BLACK MAGIC- नीती नियती आणि न्याय

Submitted by RISHIKESH BARVE on 10 April, 2012 - 01:55

नीती नियती आणि न्याय

माझ्या यापूर्वीच्या लेखनावरील प्रतीक्रीयावरून मायबोली कर अत्यंत सजग आणि संवेदनशील आहेत असे जाणवले ,यास्तव सर्वांसाठी एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याचा मानस आहे .

न्याय ,नीती , धर्म या संकल्पना आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो? हिंसा ही प्रत्यक्ष घडल्यावरच होते की मानसिक हिंसा ही सुद्धा हिंसाच मानांवी?

BLACK MAGIC- FOR THOSE WHO BELIEVE ,NO PROOF IS NECESSARY ,AND FOR THOSE WHO DON’T BELIEVE, NO PROOF IS ENOUGH !
संदर्भ- http://vedicwisdom.com/blackmagic/spirit_world.php

तर मांडायचा मुद्दा असा की विविध उद्देशांसाठी आसुरी शक्तींची मदत घेवून प्रतिस्पर्ध्याला त्रास देणे ,आयुष्यातून उठवणे कितपत सयुक्तिक /नैतिक आहे?

नीतितत्त्व सांगते की असे प्रकार गेल्या हजारो वर्षांपासून भारतात /जगात घडत आलेले आहेत . शंकराचार्य /चाणक्य इत्यादी महान प्रभृती नीही जारकर्म म्हणजे पराकृत्य /करणी करणे हे पापं/गुन्हा ठरवून शिक्षा ही सांगितली आहे .गुरुचरित्रात देखील त्याला पापं ठरवून शिक्षा सांगितली आहे .

परकृत्या सारख्या बाबतीत अन्याय करणारा म्हणजे कोणातरी तंत्रीकाकडून दुष्ट शक्तींची आराधना करवून शत्रूला त्रास देणारा हा अन्यायकर्ता असतो, तर ज्याच्यावर करणी केली जाते ,तो अन्याय झालेला म्हणजे अन्यायित असतो.
जर याचा न्यायनिवाडा करायचा असेल तर अन्यायकर्त्याला शिक्षा/प्रायश्चित्त/दंड आणि अन्यायाचे परिमार्जन म्हणून अन्यायितास अन्यायकर्त्याने विशिष्ट रक्कम देणे ,जी किती प्रमाणात अन्याय /नुकसान झाले आहे ,त्यावर अवलंबून असेल .........

आजकालच्या विज्ञान युगात मूळ करणी हा विषयच पुराव्यानिशी सिद्ध करता येत नसल्याने माझे विचार अनेक जणांना प्रतिगामी किंवा जुनाट/रानटी/मध्ययुगीन वाटण्याची शक्यता मी गृहीत धरून ठेवलेली आहेच ,पण...............................

ज्यांना यातील काही गोष्टी विचार करण्यायोग्य वाटतात ,त्यांनी जरूर चर्चा करावी.
वरती एक वेबसाईट ची लिंक दिली आहे ,तीही पहावी .शेवटी एकाच सांगतो, माझ्या फेसबुक वरील आणि प्रत्यक्ष जीवनातील अनेक मित्र-मैत्रिणींना काळ्या जादूचे अतिशय घातक अनुभव आलेले आहेत ,त्यांचे दू;ख पाहवत नाही,म्हणून हा लेखन-प्रपंच !जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!!!!!!...............................

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी के यांचा सल्ला वापरुन पहा
एखाद्या सायकोथेरपीस्ट कडे उपचार करा. गरज असल्यास सायकियाट्रिस्टची मदत घ्या. ज्याच जळत त्याला कळत हे मान्यच आहे. पण या मार्गाने जाउन पहा. फरक पडेल.

त्या तांत्रिकाने २ लाख वगैरे खर्च सांगितलाय...

<< अजिबात या मार्गाने जाऊ नको म्हणून सल्ला द्या. तिचा विश्वास जर ऑलरेडी बसला असेल या तांत्रिकावर तर बाहेर पडणे कठिन आहे तरीदेखील तिला पटेल अशा भाषेत समजावून पहा. तुम्ही जे सांगत आहात त्यावरून तिचा या करणी वर विश्वास बसलेला आहे, आता तुम्ही फार प्रखर आणि लॉजिकली सांगायला गेलात तर तिला पटणार नाही, उलट जर त्या तांत्रिकाने "तुझी ती अमुक मैत्रीण" तुझ्या विरोधात आहे हे सांगितले तर ती तुम्हालाच तोडून बसेल. म्हणून अतिशय काळजीपूर्वक तिच्याशी बोला. तिच्यावर चिडून अथवा "काय मूर्ख बाई आहे" असा अ‍ॅप्रोच न ठेवता शांतपण समजावून सांगा.

बोलण्यासाठी काही मुद्दे:
१. करणी ही काळे जादू असते, जितकी काळी जादू जास्त तितका त्याचा प्रभाव जास्त असे असले तरीही जो ही काळी जादू करतो त्याला ती कधीना कधी तरी परत येऊन सतावतेच. त्यामुळे तू तुझे काम करत रहा, ती करणी ज्याने केली त्यालाच जाऊन लखलाभ होवो असे म्हणत रहा.
२. करणीवर पैसा खर्च करण्यापेक्षा देवाचे नामस्मरण करत जा, त्याने तुझ्यामधे पॉझिटीव्ह एनर्जी वाढेल आणी निगेटीव्ह एनर्जी तुला त्रास देऊ शकणार नाही.
३. पुराणकथांमधली वगैरे राक्षसावर देवाच्या विजयाची काही उदाहरणे द्या.
४. कोकणामधली असेल तर "बायंगी"चे उदाहरण द्या. तुमचा मुद्दा तिच्या पटकन लक्षात येइल.
५. मन:शांतीसाठी तिला तिचे आवडीचे छंद, खेळ कला इत्यादिंसाठी प्रोत्साहन द्या.
६. तांत्रिक लोकांनी केलेले फसवणूकीबद्दल, लैंगिक अत्याचार याबादाल तिला हलकेच माहिती द्या. तांत्रिकाने ऑलरेडी तिचा ब्रेन वॉश केलेला असल्यास हे सावकाश व ततिला राग येऊ न देता करावे लागेल.
७. तुला हल्ली खूप डिप्रेस वाटतं ना म्हणून सायकॉलॉजिस्टला एकदा भेट असे सजेस्ट करून बघा, त्यावेळेला हे करणी वगैरे अजिबात बोलू नका.

ता.क.: हे करणी वगैरे वरती माझा अजिबात विश्वास नाही, सगळा मूर्खपणा असतो हे मला मान्य आहे. पण जेव्हा लोक यामधे विश्वास ठेवतात तेव्हा त्यांच्या कलाने त्यांना यातून बाहेर सोडवावे लागते असा माझा अनुभव.

नंदिनी ला अनुमोदन. तो मांत्रिक हातात आलेला बकरा सहज सोडणार नाही. करणी करणारी मैत्रीण हीच असेही सांगेल. गुरुचरित्र किंवा शनिमहात्म्य पारायण असेही सुचवावे.

त्या तांत्रिकाने २ लाख वगैरे खर्च सांगितलाय...>>> आधीच ती हैराण झाली आहे आणि वर दोन लाख व फोटो? फुकट येतात का पैसे की झाडाला लागतात? एक छदामही देऊ नको आणि फोटो तर नकोच नको देऊ सांग.

नंदिनीने वर सुचवलेल्या मुद्द्यांव्यतिरिक्त तिला असंही सांगा की हे चुकीच्या मार्गाने, कुणाचं वाईट करायच्या हेतूने काही करायला गेलं आणि ते उलटलं तर लेने के देने पडेंगे. दुसर्‍याने काही केलंच असेल तर तो त्याच्या कर्माने भोगेल. दुसर्‍याला दु:ख दिलं तर आपल्यालाही ते आज ना उद्या भोगावंच लागतं (अर्थात हा सल्ला आपण पोटतिडकीने द्यायला गेलं तर चांगले सुशिक्षित लोक्सही त्याला आपला शाप समजू शकतात कारण दुसर्‍याला दुखवताना त्यांना ह्या रिटर्न्सची पर्वा नसते आणि "जे पेराल ते उगवेल" हे अ‍ॅक्सेप्टही करायचं नसतं Uhoh , एरव्ही एखाद्या गोष्टीला अंधश्रद्धा म्हणणारे हे सुशिक्षित लोक्स जरा स्वतःच्या यशाला छोटासा बट्टा लागला तर लागलीच कुणा व्यक्तीची दृष्ट लागली/नजर लागली म्हणतात Uhoh ). आपण आपले हात बरबटवायला नकोत असंही सांगा.
---
पण गेले ४ वर्षे तिच्यात बदल घडलेत... लग्न तूटले, दोन अपघात, सतत आजार चालू आहेत...>>>> सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने चांगले दिवसही पाहिले आहेत आधी. माणसाचं आयुष्य कधीच एकसारखं नसतं. सुख दु:खाचे चढाव उतार असतातच. जसे चांगले दिवस कायम राहिले नाहीत तसे वाईटही राहणार नाहीत. म्हणून तर चांगल्या दिवसांत माजू नये आणि त्या माजापायी दुसर्‍याच्या कठीण परिस्थितीत त्याला अजून दुखवू नये. आपल्याला माहित नसतं पुढे कुठल्या वळणार काय दबा धरुन बसलं आहे आणि कधी ते आपला माज उतरवू शकतं. हे एकदा मनात ठसलं की बर्‍यापैकी स्थितप्रज्ञता येते चांगल्या वाईट दिवसांबद्दल. मिळालेल्या यशामुळे उडायलाही होत नाही आणि अपयशामुळे ढासळायलाही होत नाही.

सर्वांना धन्यवाद.

माझ्या मैत्रीणीने ज्या पद्धतीने मला सांगितले ते एकून आँ... हे कसे काय असे माझे झाले होते.
हळूवार पणे समजावले पण मलाच ह्या(करणी) वगैरे विषयी चीड असल्याने माझाच पेशन्स संपला व मलाच भिती वाटली की हि माझ्यावरच चिडायची.

पण बाहेर पडल्यावर मी विचार केला... की हि इतकी वेडी न्हवती जी अश्या गोष्तीवर पटकन विश्वास ठेवेल... काय असेल बरे एखादे माणूस इतके डेप्रेशन मध्ये जावून अश्या गोष्टीवर विश्वास ठेवेल... वगैरे.

तिला कोणावरही करणी नाही करायचीय पण तांत्रिकाने सांगितले की तिच्यावरची करणी तो सोडवेल...

बाकी, अश्वीनी, तुम्ही म्हणता तसे माझे ही हेच म्हणणे आहे की, ह्या तांत्रिकांना म्हणा किंवा जो कोणी असली काळी कृत्य सतत निगेटीव एनर्जी वापरून करतो त्याला त्रास हो होणारच ना शेवटी. मी तिला हेच समजावले.
बहुधा तिच्या डोक्यात सध्या गोंधळ उडालाय.. एकटी असल्याने तिला सुचत नाहीये. मी तिला भारतात जा काही दिवस, बाहेर फिर वगैरे सांगितले... शेवटी तिची मर्जी.
कालही जरा वेगळ्या रीतीने सांगून समजावले फोनवर... तिचे एकच टुमणे होते चालू मांत्रिकाचा फोन येतोय सारखा कधी पैसे पाठवणार... मी सांगितले की घेवूच नको फोन. फोटो तर देवूच नको...

असो, पुन्हा धन्यवाद. हे सगळे एकून मी आपली उगाच वरच्या (वर दिलेल्या नको त्या) लिंका उत्सुकतेपोटी वाचत बसले... हायला... किती ते लोकांना पटवून द्यायचा अट्टाहास आहे ते सिंप्टम वगैरे देवून... नुसते वाचूनच भयानक वाटते. करणारे किती भयानक असतील देव जाणे. Happy

तिला कोणावरही करणी नाही करायचीय पण तांत्रिकाने सांगितले की तिच्यावरची करणी तो सोडवेल...>>>> अज्जिबात नाही! ह्या लोकांचे तोडगे अघोरीच असतात. पशुपक्ष्यांचा बळी देऊन, सो कॉल्ड करण्या बुमरँग करुन वगैरे उद्योग करतात. ह्या मध्ये ती उगाचच गुंतवली जाईल कारण जे काही तो घाणेरडे प्रकार करेल ते तो तिच्या वतीने करेल आणि स्वतः नामानिराळा राहील. अर्थात तो खर्‍या अर्थाने नामानिराळा राहूच शकणार नाही. अघोरीपणाचा शेवट अघोरीच असणार आहे.

करणी प्रकार असो वा नसो, कुणाचं वाईट चिंतणे/वाईट करणे/फसवून सत्यानाश करणे/आयुष्यातून उठवणे हे प्रकारही मी करणी संकल्पने इतकेच त्याज्य/अघोरी मानते, जरी त्यात अंधश्रद्धेत बसणारी कर्मकांडं नसली तरी. कारण त्यातूनही ती वृत्ती तेच काम करते जे एखादी सो कॉल्ड करणी करत असेल. करणी प्रकार अस्तित्वात असेल तरी मी त्याला भीत नाही. आहार, विहार, आचार, विचार शक्य तितका शुद्ध ठेवणे हेच आपले प्रोटेक्शन असते.

हे प्लिज तिलाही सांगा आणि 'करणी' नावाच्या भितीतून जरा बाहेर आली की सायकॉलॉजिस्ट / सायकिअ‍ॅट्रिस्टकडे जाऊन यायला सांगा. हवं तर तुम्ही तिच्या बरोबर डॉक्टरांकडे जा शक्य असल्यास म्हणजे तिचे डॉक्टरांकडे जायचे विचार परत चिंतेच्या लूपमध्ये गेल्यामुळे बारगळणार नाहीत.

मी अ‍ॅक्च्युअली अश्या धाग्यांवर माझी मतंही देत नाही कारण मलाही असले अघोरी प्रकार चर्चाही करावेसे वाटत नाहीत. पण इथे तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या काळजीने सिरियसली बोलताय आणि आधीच विवंचनेत असलेली तुमची मैत्रिण अजून नकळत खड्ड्यात जाऊ नये म्हणून पोटतिडकीने लिहितेय.

त्या तांत्रिकाने २ लाख वगैरे खर्च सांगितलाय...>>>>>>>>>>>>>>>

नो वे........

तो बकरा बनवतोय..

करणी करणारा आणि करवुन घेणारा ह्याना प्रचन्ड त्रास होतो नंतर असं ऐकीवात आहे.

करणी नावाचा प्रकार खरच आहे अस्तित्वात ह्याची मला तरी शंकाच आहे..

नामस्मरण, जप, मेडिटेशन ह्या मार्गाने मन शांत झालं तर आयुष्य सुकर होइल त्यांच.

मायबोलीवर डॉ. दाभोळकरांच्या कार्याबद्दल पोटतिडीकीने लिहीलं गेलंय, आणि त्याच मायबोलीवर करणी वगैरे संबधी चर्चा?? Sad
करणी अस्तित्वात असेल तर दाऊद ईब्राहीम, हाफिज सईद यांच्यावर ईथे बसुन करणी करता येईल कां??

दाऊद ईब्राहीम, हाफिज सईद यांच्यावर ईथे बसुन करणी करता येईल कां??
>>
हो का नाही? करणी करायला त्या माणसाने वापरलेला कपडा, त्याचे केस, वगैरे सामान लागते असे ऐकले आहे. पाकिस्तानातून कोणी ते आणून दिले की करता येइल करणी Biggrin

हो, पण हे करणीचे तंत्रज्ञान अजिबात लिक होता कामा नये, नाहीतर आपल्याला सीमेपलिकडून लिंबू, काळ्या बाहुल्यांचा करणी दहशतवाद सोसावा लागेल.

बाकी करणी, चेटूक, भानामती असो वा नसो, मला तर देशाच्या पंतप्रधानावर जबरदस्त "वशिकरणाचा" प्रयोग केलाय असा ठाम विश्वास आहे. Wink

हो, पण हे करणीचे तंत्रज्ञान अजिबात लिक होता कामा नये, नाहीतर आपल्याला सीमेपलिकडून लिंबू, काळ्या बाहुल्यांचा करणी दहशतवाद सोसावा लागेल.>>> आपण आपल्या सीमारेषेवरच्या कुंपणावर लिंबू, काळ्या बाहुल्या, बिब्बे टांगू. टाचण्यांची गरज नाही कारण कुंपण इटसेल्फ इज काटेरी. हाकानाका Biggrin

करणी अस्तित्वात असेल तर दाऊद ईब्राहीम, हाफिज सईद यांच्यावर ईथे बसुन करणी करता येईल कां?? >>> ट्राय कर. त्यांचे लेटेस्ट फोटो मिळव आणि "भारताच्या स्वाधीन व्हा... स्वाधीन व्हा...स्वाधीन व्हा... " असं झोप लागेपर्यंत (तुला स्वतःला) म्हणत रहा. नाहितरी सुशीलकुमार शिंदे म्हणालेच आहेत की एकामागोमाग एकेकाला परत आणू म्हणून. बघ तुझा हातभार लागतोय का? Proud

वर उल्लेखलेल्या लोकांपैकी काही लोक असल्या करणी वगैरे होऊ नयेत म्हणून प्रतिबंधक उपाय करून ठेवतात असे मध्यंतरी ऐकले होते. त्याचे सुरस गॉसिप प्रत्यक्ष भेटीत सांगण्यात येईल. Happy

>>मला तर देशाच्या पंतप्रधानावर जबरदस्त "वशिकरणाचा" प्रयोग केलाय असा ठाम विश्वास आहे<< Rofl

हां, आणि कोणी केलय ह्याचा सुद्धा अंदाज आलाय.. उगीच का बाहुले बनून फिरतोय...:फिदी:.

>>वर उल्लेखलेल्या लोकांपैकी काही लोक असल्या करणी वगैरे होऊ नयेत म्हणून प्रतिबंधक उपाय करून ठेवतात असे मध्यंतरी ऐकले होते. त्याचे सुरस गॉसिप प्रत्यक्ष भेटीत सांगण्यात येईल<<

अहो पण तुमचा तर विश्वास नाही मग अश्या गोष्टी बर्‍याच माहिती तुम्हाला हो? आणि त्या गोष्टी(करणी होवु नये म्हणून उपांय वगैरे चर्चा सांगितली लोकांना तर उगीच अंधविश्वास पसरवायचा नाही का? काही लोकं नसतात इतकी हुशार , उगाच बळी पडायची.
लोकं समजतील करणी असते म्हणून असे उपाय आहेत असा उगीच निष्कर्श होइल की.

त्याचे सुरस गॉसिप प्रत्यक्ष भेटीत सांगण्यात येईल. >> हे सांगण्याकरता कुठले गटग ठरले तर मला नक्की सांगा. कसला भारी टिपी होइल! Happy

(हे इथे कितपत रेलेव्हंट आहे, ठाऊक नाही.
पण शेअर करावेसे वाटले.)

---------------------------------------------

रक्ताच्या थारोळ्यात पडलाय,
फुटपाथच्या कडेला,
पण, अंधाराच्या सनातनी दूतांनो,
मी तुरुंगातून बघतोय
तुमच्या पराभवाची नांदी
दाभोलकरांच्या प्रतिमेवर फुली मारून, तुम्हाला करायची होती
दाभोलकरांची इतकी जीवघेणी घृणा
तर खुशाल करायची होती
मूठ मारून भानामती,
आणि टाकायची होती मुरगाळून
एखादी कोंबडी,
दाभोलकरांच्या नावानं,
108 भटजींचा कळप घेऊन,
रचायचा होता एखादा महायज्ञ
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दारात
दाभोलकरांच्या वैज्ञानिक दृष्टीला
भस्मसात करण्यासाठी
करायची होती करणी अंनिसवर, मांत्रिकाकडून घ्यायचा होता अंगारा, धुपारा
आणि जादूटोण्यानं करायचा होता आळाबांधा
दाभोलकरांच्या विवेकवादी विचारांचा...
एखाद्या चमत्कारी बुवाकडून, एखाद्या अवतारी मातेकडून,
एखाद्या गुरुमहाराजाकडून,
द्यायचा होता कठोर शाप,
दाभोलकरांच्या सत्यानाशासाठी...
धारेचे लिंबू अर्धवट कापून,
टाकायचा होता बिबव्याचा उतारा,
दाभोलकरांच्या वाटेवर,
त्यांच्या नेत्रात फूल पाडण्यासाठी,
त्यांची वाचा बंद करण्यासाठी...
श्रद्धेने लटकवायची होती काळी बाहुली, तुमच्या शाखेच्या बाहेर
आणि आरपार खुपसायच्या होत्या सुया, बाहुलीच्या अंगभर, दाभोलकर समजून...
हात जोडून, डोळे झाकून
करायचा होता नवस,
एखाद्या कोट्यधीश देवस्थानाला
पावलापावलावर उभे करायचे होते मठाश्रम,
गावागावात, वस्तीवस्तीत
भरवायचे होते सत्संग,
आणि खुशाल करायचे होते दाभोलकरांना
पाखंडी सैतान म्हणून घोषित...
आमची ना नव्हतीच कधी
आज मात्र तुमचं कावरंबावरं थोबाड, ओरडून ओरडून सांगतंय
तुम्ही हे सारं करून थकला,
मणक्याचं टिचं भरल्यागत वाकला
पण यातली कोणतीच मात्रा
दाभोलकरांवर लागू होईना
काही केल्या दाभोलकरांचं बंड
तुम्हाला रोखता येईना.......
दाभोलकर ऊन, पाऊस, वारा पीत,
ओठी घेऊन समतेचं गीत,
प्रत्येकाच्या डोक्यातला अंधार झाडत, मस्तकातले धर्मांध किडे काढत,
अंधश्रद्धेची भुते गाडत..
अहोरात्र चालत राहिले,
काळोखाच्या साम्राज्यात उजेड पेरत
मसणवट्यापासून भोंदूच्या मठापर्यंत,
एक गाव एक पाणवठ्यापासून
जात पंचायतीच्या उच्चाटनापर्यंत,
दाभोलकर अखंड लढत राहिले,
......पण....अंधारातल्या सनातनी दूतांनो,
तुमच्या बुवाबाजीला, तुमच्या कावेबाजीला,
तुमच्या मांत्रिकाला, तुमच्या तांत्रिकाला, तुमच्या सुईला, तुमच्या बिब्याला,
तुमच्या ज्योतिषाला, तुमच्या पंचांगाला, तुमच्या अंगार्‍याला, तुमच्या धुपार्‍याला,
तुमच्या अधर्माला, तुमच्या कुकर्माला
क्षणभरही विचलित करता आलं नाही, दाभोलकरांच्या विजिगीषू ध्येयवादाला,
तुमच्या तथाकथित आध्यात्मिक शक्तीने कणभरही मारता आलं नाही
नरेंद्र दाभोलकर नावाच्या विचाराला, अंतिमत: पराभूत होऊन
तुम्हाला टेकावे लागले गुडघे... दाभोलकरांसमोर...
म्हणूनच तुम्ही वापरलं इतिहासाच्या ठेवणीतलं ब्रह्मास्त्र,
जे आधी माखलं होतं
चार्वाक-तुकारामाच्या रक्तानं,
जे आज तुम्ही भिजवलंय पुन्हा दाभोलकरांच्या रक्तात,
हा तुमच्या कुकर्माचा लेटेस्ट अध्याय, आणखी एक कलंकित कडी...
रक्ताच्या थारोळ्यात पडलाय,
20 ऑगस्ट 2013,
फुटपाथच्या कडेला...
पण...अंधाराच्या सनातनी दूतांनो,
मी तुरुंगातून बघतोय
तुमच्या पराभवाची नांदी....आणि
अपराजित दाभोलकर......

- सचिन माळी
(ऑर्थर रोड जेलमधून)

--------------------------------------------------------

ज्ञानेश ने सांगितलेली Dabholkar-murder-poem by सचिन माळी अगदी संदर्भपूर्ण आहे.
पण
२१व्या शतकात जादूटोण्यावर 'खरा असल्या सारखी' "तांत्रिक" (कोटि उद्देशीत pun intended) चर्चा!?
अरेरे!

काळ्या जादूने दुसर्यांना त्रास देणं हे पापच आहे. तांत्रिकाच्या नदी लागू नका . तो खरा तांत्रिक आहे कि खोटा हे तुम्हाला माहित आहे का ? दत्त कवच , गुरुचरित्र पारायण करायला सांगावे . नवनाथ भक्तिसार मध्ये १ अध्याय आहे. नंबर नाही आठवत . थोडं सर्च करा. सापडेल. पण तहान लागल्यावर विहीर खोज्ञापेक्षा आधीच का नाही काळजी घेत ? black magic काय उठ सुठ कोणावरही परिणाम करत नाही .

माझा काळ्या जादूवर- भूताखेतांवर पूर्ण विश्वास आहे . भानामती - करणी करून एखाद्याचे वाईट करता येते.

माझ्याकडे खूप मोठी लिस्ट आहे ज्यांच्यावर काळी जादू करायची आहे .

काका , पुतणे , दावूद , आमच्या गावतले माजोरडे गुंड, भ्रष्ट पुढारी, लाच खाउ पोलिस, ई.ई.
तरी सर्व बंगाली बाबांनी संपर्क साधावा .

आणि अजून कोणाचा अनुभव असल्यास विश्वासू मांत्रिकाचा पत्ता द्या !

"दत्त-कवच , गुरुचरित्र पारायण, नवनाथ भक्तिसार"?
.
कर्मकांड
जप-पारायणे
.
फायदा
कर्त्यास शून्य
.
नुकसान, व्यय / ऱ्हास
कालापव्यय, विमनस्कता बुद्धिभ्रंश (IQ-drop, depression, futility, despair)
.
अरेरेरे!