कोकणातलो गणपती: आगमन ते विसर्जन

Submitted by Yo.Rocks on 18 September, 2013 - 13:08

भाद्रपद महिना उजाडला की पाउस आपला जोर कमी करुन रिपरिप गान सुरु करतो...

गणपतीच्या आगमनासाठी निसर्गाची तयारी झालेली असते... साहाजिकच चोहीकडे भातशेतीचे हिरवे किनारे दिसू लागतात.. रानफुलांचा मेळावा भरलेला असतो..

- -

घराकडे जीथे श्रींची स्थापना होणार असते त्या जागेच्या मागील भिंतीवर सुंदर चित्र रेखाटून झालेले असते..

छताला पडदा लावला जातो.. पण पारंपारिक पताके असतील तर त्यांचा रुबाब बघण्यासारखा..

तिकडे गावातला मुर्तिकार अगदी फार नाही पण जवळपासच्या घरांसाठी सात- आठ मुर्त्या बनवून तयार असतो.. शाडूच्या मातीची मुर्ती.. शहरी मुर्त्यांप्रमाणे फिनीशींग नसली तरी कुठलाही साचा न वापरता केवळ हातच्या कलाकुसरीने हे मुर्तीकाम करायचे म्हणजे निव्वळ संयम व कष्ट हवेत.. शिवाय नेहमीची शेतीची कामे असतातच.. तेव्हा ह्यांची मेहनत खरच कौतुकास्पद.. तरीसुद्धा ह्या मेहनतीचा मोबदला शहरीमुर्त्यांच्या मानाने अगदी कवडीमोलच असतो.. कारण इथे व्यवहारिकपणा नसतो तर श्रद्धेला मान दिला जातो..

- -

ठरलेल्या मुर्तीसमोर नारळ, अगरबत्ती वगैरे लावून नमन केले जाते नि मुर्ती घरी आणण्याची लगबग सुरु होते.. मातीची मुर्ती त्यात थोडी मोठी असेल तर वजन चांगलेच वाढते.. पुर्वीसारखे डोईवर मुर्ती बसवून नेणारे गावकरी आता कमीच भेटतात... बरेचशे आता वयाने थकलेले नि पुढची पिढी शहराकडे वळालेली !

अश्या मुर्ती उचलून आणताना खरीच कसोटी असते.. पावसाने निसरडी झालेल्या शेतमळ्यातल्या वाटेतून चालताना जरा जपूनच घ्यावे लागते..

माटीचे छत्र घेउन गणराय विराजमान होतात..

- -


(यावर्षी घरात एका व्यक्तीचे देहावसन झाल्याने मागच्या भिंतीवर 'पिंपळ' काढलेला आहे)

--

- -

प्रथम तुला वंदितो..

-

बाप्पांसमोर केळीच्या पानावर नैवेद्य ठरलेलाच..

मग होतात रमणीय त्या आरत्या रमणीय ते भजन.. रात्री महिलांच्या फुगडयाही रंगतात.. दिवसभरात दुरदुरवरुन गणपतीची गाणी ऐकू येतात.. पण रात्रीच्या शांततेत दुरुन ऐकू येणारे भजनाचे स्वर कानावर जेव्हा पडतात तेव्हा कोकणातल्या गणेशोत्सवाची खरी सर कळून येते..

- -

गणरायाच्या गजरात सगळे वातावरण मंगलमय होउन गेलेले असते.. या धामधूमीत बाप्पांचा निरोप घेण्याची वेळ कधी येउन ठेपते ते कळतच नाही.. साहाजिकच मन दाटून येते.. शेवटची आरती आटपली की खळ्यात(अंगणात) काढलेल्या रांगोळीवर बाप्पांना आणले जाते.. इथे बाप्पांची मुर्ती अधिकच मोहून टाकते..

- -

शेवटचे नमन करुन बाप्पांना उचलून घेतले जाते.. नि मग गजर सुरु होतो.. 'पायी हळुहळू चाला.. मुखाने गजानन बोला..' 'गणपती चालले गावाला.. चैन पडे ना आम्हाला'

- -

- -
असे एखादेतरी दृश्य दिसतेच..

'गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या..' _/\_ Happy

---------------- * * * --------------
कोकणातलो गणपती (२०१२)
http://www.maayboli.com/node/38286

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम मन प्रसन्न झाले.

मागच्या वर्षीचा हिरो यंदा मोठ्या माणसासारखा फुलशर्ट घालून आहे. पण अजूनही तितकाच गोड दिसतोय.

यो खरं सांगू? या गणेशोत्सवात अनेक मुर्ती पाहिल्या पण तु टाकलेली मुर्ती मनमोहक आणि अतिशय सुबक आहे. माझे हात नकळत जोडले गेले. Happy सुरेख चित्रण केलयस. Happy

अप्रतिम......

मुर्ती आणि मागची चित्र अप्रतिम..... हा खरा गणेशोत्सव...... आपण आणि बाप्पा..... बास ढोल, ताशे, आवाज, हिडीस नाच, डी.जे. काही नाही......

खुप मस्त.... आवडत्या १० मधे

ते एक पान "प्रचंड" उकडीच्या मोदकंनी भरलं आहे..... ते नक्कीच तू घेतं असशील जेवायला!!!!!

यो, खूप खूप धन्यवाद! Happy
कौलारू घर ते विसर्जन हे फोटो पाहून कोकणातच सगळ अनुभवतेय असं वाटल. Happy
यो, दररोजच्या आरतीचा आणि नंतरच्या प्रसादाचा फोटो कुठे आहे? Proud
निरागस लोकं आणि भक्तीमय वातावरण!
आवडलं. स्मित>>>>>>>>>आर्ये, म्हणून तर म्हणतात ना? "कोकणची माणसे साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी." Happy

मस्त रे मित्रा...
हे गणपती मला खुप आवडतात. उगाच कुठला भपका नाही, पैशाचा पाऊस नाही, लोकांची झुंबड नाही, विक्षिप्त नाचगाणे नाही गर्दी, रेटारेटी, नाही...
सर्व कसं शांत सुंदर व उदात्त...

Pages