दाभोळकरः अभिप्राय आणि टिप्पणी

Submitted by नरेंद्र गोळे on 20 August, 2013 - 22:58

त्यांची हत्या ही महाराष्ट्राचा वैचारिक र्‍हास दाखवणारी ठरते.>>>>
त्यांची हत्या ही खुन्यांचा वैचारिक र्‍हास दाखवणारी ठरते. महाराष्ट्राची वैचारिक बैठक ठाम आहे. ती अशा हत्यांनी डळमळणारी नाही.

दाभोळकरांवर असा पूर्वनियोजित हल्ला होणं ही सोकॉल्ड पुरोगामी महाराष्ट्राकरता अत्यंत शरमेची बाब आहे.>>>>>
मुळीच नाही. शरम तर खुन्यांना वाटायला पाहिजे. महाराष्ट्रानी कुठलेही निंदनीय कृत्य केलेले नाही. तो तर दाभोळकरांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!

भ्याड हल्ल्यात हत्या झाली.>>>>
छे! खुन्याने अख्ख्या महाराष्ट्राच्या कायद्याविरुद्ध जाण्याचे दुस्साहस केलेले आहे. त्यामुळे खुनी हल्ल्यात हत्या झाली असेच म्हणावे. अशा दुस्साहसास खुनी धजावू नयेत एवढे शासन प्रभावी नाही. हेच तर दुर्दैव आहे.

विचारांची लढाई विचारांनीच लढली जाते’ अशी ’अंधश्रद्धा’ बाळगणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते नरेंद्र दाभोळकरयांची मंगळवारी हत्या करण्यात आली.>>>>
अतिशय समर्पक वर्णन! ’विचारांची लढाई आचारांनीही लढली जाऊ शकते’ अशी श्रद्धा बाळगणारे आहेत तोवर स्वसंरक्षणाचे अतिरिक्त उपाय करायलाच हवेत.

हत्या केल्याने तरूण महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ नष्ट करण्यात आपण यशस्वी होऊ असा भ्रम कोणी बाळगू नये. >>>
सत्यवचन! पुरोगामी चळवळ मुळीच लेचीपेची नाही.

विधेयक टाळण्याची ’करणी’ शासन करते ।
विचारांची ही लढाई ’खुनी’ आचारे लढते ॥
अंधश्रद्ध’ नाही प्रजा, सारे राष्ट्र हे दावते ।
दिवा पुरोगामित्वाचा, प्रजा आदरे उजळे ॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जे कुणी खूनी होते ते सुपारी घेऊन हत्या करणारे असतील तर आपण कुणाची हत्या केलीये याची गंधवार्ताही त्यांना नसेल. एका नि:शस्त्र माणसाला मारायचे इतकंच त्यांना माहीत असावं. कदाचित हत्येनंतर टीव्हीवर आपण काय केलं याची माहिती त्यांना मिळाली असेल. मारेक-यांपेक्षा त्यामागचे सूत्रधार कोण आहेत हे समोर यावं. ते कधीच होत नाही हे दुर्दैव आहे.

देवेंद्र फडणीस म्हणतात, "शासनाचा दराराच राहिलेला नाही!"

भर सकाळी, मध्य शहरात, मारेकरी मोकाट फिरतात ह्याचा जाब शासनाने नाही तर कुणी द्यायचा?

< महाराष्ट्राची वैचारिक बैठक ठाम आहे. ती अशा हत्यांनी डळमळणारी नाही.>
टिप्पण्णीवर टिप्पण्णी : महाराष्ट्राची वैचारिक बैठक ठाम आहे. ती अशा दाभोलकरांसारख्यांमुळे डळमळत नाही.

टिप्पण्णीवर टिप्पण्णी : महाराष्ट्राची वैचारिक बैठक ठाम आहे. ती अशा दाभोलकरांसारख्यांमुळे डळमळत नाही.>>>>> असाही एक पक्ष आहे?