मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - रांगोळी" १७ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 10:08

मोठ्ठी मोठ्ठी घरं, सारवलेलं अंगण आणि त्यावरची सुबकशी रांगोळी.. यथावकाश घरं आटोपशीर झाली, अंगणं हरवली, रांगोळीही काढण्या ऐवजी चिकटवता यायला लागली... पण रांगोळीची सुबकता कधीच कमी झाली नाही.

याच सुबकतेला माबोकरांसमोर मांडा आणि खेळा खेळ झब्बू रांगोळींचे.

नेमकं करायचंय काय? तर तुम्ही काढलेल्या, पाहिलेल्या,प्रसंगी बनवलेल्या देखील रांगोळींचे फोटोज इथे टाकायचेत आणि एकमेकांना झब्बू द्यायचेत.

हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१३' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

आजचा विषय - रांगोळी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रांगोळी आणि कलाकार......आमच्याकडे काम करणारा शरद. लुईला फिरवून आणणे आणि इतरही बरीच कामं करतो. ड्रॉइंग उत्तम आहे.

मस्त एकसेएक रांगोळ्या आहेत. गोंदवलेकर महाराजांची मस्तच.
मानुषीताई शरदने छान रांगोळी काढलीय. फुलांच्या पण रांगोळ्या सुंदर.

मंजूडी, ती संस्कारभारतीची रांगोळी मस्त दिसतेय.

जिप्सी, तू टाकलेली फराळाची रांगोळी दिसतेय छान. पण जमिनीवर टाकून असं अन्न वाया घालवणं पटलं नाही.

जिप्सी, तू टाकलेली फराळाची रांगोळी दिसतेय छान. पण जमिनीवर टाकून असं अन्न वाया घालवणं पटलं नाही.>>>>खरंय सायो :-). ती ऑफिसमध्ये रांगोळी स्पर्धेसाठी काढलेली आणि त्याच्या खाली लाकडाची चौकोनी फळी आहे. फक्त बाजुनी जी शेव टाकली आहे ती फरशीवर सांडवली आहे ज्यामुळे ती फळी दिसणार नाही. बाकी, फराळ स्पर्धा संपल्यावर फस्त झाला. Happy

>>जिप्सी, तू टाकलेली फराळाची रांगोळी दिसतेय छान. पण जमिनीवर टाकून असं अन्न वाया घालवणं पटलं नाही.>>>>खरंय सायो . ती ऑफिसमध्ये रांगोळी स्पर्धेसाठी काढलेली आणि त्याच्या खाली लाकडाची चौकोनी फळी आहे. फक्त बाजुनी जी शेव टाकली आहे ती फरशीवर सांडवली आहे ज्यामुळे ती फळी दिसणार नाही. बाकी, फराळ स्पर्धा संपल्यावर फस्त झाला. >> मग ठीक आहे Happy

एकसे एक सुंदर रांगोळ्या!

लाकडी ट्रेमधे असली तरी फरशीवरची फराळाची रांगोळी बघून जरा वेळ जीव कळवळला. असला देखणा फराळ काही तोंडात पडत नाही इथे. आणि मुबलक मिळालं की लोक चकल्या मोडून, त्याच्या किनारी करून, रांगोळ्या घालतात. Proud

Pages