मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - नाचे मयूरी" १५ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 10:11

गणपती डान्स असो वा शिकून सवरून केलेल्या स्टेप्स ,पण नृत्य ही गोष्टच मुळी न टाळता येण्यासारखी.
जगातल्या प्रत्येक गोष्टीत एक ठेका सापडतो...मानव प्राण्यालाच कशाला निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी हा ठेका पकडण्याची इच्छा होतेच!
तुम्हाला तोच ठेका आपल्या कॅमेर्‍यात पकडायचा आहे.
निसर्गातील अशी कोणताही नृत्यातली एखादी स्टेप किंवा मुद्रा किंवा भाव दाखवणारा जीव/गोष्ट तुम्हाला तुमच्या कॅमेर्‍यात पकडायची आहे.

उदाहरणादाखल हे पहा -
nache mayuri 2.jpg

प्रचि श्रेय - जिप्सी.

हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

घ्या तर मग शोध अशा सार्‍या ठेक्यांचा आणि खेळा आपला लाडका 'खेळ झब्बूंचा'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक, हा विषय काहीसा व्हेग आहे. ठेका म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे हे लक्षात येणं कठीण आहे. शिवाय ही अगदी सापेक्षी संकल्पना असू शकते. अगदी तुम्ही उदाहरणादाखल दिलेल्या चित्रातही लय आहे पण ठेका कसा काय आहे हे कळलं नाही. ठेका शब्दानं जरा घोळ होऊ शकतो. असो.

हे चालेल का?

गिरकी घेतल्यानं यांचे हिरवे झगे किती छान पसरले आहेत :

578102_10151018069063289_50616916_n.jpg

मामी, ठेका या शब्दाचा तुम्हाला जाणवलेला अर्थ बरोबर आहे. तुमचा झब्बू योग्यच आहे.

धन्यवाद, संयोजक.

मी आSSSSले निघाSSSSले ......

डावा हात डोक्यावर आणि उजवा हात आकाशाकडे अशा पोझमधली हिरवीण डोळ्यापुढे आणा.

हह ...... Rofl

हा मस्त विषय आहे...इंटरेस्टींग Happy

हह, मस्त आहे पेन्ग्विनवाला..

या आप्प्यांनो लवकर यारे
फेर धरुनी नाचू सारे
चटणीभोवती..
appa2.jpg

स्वरुप मस्तच.

मामे, तुझ्या फोटोत ते गाणं कोण नाचताना म्हणतंय?? Wink उदास बसून म्हणत असेल ना...

>>आप्प्यांनी नीट गोल फेर धरला नाहीये. नीट कोरीओग्राफ करा. Biggrin

स्वरूपने टाकलेला फोटो आणि कॅप्शन फार आवडलं.

मामी, हह, Lol
हो, निळावंती यायलाच हवी नं दर वर्षी! बथ्थड आणि कुकु दिसते म्हणून काय झालं? Proud

Pages