"पत्र सांगते गूज मनीचे" घारुआण्णा

Submitted by घारुआण्णा on 11 September, 2013 - 05:57

प्रिय गणोबा,
सस्नेह नमस्कार..
नुसतं "सस्नेह नमस्कार" असं लिहिण्याईतका काही मी तुमच्या बरोबरोबरीचा नाही ना वयानं, अनुभवानं आणि मानाने हे... पण असं "सस्नेह" लिहिलं की मनातल्या या वयाच्य अनुभवाच्या आणि मानाच्या भिंती दुर होतात आणि एकदम परिचित आणि आपल्या माणसाशीच बोलत असल्याचा फिल येतो...आणि मला नक्की माहीतेय कि तुम्हालाही हे नक्की पटेलच.
खरंतर गेल्या दोन वर्षात आपलं येणं घरी झालंच नाही... मागच्या खेपेला अगदी ढोल ताशां च्य गजरात तुमच स्वागतही झालं होतं आणि निरोपही तसाच वाजगत दिलाहोता तुम्हालां , पण आमचा तिर्थरुपांच्या कडक नियमामुळे आपली भेट गेले दोन्ही वर्ष आमच्या घरी न होता काकांकडेच होत राहीली... पण मनापासुन सांगयचं तर तुमचं घरी येणं आणि ५ दिवस मुक्काम करणं आणि केवळ काकांच्या घरी होणारी धावती भेट ही तुलना म्हणजे अगदी.... धावत पळत लग्नाच्या बुफे चं जेवण आणि पद्ध्तशीर अंगतपंगत होणार जेवण अशीच करावी लागते हो... पंगतीच्या भरपेट जेवणाची आणि आग्रहाची सर बुफेच्या जेवणाला थोडीच येणार....
असो... तर आमच्या माबोकर संयोजकांनी पत्र लेखनाची स्पर्धा घेतलीय , विचार के ला कोणाला लिहावं, आणि समोरच्याचं उत्तरही अपेक्षीत आहे दहा दिवसात
ई-मेल च्य या युगात पत्र वाचणार कोण आणि उत्तर लगोलाग पाठवणार तरी कसं......मग लक्षात आंलं लिहावं तुम्हालाच , नाहीतरी व्यास गुरुजींच महाभारत लिहायचा तुमचा स्पीड माहीतय, आणि तुम्ही सध्या ईथेच मुक्कामी आहात,त्यामुळे मुषक मामांनाही उत्तर पोहोचवायला, फार पळपळ करावी लागेल असं वाट्त नाही... थोडं ट्राफिक वगैरे लागेल... तर निघतानां मिस कोल टाकायला सांगा , कमी ट्राफकचा रूट सांगिन.
गणोबा मला माहीतीय सध्या तुमचं आणि सप्लाय आणि डिमांड चेन फारच गडबडीत असेल... नुसत्या मागण्याच नाही तर हक्काच्या विनवण्या,मुषक मामांकडुन येणारे खास अर्ज यामुळे तुम्ही फारच गडबडुन गेला असाल.मला ही काही मागण्या आणि विनंत्या तुमच्या पर्य़ंत पोहोचवायच्या होत्या म्हणुनच हा पत्र प्रपंच. आता तुम्ही हे वाचुनच म्हणाल आण्णा पण इतरांसारखाच लायनीत उभा झाला पण गणोबा इतर सगळीकडे प्रयत्न करुनही अंधार दिसतोय म्हट्ल्यावर आता हा शेवटचा उंबरा तुमचा अशा विचारांनीच मी ही लायनीत आलोय.
गेल्या दोन वर्षात इथली परिस्थीती तर तुम्हाला माहीतीय फारच हाताबाहेर चाल्लेय, कोणाचा पायपोस कोणाच्या पायात हेच कळेनासं झालंय, महागाई, चो-यामा-या , भ्रष्टाचार हे तर नवीन विषयच नाहीत अनादी अनंत चालत आलेली परंपराच जणु.त्याबद्दल तरे तर आता कोणी तक्रार /विनंतीच करणार नाही कारण सगळेच आम्ही ही त्यातुनच पुढे सरकण्याचा प्रयत्न करतो आहोत.
पण सध्या मात्र अतिशय वाईट अशी स्त्रीत्वाची विटंबना , आणि त्या विवीध माध्यमातुन उदात्तीकरण हे मात्र फारच होऊ लागलय. गेल्या खेपेला तुम्ही गेल्यावर या ईंद्रप्रस्थात( दिल्ली) निर्भयावर झालेल्या अमानुष अत्याचाराची बातमी तुमच्या पर्यंत आलीच असेल,दिल्ली दरबाराने त्यावर कडक कायदेही केले हो आता नक्की कारवाई होइल असा विश्वास वाटत असताना... केवळ ३ वर्षाच्या फालतु शिक्षेवर १ जण सुटला ना का तर म्हणे तो वयाने लहान होता....
दिल्लीतल्या प्रकरणानंतर आम्ही मुंबई कराना लय ताव मारुन सांगितल आमची मुंबै खुपच सुरक्षीत आहे आणि गेल्याच महीन्यात आमचाही फुगा फुटलां ना . ही आमच्यातली प्रवृती नष्ट करण्यासाठी तुम्ही काही करु शकाल काय, आणि आम्ही काय कराव ह्याचे ही मार्गदर्शन तुमच्या कडुन घ्याव म्हणुन हे सारं लिहितोय. हां आणखिन एक सागायच राहिलय, तुमच्या कडे येणार्या अर्ज विनंत्यां मान्य करण्या पुर्वी जरा याचकाच्या, चारित्र्याच्या सर्टीफिकेट वरही मुषक मामां कडुने चौकशी करुन घ्या ना, कारण सध्या जो अति अविचारी, अति भ्रष्टाचारी, तोच तुमच्या सगळ्यात जवळ असं चित्र सगळीकडे दिसतयं
थोडा अधिक वेळ लागेल या कामात तुमचं कामही वाढेल पण गणोबा, तुमचा इथला मुक्काम अधिक आनंदमय होईल असं आपलं मला वाटतं
अधिक काय लिहीणे, आपल्या पुढच्या भेटीची वाट पाहातोय...
आपला
आण्णा.

आण्णा ,
तुझंही पत्र मुषक मामाकडुन मिळालं,
तुझी तळमळही समजली.
अरे सामान्य म्हणवतानाच तु ही या "खा दी आणि खा की" वाल्यांसारखे वरवरचे दुखणे सांगतोयसी बरे करायला.मला मार्गदर्शन करा म्हणतोयस पण अरे मी सांगितला मार्ग तर आचरणात आणायला जमेल कारे तुला आणी इतरांना...
असुदे तरीही सांगतो उगाच गणोबा सामान्य म्हण्वणा-यांच ऎकत नाही असं नको ना व्हायला...
तुमचा गाव तुमचा प्रदेश सुरक्षीत व्हावा असं वाट्तं ना मग स्वता: सुरवात करा नियमाच्या चौकटीत राहुन जगायची....मग ती बसची रांग असो वा देवळातली, रस्त्यावरुन गाडी चालवणं असो वा पदपथावरुन चालणं, मुलांवर होणारे संस्कार असो वा तुमचे सर्व जगाबरोबरचे वागणे, हे सगळ न तपासता नुसतं सुरक्षेच्या आणि शिस्तीच्या नावाने ओरड्ण्यात काय अर्थ आहे ......
नुसत्या निर्भया आणि त्या पत्रकार मुलींवरच्या अत्याचारांनी तुम्ही दुखी: झालात म्हणे अरे पण स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तु आणि केवळ परक्याचं धन हा विचार इथेच रुजलाय ना, रोज बघतो ना आरतीच्य/मिरवणुकीच्या निम्मीत्ताने होणारे सगळे प्रकार.. तुमचा शिवाजी सांगुन गेला ना स्त्री म्हणजे तुमच्या देव्हा-यातली देवी असच समजा.. पण त्या राजाचा नुसता जय करता त्याचे फोटो आणि पुतळे लावता, विचार कोण आणणार आचरणात.... मुलींबाबत जन्म, जोपसना, शिक्षण, नोकरी सगळीकडे भेदभाव करणार तुम्ही आणि साकड मला घालणारं परिस्थिती सुधारा म्हणुन.
बघ आण्णा , समाज आणि आपण कोणी वेगळे नाही..... तुझंच बघ ना गेल्या वेळेस मोठे ढोल ताशे आणलेस मिरवणुकीला, अरे माझे कान कित्ती दुखायला लागले बरं बंद करायची सोय नाही ही भली मोठी भिकबाळी लटकवुन ठेवली होती कानात... आणि आता महागाई, प्रदुषण अशा विषयांवर बोलता काही हक्क आहे का तुझा.. त्याबाबत बोलायला...
चारित्र्याची सर्टिफिकीट मी आणि मुषक मामा तपासु म्हणतोस, मग मला सांग जी गोष्ट तुम्हाला दर पाच वर्षांनी तपासत येते आणि त्यावर शिक्का ही मारता येतो तेवढे तरी करता का रे प्रामाणिक पणे...
तुम्ही देता चुकीचे नेते मंड्ळी निवडुन, चुकीच्या पध्दतीने शाळा आणि महाविद्यालयात प्रवेश, भलेही नसेल अक्कल तरे करता जबरदस्ती एंजिनियर आणि डॊक्टर करायचयं मुलांना, आणि मग भ्रष्टाचाराच्या नावाने गळे काढ्ता....
माझच बघ की आता, दहा दिवस आलोय, पण हा मुषक मामा, आत्ता दोन दिवसात थकुन गेलाय , नुसतं मागण्यांचे आणि अर्जांच सोर्टींग करुन... कधी मी बघणार कधी त्यावर उपाय करणार... या तुम्हा सगळ्यांच्या अगोचर वागण्यामुळे मलाही कधी कधी कंटाळा येतो रे. मग कुठे तरी काही तरी कमी जास्त होतं आणि परत तुम्ही सगळे गणोबा काम करत नाही आपलं अस म्हणायला मोकळे...
पण थोडं शिस्तीने , संयमानी माणुसकीनी, वागाना , म्हंजे माझाही भार हलका होइल, रिझल्ट लवकर देता येतील.
हे पहा, तु म्हणाल्याप्रमाणे अजुन आपली निवांत भेट व्हायला २ वर्ष बाकी आहेत.. चल मग लाग बरं आत्ताच तयारीला..... बघुया तु कीती सजग , सुसंस्कारी,समाजाभिमुख होवु शकतोस, जर खरंच जमला ना तुला, तर स्वत: हुन मुक्काम वाढ्वीन तुझ्याच कडे.... छे !! हल्ली मलाही तुमच्या सारखी "देवा"ण -- "घे वाण" असेच सुचायला लागलयं.
हो आणि लक्षात असुदे... तुझ्या प्रत्येक प्रयत्नात मी तुझ्या बरोबर आहेच ... पण हा पसारा मात्र तुलाच आवरावा लागेल... तुम्हीच घातलाय सगळ्यांनी मिळुन ...
चला आता आवरतं घेतो मुषक मामा कधीचे खोळंबलेत...
पत्राचं उत्तर फार कडक दिल्याबद्दल रागवु नकोस आणि मतितार्थ समजुन कृतिही करायला विसरु नकोस... माझी बारीक कृपा दृष्टी आहेच तुझ्यावर
तु झा गणोबा.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा! Happy घारुआण्णा, तुम्ही पत्र कधी पूर्ण केलंत? आधी अर्धं लिहून ग्रूपपुरतं मर्यादित ठेवलं होतं ना? पूर्ण करुन सार्वजनिक कधी केलंत, ते समजलंच नाही... आत्ता सहज पाहिलं म्हणून समजलं, पार मागे-शेवट्च्या पानावर गेला होता हा धागा.. तिथे 'बदलून' असं दिसलं म्हणून उघडलं, तर पूर्ण पत्र!!
असो, आता वाचते.. Happy

घारुआण्णा सॉलिडच की हो!! गणोबाने अगदी घरातल्या मोठ्या, प्रेमळ, जबाबदार अशा व्यक्तीप्रमाणे कानउघडणी केली आहे. बाप्पानेच जणू हे पत्र तुमच्याकरवी लिहून घेतलंय. छोट्यांसाठी पुरंदरे शशांक यांच्याकरवी आणि मोठ्यांसाठी तुमच्याकरवी. Happy

आवड्लचं!
घारुआण्णा सॉलिडच की हो!! गणोबाने अगदी घरातल्या मोठ्या, प्रेमळ, जबाबदार अशा व्यक्तीप्रमाणे कानउघडणी केली आहे. बाप्पानेच जणू हे पत्र तुमच्याकरवी लिहून घेतलंय. छोट्यांसाठी पुरंदरे शशांक यांच्याकरवी आणि मोठ्यांसाठी तुमच्याकरवी. >> अगदी अगदी असंच वाट्लं

सानीशी सहमत .अगदी सगळ्या सामान्यांच्या मनातले प्रश्न अन त्यांचं उत्तरही तितक्याच तयारीने लिहिलंत. वर्तमान स्थितीवर खोल विचार करून झाल्यामुळेच असं लिहिणं जमलं तुम्हाला, आभार घारुआण्णा.

नमस्कार लोक्स , सर्वांना धन्यवाद... काही मंडळाच्या आणि सामाजिक संस्थाबरोबर काम करताना आलेले अनुभव, चांगली काम करण्याचे इच्छा असुनही प्रवाह विरुध्द न जाता येणे आणि त्यातुन होणरी घुसमट या गोष्टी या सगळ्या पत्र प्रपंचाला कारणीभुत..... बाप्पाचं उत्तर तर आल्यं आता प्रयत्नांती बाप्पा.... सुरु...

घारूआण्णा,
कृपया ह्या धाग्याच्या शब्दखुणांमधे ' पत्र सांगते गूज मनीचे' असं लिहा.

दोन्ही पत्र आवडली. खरच ह्यांची प्रिंट काढून सार्वजनिक गणेशोत्सवाच्याइथे लावायला हवी.

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

छानच पत्र.. खरं तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी आवर्जून लावावे असे आहे हे. >>> +१०...
अंतर्मुख करायला लावणारे पत्र ...