. जर अ‍ॅलर्जी असेल तर फार त्रास होतो (स्वानुभव!).

आणखी एक सल्ला - पिल्लू लहान आहे तोवर जमलं तर पाण्याची सवय लावा. म्हणजे नंतर अधून मधून ओला टॉवेल आणि थोडा डेटॉल, माईल्ड शॅम्पू यांनी घासपूस करायला बरं पडतं. नाहीतर दुनियेभरच्या धुळीत, घाणीत लोळून ती मांजरं घरात जिथेतिथे पसरतात..

लिम्ब्या सिंडी लिम्ब्या जुगलबन्दी आवडली. बोचकारे फक्त मा.न्जरेच काढतात असे नाही Happy

कुत्र्याने फिरायला नेल्यावर रस्त्यात शी केली तर मालक साफ करतात का?
भारतात?
>>>

हीहीही साती अहो आपले कुत्रे बाहेर काढून शेजारच्याच्या कम्पाउन्डाजवळ 'बसवायचे ' असते ! कुत्री अशी बिलन्दर की त्यानाही शिंचे आपले आणि शेजारचे कम्पाऊन्द असा भेद कळतो....::फिदी:

रॉ Lol Rofl

बर्‍याच देशांत मांजरांचे डि क्लोइन्ग ऑपरेशन ही करतात . म्हणजे त्यांची नखे काढून टाकतात. हे अतिशय पेनफूल ऑपरेशन असते व त्याची गरज नाही. मांजरांना नखा ची गरज असते व ती काढून टाकल्यास ती हतबल व दु:खी होतात. तसेच कुत्र्यांचे स्वरयंत्र काढून टाकतात. या दोनही च्या विरोधात माझे एक फेसबुक पेज आहे

वरदाची पोस्टे सर्व छान आणि बरोबर आहेत. ते दुनिया भरची घाण बद्दल अगदी अगदी. पेट स ना हाताळल्याव र डेटॉल हँडवॉ श ने हात धुवायची सवय पण मुलांना लावावी लाग ते. स्वच्छ पुसलेल्या जमिनीवरून ते पाया चे ठ से उमटवत जातात. ह्या सर्वांची सवय होते नंतर.

इइइइइइइइइइइइइइइइ मांजर इइइइइइइइइइइइइइइइइइ कुत्रा पब्लिक घरी आल्यास वां धे होउ शकतात. काही लोकांना पेट अ‍ॅलर्जी असते. तरी घरी पाव्हणे येणार असल्यास मांजराचा काही बंदोबस्त आधीच करावा.

>>>>> कुत्र्याने फिरायला नेल्यावर रस्त्यात शी केली तर मालक साफ करतात का?
भारतात? <<<<<<
>>> हीहीही साती अहो आपले कुत्रे बाहेर काढून शेजारच्याच्या कम्पाउन्डाजवळ 'बसवायचे ' असते ! कुत्री अशी बिलन्दर की त्यानाही शिंचे आपले आणि शेजारचे कम्पाऊन्द असा भेद कळतो....: <<<<

अहो दुर्दैवाने इकडे अजुन माणसांची पिल्लेही रस्त्यातच बसतात, जनावरांच्या सोई/शिस्तीचे प्रकरण खूपच लांबचे आहे.

मांजरांचे डि क्लोइन्ग ऑपरेशन ही करतात . म्हणजे त्यांची नखे काढून टाकतात,कुत्र्यांचे स्वरयंत्र काढून टाकतात.>>>>> आता वाईट वृत्तींना पाशवी म्हणण्याऐवजी मानवी म्हणायची इच्छा होतेय.

मी बहुतेक lovebirds किंवा cockatiel पाळायचे ठरवले आहे.. इथे कोणाला काही अनुभव आहे का त्यांचा?? बिगीनर्स गाईड वाचून झाले आहे माझे..
माझ्याकडे या आधी ही पक्षी होते पण cockatiel चा काही अनुभव नाही मला..

Pages