आधुनिक सीता - १

Submitted by वेल on 29 August, 2013 - 10:17

मी लिहिलेली ही पहिलीच कथा.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची. http://www.maayboli.com/node/44940

हे कथानक वापरून मी माझी कथा पुढे चालवली आहे. ही कथा लिहित असताना मूळ कथा बेस म्हणून तर वापरली आहे पण त्याशिवाय मी त्यात मला पटतील अशा काही गोष्टी अधिक लिहिल्या. काही ठिकाणी विचार आणि लेखन स्वातंत्र्य घेतले. मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

ही कथा वाढवताना डॉ अरविंद संगमेनर ह्यांची परवानगी घेता आले असते तर मला खूप आनंद झाला असता. परंतु त्यांच्याशी कुठे व कसा संपर्क करायचा हे न कळल्याने मला त्यांची परवानगी घेणे शक्य झाले नाही त्याबद्दल त्यांची जाहीर माफी. डॉ अरविंद संगमनेर ह्यांना कुठे संपर्क करायचा हे कोणाला माहित असल्यास कृपया मला कळवावे.

मूळ कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली ..
ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली...

**********************

मी सरीता. जन्माने सरीता केशव गोखले. कायद्याने सरीता सागर साने. आणि गेल्या वर्षभरातली माझी ओळख सकिना आणि आता माझी ओळख परत बदलली आहे. ही गोष्ट माझी. आधुनिक सीतेची. स्वतःला मी सीता म्हणवते कारण मी शरीराने अपवित्र झालेले असले तरिही मनाने मी माझ्या रामाचीच होते आणि
राहेन.

कु. सरीता केशव गोखले. अनुनासिकात बोलणारी, गोरी, घारी, लांब केसांची, गॄह्कृत्यदक्ष, शनिवार पेठेत राह्णारी, अगदी नाकासमोर चालणारी सरळ साधी आई, बाबा, आजी, आजोबा, दादा आणि मी अशा षटकोनी कुटुंबातली मुलगी. आजी आजोबा दोघेही शिक्षक. आई बाबा दोघेही प्राध्यापक. दादा इंजिनियर आणि मी, मी एम. ए. मानसशास्त्र बाबांचाच विषय.

मी एम. ए. झाल्यानंतर काउंसेलिंग करायला सुरुवात केली पटवर्धन काकूंकडे. काकू सुद्धा कौन्सिलर. आणि पटवर्धन काका डॉक्टर बाबांचे शाळेचे मित्र.

साधारण वर्ष झालं असेल मी काकूंसोबत काम करायला लागून. काका एक दिवस अचानक घरी आले. अगदी गंभीर चेहरा करून. "केशव, मला असं वाटतय की तुझ्या बचतीमधले बरेच पैसे आता जाणार. आता ते जाउ द्यायचे की नाही हे तुम्हा सगळ्यांच्या निर्णयावर आहे. पण माझं मत विचारशील तर हे पैसे गेलेले चांगले." आम्हाला काही कळेना. " प्रभाकरा, पैसे गेलेले चांगले कसे रे? नीट काही बोलशील का कधीतरी? " आजीने विचारलं.

"अहो काकू नदी समुद्रापर्यंत पोहोचायला हवी तर पैसे नको का खर्च करायला थोडेतरी."
"अरे आता आम्हाला कोणती नदी न्यायची आहे समुद्राकडे."
"अहो काकू कोणती काय, तुमच्या घरातली"
"आता आमच्या घरात तुला नदी कुठे मिळाली?"
"अहो काकू ही काय पाच फूट चार इंचाची बडबडी नदी!!"
" अरे का रे बाबा आज सरीताची मस्करी का करतो आहेस?"
" अहो माझा चेहरा मस्करीचा वाटतो आहे का? मी खुप गम्भीर मुद्द्यावर चर्चा करायला आलो आहे"
"गंभीर मुद्द्याची सुरुवात अशी करतं का कोणी? आणि जे काही बोलायचे ते स्पष्ट बोल. उगा वळणावळणाने बोलु नकोस"

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/44956

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप खूप आभार, तुम्ही सगळ्यांनी वाचलीत कथा. कथा खुप मोठी बनली आहे. क्रमशः संपादीत करेन.
सम्पूर्ण कथा मला पण आवडेल एकावेळी टाकायला, पण तेवढा संयम पाहीजे ना एका जागी बसण्याचा, टाईप करण्याचा. भाग थोडे मोठे टाकायचा प्रयत्न नक्की करेन. सध्या भाग २ टाकला आहे, खूप खास छान नाही झालाय पण कथानक पुढे जाण्यासाठी महत्वाचा आहे.
असेच वाचत राहा, प्रतिक्रिया देत राहा, खूप छान वाटते प्रतिक्रिया वाचून.

थोडीशी स्वतःची जाहिरात करते आहे. वेळ मिळाल्यास माझ्या कवितासुद्धा वाचा, काव्यलेखन मध्ये.

छान