मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ८ (हर्पेन)

Submitted by संयोजक on 13 September, 2013 - 07:43

मायबोली आयडी – हर्पेन
पाल्याचे नाव – चैतन्य
वय – सहा वर्षे

Bappala Patra - Chaitanya.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा चैतन्य! पाटी-पेन्सिल वापरुन पत्र लिहिण्याची कल्पना मस्तच रे! Happy तुझ्या सर्व मागण्या बाप्पा लवकर पूर्ण करो!

Lol
कसलं गोडेय हे Rofl
बाप्पा पण खुदकन हसेल Happy
पाटी वरती पत्र हे बेस्ट आणि सानविवि वगैरे ही मस्तच Happy
आता कोणतंही पत्रं लिहिताना त्याला सानविवि लिहायचं लक्षात राहील Happy

भारी आहे पत्र! माउंटन बाइक मिळाली का मग? Happy

>> दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे
Lol

पाटी बघून नॉस्तॅल्जिक वाटलं एकदम! Happy

अरे वा! आलं पण पत्र, माझे लक्षच नाही इकडे !

धन्यवाद मंडळी Happy

मराठी माध्यमातूनच शिक्षण चालू असल्याने फार विशेष नाही पण सांगावेसे वाटते की हे पत्र चैतन्यने एकट्याने एकहाती लिहून पुर्ण केले. त्याला फक्त आधी सांगीतले होते की तुला जे हवे आहे आणि आई बाबा देत नाहीत ते बाप्पाला सांग. आणि मग लिहून झाल्यावर काही र्‍ह्स्व, दीर्घ च्या चूका सुधारायला सांगीतल्या. (अर्थातच मला कळलेल्या Happy )

कल्पना अशी होती की पाटीवर कच्चा खर्डा तयार करून मग तो वहीत उतरवायचा, पण सोसायटीच्या गणपतीसंदर्भात विविधगुण दर्शनाच्या कार्यक्रमाची तयारी करायसाठी बोलवायला मुले आली आणि मग पुढचा सगळाच बेत बारगळला Happy

तरी जाता जाता त्याला टोकलेच की अरे हे पत्र आहे पोचणार कसे तर लगेच घरच्या गणपतीसमोर पाटी नेऊन त्याला दाखवली Happy त्याचाही फोटो आहे, नंतर टाकतो.

>>दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे
कसलं गोड...

पाटीने नॉस्टॅल्जिक केलं.

>>लगेच घरच्या गणपतीसमोर पाटी नेऊन त्याला दाखवली
हे मस्त Happy

गोड लिहिलंय.
आम्ही पाटी पेंसिल वापरत होतो तेंव्हा इतक्या देखण्या पाट्या नव्हत्या ब्वा. पाटीच्या कडेचं डिझाइन भारी आहे .

(स्वगत बाप्पाला पत्र लिहून असली पाटी मागावी काय ?)

दादाच अजून पाचवी जायचाय म्हणजे हा कितवीत आहे ? आतापासून माऊंट्न बाईक हवी म्हणजे सातवीत गेल्यावर लुना तरी लागेल बहुतेक Happy

लोला, कविन, वेका, जयू, तोषवी, मो, मेधा, सशल, सुनिधी सगळ्यांना धन्यवाद.

मेधा - चैतन्य आत्ताशी पहिलीत आहे, त्याला अजून तरी पाटीचे कौतुक आहे. ह्याला माऊंटन बाईक तर त्याच्या दादाला रेसींग कार हवी आहे. दादालाही सांगीतले आहे पत्र लिहायला, बघू लिहितोय का ते!

वेका - हा आहे बाप्पाला पाटी दाखवतानाचा फोटो Happy

हर्पेन, तुझा बाळ अगदी गोग्गोड आहे.
पाटीवर पत्रं लिहून गणपतीला पाटी दाखवायची आयडिया भारी आहे.
ओरिजिनॅलिटी आहे डोक्यात.
शाब्बास!

मस्त मस्त पत्रं आहे एकदम. :). भारीच आवडलं.
दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे- >> हे अशक्य गोड आहे. :). आमच्याकडे पण धाकटीच्या आयुष्यातलं मोठं स्वप्न 'आय वाँट टु बी बिगर दॅन हर' हेच आहे.
आणि अजून पत्र लिहायला मुहूर्त लागला नाही पण लिहीलं की गणपतीसमोर ठेवायचं ऑलरेडी ठरलं आहे. त्याला मराठी वाचता येतं का इंग्रजी हे विचारुन झालं, त्यापेक्षा मी नुसतं तोंडी सांगते असं म्हणून 'व्हाय आर यू इन्विजिबल ? कॅन यू मेक मी इन्विजिबल टू ?' असं विचारलं आहे सध्या. Happy

कित्ती क्युट पत्रं आणि किती क्युट आहे चैगन्याचा फोटो !!!!

आणि मग लिहून झाल्यावर काही र्‍ह्स्व, दीर्घ च्या चूका सुधारायला सांगीतल्या. (अर्थातच मला कळलेल्या )
<<
सांगितल्या असं पाहिजे :).

Pages