HELP - आणीबाणीच्या प्रसंगाकरता मोबाईल अ‍ॅपची संकल्पना

Submitted by मामी on 26 August, 2013 - 04:34

शक्ती मिलमधील घटनेच्या निमित्ताने ....

या आणि अशा घटना आता सर्रास कानावर येऊ लागल्या आहेत. लोकांची मानसिकता, सिनेमा-टिव्हीचा तरूण पिढीवर होणारा परिणाम, झटपट पैसे, सुख मिळवण्याची लालसा, त्याकरता कसलीही चाड न बाळगता कोणत्याही थराला जाण्याची वाढत चाललेली प्रवृत्ती अशा अनेक घटक याला कारणीभूत आहेत.

कधी तर वाटतं स्त्रिया बलात्काराला न घाबरता गुन्हा नोंदवत आहेत त्यामुळे हे असले गलिच्छ मनोवृत्तीचे गुन्हेगार गुन्हा करायला घाबरण्याऐवजी गुन्हा करून त्या स्त्रीला मारूनही टाकतील. भयंकर त्रास होतो हे सगळं सतत वाचून......

शक्ती मिल माझ्या घराजवळ आहे. तिथेच समोर असलेल्या दुसर्‍या एका मिल्सच्या कंपाउंडमध्ये असलेल्या दुकानांत बरेचदा जाते मी. दरवेळी हे ठिकाण दिसते. पण आतापर्यंत या मिलचे नाव माहित नव्हते. मात्र पडझड झालेली, हिरव्या झाडीनं झाकलेली ही जुनी मिल, तिची कंपाऊंड वॉल बाहेरून बघायला छान दिसतात. आतमध्ये इतके किळसवाणे प्रकार सुरू असतील असं वाटलंही नव्हतं......

आपल्या शहरात अगदी दिवसाढवळ्या इतक्या जवळ असं काही घडलं / घडतं आणि केवळ कल्पना नसल्याने आपण मदत करू शकत नाही याची जाणीव अस्वस्थ करणारी आहे.

यावर एक उपाय माझ्या मनात आला. यात केवळ पोलिस अथवा सरकारी यंत्रणांवर विसंबून न राहता आपल्या समाजातली कीड समूळ नष्ट करण्यासाठी आपण सगळेच एकत्र येऊ शकतो.

आजकाल मोबाईलवर अनेक अ‍ॅप्स उपलब्ध असतात. तसंच हे अ‍ॅप तयार करता येईल. कोणालाही ते स्वतःच्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेता येईल. अ‍ॅप डाऊनलोड केलं की ती व्यक्ती आपोआप त्या अ‍ॅपच्या डेटाबेसमध्ये सामावली जाईल. या डेटाबेसमध्ये पोलिसांचेही नंबर, १०० नंबर, इतर हेल्पलाईन्स वगैरे असतील.

या अ‍ॅपमध्ये एक युनिक नंबर मिळेल जो आपण मोबाईलमध्ये सेव्ह करून स्पीडडायलवर टाकता येईल. आप्तकालीन प्रसंगी स्पीडडायल केल्यावर पोलिस हेल्पलाईन आणि हे अ‍ॅप असलेल्या सगळ्यांच्या मोबाईलवर अ‍ॅलर्ट जाईल. त्याचबरोबर त्या संकटात असलेल्या व्यक्तीचं लोकेशनही दिसेल. त्यामुळे त्या भागात जवळपास असणार्‍या आणि मदतीला धावून जाऊ शकणार्‍या व्यक्ती त्वरीत त्या स्थळी पोहोचू शकतील. कोणत्याही प्रकारच्या प्रसंगात, संकटात मदत उपलब्ध होऊ शकेल.

या अ‍ॅपद्वारे केवळ पोलिसांना आणि आपल्या नातेवाईकांना अ‍ॅलर्ट न जाता सगळ्यांना गेल्यामुळे त्वरीत मदत मिळण्याची शक्यता वाढते. शिवाय, जितका डेटाबेस जास्त व्यापक तितकी मदत मिळण्याची शक्यता जास्त असेल. समजा, एखाद्या घटनेसंबंधी ३० व्यक्तींना अ‍ॅलर्ट गेला तर त्यातील निदान ३-४ तरी मदतीला जातील. सुरुवातीला सगळ्यांनाच अ‍ॅलर्ट जाईल, मात्र पुढेमागे जास्त व्यक्ती डेटाबेसमध्ये आल्यावर त्यांच्या लोकेशनप्रमाणे त्यांच्या जवळच्या घटनांचाच अ‍ॅलर्ट देता येऊ शकेल.

अशा प्रकारचं अ‍ॅप उपलब्ध आहे आणि त्याचा उपयोग करता येतो कळल्याने गुन्हेगारांवरही वचक राहील. निदान काही अंशी.

अशा प्रकारचं अ‍ॅप कदाचित आधीच उपलब्ध असेलही. मी माझ्या मनात आली आणि योग्य वाटली म्हणून ही कल्पना मांडत आहे. त्यात काही तृटी असतील अजून सुधारणेला वाव असेल तर नक्की सुचना करा. आणि हो, आधी असं एखादं अ‍ॅप उपलब्ध नसेल तर कोणी अ‍ॅप डेव्हलपरनं असं अ‍ॅप जरूर काढा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी,
तुमची कल्पना चांगली आहे.
पण अशी काही अ‍ॅप्स आधीच आहेत. नावं शोधुन देते.
मात्र त्यांच्या उपयुक्ततेबद्दल मला खात्री नाही.

कुठलेही अ‍ॅप वापरायचे तर फोन अनलॉक करुन मेनु मधुन ते अ‍ॅप उघडावे लागेल. अशा सिच्युएशन मधे ते किती शक्य असेल?
सेफ्टी / प्रायवसी रिझन साठीच मोबाईलचे जिपीएस बंद ठेवणे श्रेयस्कर वाटते. जर जिपीएस बंद असेल तर असे अ‍ॅप लोकेशन देऊ शकत नाही म्हणजे आधी जिपिएस ऑन ठेवणे / करणे जरुरीचे होईल.

हा एक लेख, अशाच काहीशा गोष्टी लिहील्यात.

जपानमधे लहान मुलांसाठी एक फोनएवढे इंस्ट्रुमेंट मिळते. शाळेत जाणार्‍या सर्व मुलांना सिटी ऑफिसकडुन ते देण्यात येते. त्याबरोबर त्यासाठीची संपर्क यंत्रणाही राबवली जाते. तो बझर नेहेमी गळ्यात घालायचा. काहीही, अगदी काहीही धोका वाटला तर त्या बझरला असलेला एक धागा फक्त खेचायचा. मोठा सायरन वाजुन अक्षरशः एका मिनीटाच्या आत संपर्क यंत्रणेकडुन पालकांना फोन जातो. आणि मुल त्यांच्या सोबत नसेल तर ( सोबत असेल आणि चुकून वाजला तर म्हणुन कन्फर्मेशन ) पोलिस यंत्रणा कामाला लागते. त्या इंस्ट्रुमेंटवरुन मुलांचे जिपीएस लोकेशन कळते.
आता आपल्याकडे असे बझर आणि संपर्क यंत्रणेला जोडलेले इंस्ट्रुमेंट काढायला हवे... निदान आपल्या मुलांसाठी तरी.

सावली, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मात्र मी मांडलेल्या संकल्पनेत केवळ पोलिस अथवा घरच्या लोकांना अ‍ॅलर्ट न जाता सगळ्यांना जाईल अशी कल्पना आहे. त्यायोगे कोणी ना कोणी मदतीला उपलब्ध असेल. पोलिस तरी किती पुरे पडणार? समाजाचाच सहभाग असेल तर गुन्हेगारांवर जास्त वचक राहील.

>> सेफ्टी / प्रायवसी रिझन साठीच मोबाईलचे जिपीएस बंद ठेवणे श्रेयस्कर वाटते. जर जिपीएस बंद असेल तर असे अ‍ॅप लोकेशन देऊ शकत नाही म्हणजे आधी जिपिएस ऑन ठेवणे / करणे जरुरीचे होईल.
>>> हा प्रत्येकाचा चॉईस असेल. प्रायव्हसी हवी असेल तर जीपीएस बंद करा. मदत हवी असेल तर सुरू ठेवा.

>>> कुठलेही अ‍ॅप वापरायचे तर फोन अनलॉक करुन मेनु मधुन ते अ‍ॅप उघडावे लागेल. अशा सिच्युएशन मधे ते किती शक्य असेल? >>> याकरता तो युनिक नंबर सेव्हकरून स्पीड डायलवर टाकण्याची सोय आहे की.

हे जरा वेगळे आहे. फोन अनलॉक करावा लागत नाही बहुधा
आईस यात एसोएस पण दिसतेय
'आईस'

मेरु कॅब इमर्जन्सी अ‍ॅप

टॅक्सी -
एकट्या मुलींना प्रवास करण्यासाठी मुंबईत वीरा कॅब्स +91 22 6120 6120 आणि प्रियदर्शनी कॅब्स 022 433 33999

स्पीड डायलवर टाकण्याची >> तरिही फोन अनलॉक करावा लागेल ना?
आईस अ‍ॅप बघ. ते चांगले वाटतेय. मी पण बघतेय.

प्रायव्हसी हवी असेल तर जीपीएस बंद करा. मदत हवी असेल तर सुरू ठेवा. >>> तसे नाही. जिपीएस नेहेमी ऑन ठेवले आणि पर्सनल किंवा कसलेही फोटो काढुन नेटवर टाकलेत की त्या फोटोबरोबर तुमची जिपीएस लोकेशन जाते. मोअर वल्नरेबल Sad समजा घरातला फोटो फेबु वर टाकला तर घराचा पत्ता कळेल.

तसे नाही मामी. याबद्दल बोलायचेच होते मलाही.
मुंबई पोलिसांचे एक आईस अ‍ॅप आहे. हे फोन अनलॉक केल्याशिवाय चालत नाही. आत्ताच पाहिले.

निर्भया अ‍ॅप फोन मालवेअर आहे म्हणुन अनइन्स्टॉल करायला सांगतोय. काढुन टाकलं.

आईस लाईट - हे अ‍ॅप चांगले वाटतेय.
फोन अनलॉक असतानाही वापरता येतेय.
जिपिएस ऑन नसतानाही लोकेशन घेतेय.

ड्रॉबॅक
फोन प्रत्येक वापरायच्यवेळेस दोन वेळा अनलॉक करावा लागतोय.
सेण्ड एसोएस साठी टोटल चार क्लिक कराव्या लागतात. एखाद दोन क्लिक मधुन व्हायला हवे.

मामी कल्पना चांगलीच आहे.
सावलीने जे उपकरण सांगितलेय ते पण चांगले आहे.
माझ्या आर्टिकलशिपच्या काळापासून तो भाग उजाड आहे ( तिथे मागे आशा प्लास्टीक्स होते. ) पण त्याकाळात असा धोका वाटत नसे. माझ्या सहकारी मुलीही एकट्या येत असत. थोडीफार जाग असे तिथे.
आता तर कुठलीच जागा सुरक्षित नाही असे वाटायला लागलेय.

महेन्द्रा कंपनीने पण असे एक अ‍ॅप लाँच केले आहे. अर्थात अ‍ॅप वर क्लिक करून सुरक्षिततेची हमी
मिळू शकते ह्या भ्रमात राहणे हे एक ककून मध्ये राहणार्‍या वर्गाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. चार क्रिमिनल्स अंगावर आल्यावर इतके प्रसंगावधान बाळगू शकणारी मुलगी मुळातच अश्या डेंजरस जागी संध्याकाळची जाणार नाही. जंगलात सर्वाइव करायला जंगलचेच नियम वापरले पाहिजेत. पेपर स्प्रे इज बेटर ऑप्शन. किंवा इलेक्ट्रिक टेझर.

मुळातच अश्या डेंजरस जागी संध्याकाळची जाणार नाही.>> पटलं नाहीए. मुळात हल्ली सगळ्याच जागा 'डेंजरस' होतायत, अमा.
मी इतके वर्षं एकटीच हिंडले आहे. परक्या माणसांबरोबर अनेक वेळा निर्जन शेताडीतून भटकले आहे. ज्या 'असिस्टंट्स' बरोबर हिंडले आहे तेच उद्या वाईट निघाले असते तर? कुणाचा भरवसा कसा देणार? मी कितीही प्रसंगावधानी वगैरे असले, विश्वासाच्या माणसांतर्फे ओळख काढून वावरत असले तरी कुणी काही केलं असतं तर एका मर्यादेनंतर मला काहीही करता आलं नसतं.
पण मग मला असंच ऐकवलं गेलं असतं का? की अशा 'डेंजरस' जागी कशाला गेली होतीस म्हणून? आणि संध्याकाळ काय आणि दुपार काय (मुंबई घटना संध्याकाळी ५||ची आहे)... काय फरक पडतो?

पेपर स्प्रे किंवा तत्सम उपाय एक-दोघांवर चालतील, पण जेव्हा समोर त्यापेक्षाही अधिकजण असतात तेव्हा किती लोकांवर पेपर स्प्रे एकदम चालवणार?
तरीही, काहीच नसल्यापेक्षा पेपर स्प्रे चांगला..

वरच्या सगळ्या अ‍ॅप्समधे किमान दोनतीन वेळा कीज दाबायला लागणारेत... कितपत सोयीचं आहे? Uhoh

All these apps alert either police or your relatives. They will not be nearby when you want them. That is why I have suggested an all inclusive app with a wide database.

वरदा ++

ज्या दिवशी ही बातमी आली बहुतेक त्याच दिवशी आणखी दोन बातम्या होत्या बारिकश्या कॉलममधे. ११ वर्षाची मुलगी दुपारी शाळेतुन येताना तीच्यावर अत्याचार करुन मारलं तीला. रोज बाबा शाळेत न्यायला यायचे, याच दिवशी ते गेले नव्हते. ही बातमी मुंबईची नव्हती म्हणुन म्हणा कींवा काय, ठळक झाली नव्हती. दुसर्‍या बातमीत आजोबांनी घरी रहायला आलेल्या ५ वर्षाच्या नातीवर अत्याचार केलेत.
दुपारी शाळेतुन येणे, आजोबांकडे रहायला जाणे या काही प्रसंगावधान बाळगण्यासारख्या जागा नाहीयेत पण..

फोन अ‍ॅप्स, पर्समधली मिरचीपूड, पेपर स्प्रे इत्यादी गोष्टी अपघाताच्यावेळी पर्स जवळ राहिली तरच वापरता येतील ना? Happy

त्यापेक्षा सावलीने वर लिहिलेलं गळ्यात घालायचं उपकरण अधिक उपयोगी वाटतंय. त्यापेक्षा स्वसंरक्षण, स्वबल आणि मनोबल अधिक उपयोगाचं वाटतंय.

आमीरखानच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून MARD ही संस्था स्थापन झाली आहे. मुंबईतील या घटनेच्या संदर्भात या संस्थेबद्दल काहीही ऐका-वाचायला मिळालं नाही. कोणाच्या वाचनात आलं असेल तर प्लिज लिंक द्या.

सावली, तु लिहिलेल्या उदाहरणात त्या गळ्यातल्या माळेतुनच मोठा आवाज येतो का? कधी ऐकला आहेस? प्रचंड मोठा आवाज असेल तर मुलांच्या कानांवर परिणाम होण्याची काही शक्यता असेल का?

मामी, हे application कधी तयार होईल वा न होईल पण तरीही विचार स्तुत्य व धागा काढल्याबद्दल धन्यवाद.

शिट्टी व पेपर स्प्रे जवळ बाळगण्याबद्दल तर अनुमोदन आहेच. फक्त संकटात वाजवण्यात येणार्‍या शिट्टीचा आवाज वेगळा असला जेणेकरुन लोकांना संकट आहे हे कळेल. एखाद्या कंपनीने अशा शिट्ट्या तयार करायला त्यांना संपर्क करावा लागेल म्हणा.

कालच बातम्यात दाखवले,
- पेपर स्प्रे अगदी डोळ्यात नेम धरुन मारायची गरज नाही किंवा एकाच दिशेने नेम धरुन मारयची गरज नाही. जर २-४ लोक आपल्यासमोर असतील तर हात जमेल तितका लांब करुन डावीकडुन उजवीकडे (वा उलटे) फवारत स्प्रे मारला तरी त्या धुरातुन समोरच्यांच्या डोळ्यात तिखट जाईल.

- दुसरा उपाय म्हणजे हनुवटीवर खालुन जोरात "हाताच्या पंजाच्या खालच्या भागाने" मारुन समोरच्याचे डोके मागे उडव्णे. डोके एकदम जोरात झटकले जाऊन त्याचा हल्ला जरा कमी होऊ शकतो व आपल्याला वेळ मिळु शकतो.
आता प्रत्येक उपायांत आपण वाचुच असे नसले तरी शक्यता वाढते.

सुनिधी,
त्याला बोउहान बझर म्हणतात. त्याच्याबद्दल माहिती आणि त्याचा आवाज इथे ऐकू शकतेस
हे सहा वर्षाच्या पुढच्या मुलांसाठी आहे. त्यामुळे इतका आवाज ओके वाटला मला तरी.
मी तिथे असेपर्यंत मुलीला किंवा तिच्या मित्रमैत्रिणींना गरज नव्हती. कारण पालक नेहेमीच बरोबर असतात. सहावर्षापासुनची मुलं बहुतेकदा एकटी / ग्रुपने शाळेत जातात त्यांच्यासाठी हे वापरले जाते. हल्ली जपानमधे गेले तेव्हा मुलीच्या सर्व मित्रमैत्रिणींकडे हे होतं. बर्‍याच वेळा चुकीने ओढले जाते आवाज होतो. पण सिस्टीम कार्यरत व्हायची थांबत नाही. आम्ही एकत्र होतो तेव्हाच एका मुलाचा बझर वाजला. घाईत त्याच्या आईने तो बंद केला. तितक्यातच तीला सेंटरकडुन फोन येऊन मुलाचा बझर वाजला होता. तो तुमच्याबरोबर आहे की नाही हे विचारले गेले.
खरोखरच अशी सिस्टीम इथे हवी असे वाटायला लागले.

पेपर स्प्रे मारताना आपल्या डोळ्यात उडण्याची शक्यता आहे ना. ते ही लक्षात घ्यायला हवे. रच्याकने हे पेपर स्प्रे भारतात कुठे मिळतात?

That is why I have suggested an all inclusive app with a wide database >> मामी, असा वाईड डेटाबेस असला तर त्यातल्या अनोळखी लोकांबरोबर आपली माहिती शेअर करावी लागेल ना. शिवाय डिस्ट्रेस कॉल दिला तरी खरच अनोळखी व्यक्तीला मदतीला जायला कोण तयार होणार? या सिस्टीममधे रजिस्टर करणार्‍या व्यक्तींचा खरे खोटेपणा कसा तपासुन पहाणार? हे प्रश्न आहेत.

असा वाईड डेटाबेस असला तर त्यातल्या अनोळखी लोकांबरोबर आपली माहिती शेअर करावी लागेल ना.
>>>> डेटाबेसमधल्या व्यक्तींची माहिती एकमेकांना कळणार नाही असं पाहता येईल.

शिवाय डिस्ट्रेस कॉल दिला तरी खरच अनोळखी व्यक्तीला मदतीला जायला कोण तयार होणार? >>>> तसं पाहिलं तर समोर कोणी संकटात आहे हे दिसत असूनही कोणी मदतीला येणार नाही असंही होऊ शकतं. मुळात जास्त लोकांपर्यंत डिस्ट्रेस कॉल गेला तर त्यातील ३-४-५ तरी येतील. अजून जास्ती लोकांपर्यंत गेला तर अजून जास्त येतील.

या सिस्टीममधे रजिस्टर करणार्‍या व्यक्तींचा खरे खोटेपणा कसा तपासुन पहाणार? >>> काही समाजकंटक व्यक्तीही असू शकतील. पण धावून येणार्‍या ५ जणांतला १ जण तसा असेल तरी बाकीचे खरोखरच मदतीला येऊ शकतात.