मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - नाचे मयूरी" १५ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 31 August, 2013 - 10:11

गणपती डान्स असो वा शिकून सवरून केलेल्या स्टेप्स ,पण नृत्य ही गोष्टच मुळी न टाळता येण्यासारखी.
जगातल्या प्रत्येक गोष्टीत एक ठेका सापडतो...मानव प्राण्यालाच कशाला निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीला कधी ना कधी हा ठेका पकडण्याची इच्छा होतेच!
तुम्हाला तोच ठेका आपल्या कॅमेर्‍यात पकडायचा आहे.
निसर्गातील अशी कोणताही नृत्यातली एखादी स्टेप किंवा मुद्रा किंवा भाव दाखवणारा जीव/गोष्ट तुम्हाला तुमच्या कॅमेर्‍यात पकडायची आहे.

उदाहरणादाखल हे पहा -
nache mayuri 2.jpg

प्रचि श्रेय - जिप्सी.

हे लक्षात ठेवा :
१.फोटो ओरिजनल हवा, एडिट केलेला किंवा कोलाज नको.
२. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
३. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या ग्रूपचे सभासद असणे गरजेचे आहे.
४. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
५. झब्बूचे प्रकाशचित्र हे प्रताधिकार मुक्त असावे.
६. झब्बूचे प्रकाशचित्र संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकेल, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.

घ्या तर मग शोध अशा सार्‍या ठेक्यांचा आणि खेळा आपला लाडका 'खेळ झब्बूंचा'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बघा पदर फडकवणारी लावणी

तरणी ताठी नार शेलटी चढले मी बांधावर
अटकर बांधा गोरा गोरा खांदा पदर वार्‍यावर

कलिंगड Proud

स्वरूपने टाकलेला फोटो आणि कॅप्शन फार आवडलं.

मामी, हह, हाहा
हो, निळावंती यायलाच हवी नं दर वर्षी! बथ्थड आणि कुकु दिसते म्हणून काय झालं? +१०००००००००००००

स्वरूप Lol

नाय गं लोला. "नृत्यातली एखादी स्टेप किंवा मुद्रा किंवा भाव दाखवणारा जीव/गोष्ट " हे पण चालणाराय.

कोमल काया की मोहमाया पुनव चांदण न्हाली
सोन्यात सजली रुप्यात भिजली रत्नप्रभा तनू ल्याली
ही नटली थटली, जशी उमटली चांदणी रंग महाली
मी यौवन भिजली पाहून थिजली माबोसभा भवताली
अप्सराSSS आली...

शालू हिरवा पाच नि मरवा वेणि तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा !
गोर्‍या भाळी चढवा जाळी नवरत्‍नांची माला
साजणी बाई येणार साजण माझा !

292568_395953940423408_2030782761_n.jpg

सादर आहे लावणी... S SS S SS (ढोलकीचा ठेका !) ...
आमचा मोर पाठमोरा स्टार्ट घेतो आहे !!

कुणितरी टाका रे झब्बू !! ... ढोलकीचा ठेका संपत आलाय.. आता मला सामोरं यायचे आहे स्टेजवर....

Pages