कोकणातलो गणपती: आगमन ते विसर्जन

Submitted by Yo.Rocks on 18 September, 2013 - 13:08

भाद्रपद महिना उजाडला की पाउस आपला जोर कमी करुन रिपरिप गान सुरु करतो...

गणपतीच्या आगमनासाठी निसर्गाची तयारी झालेली असते... साहाजिकच चोहीकडे भातशेतीचे हिरवे किनारे दिसू लागतात.. रानफुलांचा मेळावा भरलेला असतो..

- -

घराकडे जीथे श्रींची स्थापना होणार असते त्या जागेच्या मागील भिंतीवर सुंदर चित्र रेखाटून झालेले असते..

छताला पडदा लावला जातो.. पण पारंपारिक पताके असतील तर त्यांचा रुबाब बघण्यासारखा..

तिकडे गावातला मुर्तिकार अगदी फार नाही पण जवळपासच्या घरांसाठी सात- आठ मुर्त्या बनवून तयार असतो.. शाडूच्या मातीची मुर्ती.. शहरी मुर्त्यांप्रमाणे फिनीशींग नसली तरी कुठलाही साचा न वापरता केवळ हातच्या कलाकुसरीने हे मुर्तीकाम करायचे म्हणजे निव्वळ संयम व कष्ट हवेत.. शिवाय नेहमीची शेतीची कामे असतातच.. तेव्हा ह्यांची मेहनत खरच कौतुकास्पद.. तरीसुद्धा ह्या मेहनतीचा मोबदला शहरीमुर्त्यांच्या मानाने अगदी कवडीमोलच असतो.. कारण इथे व्यवहारिकपणा नसतो तर श्रद्धेला मान दिला जातो..

- -

ठरलेल्या मुर्तीसमोर नारळ, अगरबत्ती वगैरे लावून नमन केले जाते नि मुर्ती घरी आणण्याची लगबग सुरु होते.. मातीची मुर्ती त्यात थोडी मोठी असेल तर वजन चांगलेच वाढते.. पुर्वीसारखे डोईवर मुर्ती बसवून नेणारे गावकरी आता कमीच भेटतात... बरेचशे आता वयाने थकलेले नि पुढची पिढी शहराकडे वळालेली !

अश्या मुर्ती उचलून आणताना खरीच कसोटी असते.. पावसाने निसरडी झालेल्या शेतमळ्यातल्या वाटेतून चालताना जरा जपूनच घ्यावे लागते..

माटीचे छत्र घेउन गणराय विराजमान होतात..

- -


(यावर्षी घरात एका व्यक्तीचे देहावसन झाल्याने मागच्या भिंतीवर 'पिंपळ' काढलेला आहे)

--

- -

प्रथम तुला वंदितो..

-

बाप्पांसमोर केळीच्या पानावर नैवेद्य ठरलेलाच..

मग होतात रमणीय त्या आरत्या रमणीय ते भजन.. रात्री महिलांच्या फुगडयाही रंगतात.. दिवसभरात दुरदुरवरुन गणपतीची गाणी ऐकू येतात.. पण रात्रीच्या शांततेत दुरुन ऐकू येणारे भजनाचे स्वर कानावर जेव्हा पडतात तेव्हा कोकणातल्या गणेशोत्सवाची खरी सर कळून येते..

- -

गणरायाच्या गजरात सगळे वातावरण मंगलमय होउन गेलेले असते.. या धामधूमीत बाप्पांचा निरोप घेण्याची वेळ कधी येउन ठेपते ते कळतच नाही.. साहाजिकच मन दाटून येते.. शेवटची आरती आटपली की खळ्यात(अंगणात) काढलेल्या रांगोळीवर बाप्पांना आणले जाते.. इथे बाप्पांची मुर्ती अधिकच मोहून टाकते..

- -

शेवटचे नमन करुन बाप्पांना उचलून घेतले जाते.. नि मग गजर सुरु होतो.. 'पायी हळुहळू चाला.. मुखाने गजानन बोला..' 'गणपती चालले गावाला.. चैन पडे ना आम्हाला'

- -

- -
असे एखादेतरी दृश्य दिसतेच..

'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..' _/\_ Happy

---------------- * * * --------------
कोकणातलो गणपती (२०१२)
http://www.maayboli.com/node/38286

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थीम आणि फोटो अत्यंत सुंदर!

धुराच्या वलयांमागचा बाप्पा सुरेख दिस्तोय!

खर्‍या अर्थाने हा गणेशोत्सव. महिलांच्या फुगडया, खेळ, भजन, गणपतिची गाणी हे तर आजकाल शहरात दिसत नाहि.
आज आईला फोन केला होता तर बाहेरुन जाणार्‍या गणपति साठि काहितरि पिंकि कि काय गाणे जोरात फोन मधुन सुद्धा ऐकु येत होते.

मस्त

फार फार आवडले....
.... चमक दमक नसलेल्या साध्या, पण अतिशय भावपूर्ण गणेशोत्सवाचे हे फोटो पाहून जीव सुखावला अगदी....

योग्या...
सुन्दरच काम केलंस...
घराकडच्या गणपतीक गेली १२ वर्सां जावकच नाय आसंय... आसो...

घरी कणकवलीला व्हाळातल्या पाण्यातलं विसर्जन आणि आजोळी मालवणला समुद्रावरच विसर्जन.
सही धमाल.

सर्व प्रची एकदम झकास.

चमक दमक नसलेल्या साध्या, पण अतिशय भावपूर्ण गणेशोत्सवाचे हे फोटो पाहून जीव सुखावला अगदी.... > +१

मस्तच यो.. गेल्या वर्षीच्या तुमच्या घरगुती गणेशोत्सवाची आठवण ताजी झाली.

Pages