मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ८ (हर्पेन)

Submitted by संयोजक on 13 September, 2013 - 07:43

मायबोली आयडी – हर्पेन
पाल्याचे नाव – चैतन्य
वय – सहा वर्षे

Bappala Patra - Chaitanya.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्पाला पाटीवरचे पत्र दाखवतानाचा फोटो खासच...

पत्रही मस्तच - दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे >>>> हे सगळ्यात भन्नाटे रे ....

फार आवडलं. पाटीवरच्या पत्राची कल्पना पण भारी आहे.

दादा पाचवीत गेल्यावर चैतन्यला सातवीत घालण्याची व्यवस्था कशी करावी हा बाप्पापुढे यक्षप्रश्न असणार आहे.

अय्यो कित्ती गोड! माउंटन बाईक आणि घड्याळ हे समजू शकले पण दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊदे हे फार म्हणजे फारच भारीये! आणि फक्त पहिलीतल्या मुलाचं मागणं आहे हे वाचून आणखीनच मज्जा वाटली. बाप्पाला पत्र दाखवण्याची कल्पना भारीये!...:स्मित:

गोड आहे. पाटीवर लिहायची कल्पना (आता याला कल्पना म्हणायला लागतंय) आवडली.
दादाने वाचले का हे पत्र?

गोड पोरगा आहे अगदी, पाटी तर अशी धरलीय जशी जो जिता वही सिकंदरमध्ये आमीर खानने ट्रॉफी धरलेली..
त्याचा दादालाही सांगा आता पत्र लिहायला, घरातच गणपती येत असेल तर तो आपला मित्र वाटून अगदी आतून पत्र येत असेल नाही.. Happy

दादा पाचवीत तेव्हा मी सातवीत हे भारीच !

योग, भरत, अभिषेक, सिंडरेला - सगळ्यांना धन्यवाद!

योग - काल मला चैतन्य विचारत होता वंटास म्हणजे काय म्ह्णून! आता बोलताना नक्की त्याचा वापर करेल तो Happy

भरत मयेकर - चैतन्यला अजून तरी पाटीवर लिहिणे चालते आहे, त्याच्या दादाने हे पत्र वाचले आहे आणि त्याला आता एकदम दहावीत जायचे आहे. Happy

अभिषेक - गणपती खरोखरच मित्र वाटतो. माझ्या मुलांकडे तर सारखे लक्ष ठेवायला लागते. चैतन्यच्या दादाला (अद्वैतला) पण पत्र लिहायला सांगितले आहे पण अजून मुहुर्त लागला नाहीये. आज संध्याकाळी त्याने लिहिले तर संयोजकांकडे धाडून देईन.

दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे>> Happy
पाटीवर लिहिलयं ते मस्त वाटतयं. पाटी पण कसली भारी आहे रे तुझी, चैतन्य. Happy

Pages