आळस - शतशब्दकथा

Submitted by शाबुत on 28 September, 2013 - 05:16

महाराष्ट्रच्या एका भागातली शेतकऱ्यांची खालावलेल्या आर्थिक स्थितीच्या बातम्या पेपरात वाचून एक चीनचा शेतकरी त्या भागात नक्की प्रश्न काय आहे हे पाहण्यासाठी आला, त्यासाठी त्याने एका गावात जावुन पाहायचं ठरविले. रस्त्याने जाता-जाता एका शेतात निंबाच्या झाडाखाली बसलेल्या शेतकऱ्याला पाहून चीनचा शेतकरी म्हणाला,
“तू असा काय बसून आहेस, काही काम नाही काय?”
“कामं तर भरपूर पडलेली आहेत, पण.....”
“शेतात चांगलं काम कर, शेतातून भरपूर उत्पादन काढ!”
“त्यानं काय होईल?”
“ते बाजारात नेऊन विकलं की बरेच पैसे मिळतील!”
“... जास्त पैसे मिळाल्याने काय होईल?”
“तुला एवढं सुद्धा कळत नाही.... तुला आरामात जगता येईल”
“..... मग आता काय करतो आहे.... हे तु पाहत नाहीस काय?”
...असं निंबाच्या झाडाखाली आरामात बसलेला शेतकरी आळस देत बोलला तेव्हा तो चीनचा शेतकरी त्याच्याकडे पाहातच राहाला.

*****

Group content visibility: 
Public - accessible to all site users

..... नेहमीच पुणेरी लोकांना नावे ठेवणं योग्य नाही..... कारण पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहेच.