पुलिस को भी पता नही चला सर......

Submitted by विजय दिनकर पाटील on 6 September, 2013 - 01:05

"काँग्रॅच्युलेशन्स सर, जॉय के पापा को और पुलिस दोनों को पता नही चला की ये सुसाईड नही, मर्डर था"

"यहाँ जो प्रेशर आता है उसको मेजर करने के लिए कोई मीटर क्यूं नही बना सर"

-

-

-

-

नाशिकमधली सर्व वृत्तपत्रे गेले चार दिवस जो विषय ढवळून काढत आहेत तो म्हणजे भारतातल्या एका बड्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेट ग्रूपच्या नाशिक कारखान्यात एका १९ वर्षाच्या टर्नरपदावर प्रशिक्षणार्थी असलेल्या आणि सुवर्णपदकविजेत्या हुशार मुलीची दोन्ही हातांच्या नसा कापून घेऊन नंतर गळफास लावून घेऊन आत्महत्या.

कारण काय? सहकार्‍यांमधील दहाजणांकडून सततचा मानसिक त्रास, टोमणे इ.इ.

सहकार्‍यांत ६ समवयस्क मुले आणि आश्चर्यकारकरीत्या ४ मुली. सगळ्यांना अटक झालेली आहेच पण पुढे काय?

कॉर्पोरेट रॅगिंग ह्या विषयाला अनुसरून कायद्यात काय तरतूदी आहेत?

काही वृत्तपत्रांच्या बातम्यांनुसार अगोदरही काही अशाच घटना त्याच कारखान्यात घडलेल्या आहेत.... असे किती कारखाने भारतात असतील जिथे ह्या गोष्टी होतात?

काहीच समजत नाहीये...........

Sad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुन्न...

काही कॉलेजातून फार भयानक प्रकारचे रॅगिंग चालायचे. आता तीच घाणेरडी मनोवृत्ती कॉर्पोरेट मधेही? अशा प्रकारच्या हॅरॅसमेंटला कडक शिक्षाच हवी. तसेच प्रशिक्षणार्थीनी छळ केला म्हणून कॉर्पोरेट रॅगिंग असे लेबलही लावू नये. ही कामाच्या ठिकाणी झालेली हॅरॅसमेंट आहे. तेव्हा त्यासाठी असलेल्या कायद्यानुसारच कारवाई व्हावी.

हि अशी लोक असतात...मी अनुभवली आहेत. माझ्याच मैत्रिणी....कसल्या मैत्रिणी हो? फक्त नावाला....कधीतरी वाटत कि या लोकांना कस सुधारावं? मग विचार करणच सोडून दिल...लक्ष न देता सोडून द्यायचं.

अतिशय वाईट घटना आहे. अशी सीचुयेशन बर्‍याच वेगळ्या पद्धतींने हाताळता आली असती पण तिने एकदम चुकीचा मार्ग निवडला.

सुवर्णपदकविजेत्या हुशार मुलीची दोन्ही हातांच्या नसा कापून घेऊन नंतर गळफास लावून घेऊन आत्महत्या.
<<<< काय frustration असेल... कसही करुन वाचूच नये यासाठी ही धडपड? .... अरेरे...