मिठीस गच्च त्या तुझ्या करीन लख्ख पौर्णिमा

Submitted by वैवकु on 19 August, 2013 - 13:50

पडेल जर तुझे खळे बनीन रोज चंद्रमा
मिठीस गच्च त्या तुझ्या करीन लख्ख पौर्णिमा

असेल जे घडायचे तसेच होत राहते
कशास आपली अशी वहायची खुळी तमा

खुबी कमी स्वतःस माहिती हवीच आपली
कुणी म्हणेल पावटा कुणी म्हणेल राजमा

हळू उगाळ वेगवान आठवण तिची मना
उगाच धाप लागते उफाळतो तुझा दमा

उभी हयात विठ्ठला तुझाच शेर मांडला
म्हणून उतरला असेल शायरीत काळिमा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पडेल जर तुझे खळे <<< इतका भाग बदलून हवा आहे प्लीज कुणीतरी मदत कराल का Happy

असे कसे वाटते >>> अशी सुखावशील तर बनीन रोज चंद्रमा >>> Uhoh

असेल जर खळे तुझे,बनेन रोज चंद्रमा.<<<
एक्झॅक्टली अशीच केली होती काल मी मनातल्यामनात !!! धन्स सर

बनेन करेन बरोबरचय पण मला खालच्या ओळीत करीन जास्त आवडलेलं वर त्या करीन मुळे बनीन केलेलं
ह्या मुद्द्यावर अजून जरावेळ विचार करून बदल करीन ....ओह् सॉरी 'करेन' Happy