स्विस सहल - भाग १/३ इन टु द आल्प्स - डेविल्स ब्रिज

Submitted by दिनेश. on 19 August, 2013 - 03:41

र्‍होन ग्लेशियरलाच आम्हाला पावसाने गाठले होते. त्यामूळे डेविल्स ब्रिज पावसातच बघावा लागला. पावसाला मी भित नसलो तरी कॅमेरा मात्र जपावा लागत होता. त्यामूळे अर्थातच फोटो काढण्यावर मर्यादा आली.

खरं तर हा एक पूल आहे पण त्यामागे मोठा इतिहास आहे. उत्तर युरपमधून दक्षिणेकडे जाताना, खास करुन इतालीकडे जाताना एक नदी Reuss River पार करावी लागते. या भागात हि नदी एका खोल गॉर्ज मधून Schöllenen Gorge वाहते.

व्यापारासाठी ती पार करण्यासाठी म्हणून सन १२३० मधे पहिला लाकडी पूल बांधण्यात आला. पण तो वारंवार कोसळत असे. सोळाव्या शतकात पहिल्यांदा तिथे दगडी पूल बांधण्यात आला. १७९९ मधल्या इताली आणि स्विस लढाईत तो पूर्णपणे कोसळला आणि पर्यायी मार्ग शोधण्यात आला.

पुढे तो परत बांधायला सुरवात झाली पण तो वारंवार कोसळत असे. त्याच काळात एक मिथक निर्माण झाले आणि त्यावरूनच या पूलाला हे नाव पडले. मी ऐकलेले व्हर्जन असे. (नेटवरचे वेगळे आहे. )

हा ब्रिज बांधता येत नसल्याने तिथल्या गावप्रमुख म्हणाला, केवळ सैतानच हा बांधू शकेल. ते नेमके सैतानाने ऐकले. तो बांधून द्यायला तयार झाला पण त्याने अट घातली, या पूलावरून जाणार्‍या पहिल्या व्यापार्‍याचा मी बळी घेणार. गावाने हि अट मान्य केली पण सैतानाने पूल बांधल्यावर मात्र कुणी त्यावरून जायला तयार होईना.

शेवटी गावप्रमुखाची सुंदर मुलगी त्यावरून जायला तयार झाली. तिच्या सौंदर्यावर सैतान भाळला आणि तिचा बळी घेण्यासाठी हाती घेतलेली शिळा त्याने दूर भिरकावली ( २२० टनाची हि शिळा आजही खालच्या भागात दिसते. आपण ती पुढच्या भागात बघू. ) हि कथा आमच्या गाईडने आम्हाला ऐकवली. नेटवर एका
बकर्‍याचा उल्लेख आहे. ( युरपमधल्या अनेक पुलांना डेविल्स ब्रिज म्हणतात आणि प्रत्येक पूलाशी निगडीत एक कथा असते. )

पुढे रहदारी वाढली तशी याच पूलावर आणखी एक पूल बांधण्यात आला. पण जून्या पूलाला धक्का लावलेला
नाही.
अजूनही ती गॉर्ज उरात धडकी भरवतेच. सध्या त्या नदीला कमी पाणी आहे पण ज्यावेळी बर्फ वितळत
असेल त्या वेळी नक्कीच पूर येत असणार.

आजूबाजूच्या डोंगरातून अनेक बोगदे केलेले आहेत आणि तिथून आपण या पूलाचे सर्व कोनातून दर्शन घेऊ शकतो. स्विस लोकांना डोंगर पोखरायची जणू हौसच आहे, आणि आमचे सगळे डोंगर आतून पोकळ आहेत
असे ते गमतीने म्हणतात.

ज्यावेळी जग अणुयुद्धाच्या छायेत होते त्या काळात, नवीन घर बांधणार्‍याने एक बंकरही तयार करावा, असा
नियम होता. त्याकाळात निर्माण झालेले अनेक बंकर्स आता गूगल आपला बॅकप डाटा ठेवण्यासाठी वापरते.
( सध्या गूगलचे हेडक्वार्टर्स झुरीक मधे आहे. )

या पूलाभोवतीचा वाटा फक्त माणसांसाठीच आहेत. पण त्या अत्यंत सुरक्षित आहेत. त्या परीसरात, कड्यांवर
खुपच संदर फुले होती. त्यातले केवळ काही नमुनेच इथे पेश करतोय.

या पास जवळच आता तब्बल ५७ किमी लांबीचा एक रेल्वे टनेल बांधून तयार आहे. सध्या त्यात सिक्यूरिटी इक्विपमेंटस बसवण्याचे काम चालू आहे.

तर चला ...

त्या नदीचे पहिले दर्शन

हा नवा पूल

डोक्यावर पावसाचे ढग होतेच

त्या काळात अर्थातच वाहतूक बग्गीतून होत असे. त्या काळातला ड्रेस केलेला एक बग्गीवाला.

खोल गॉर्जमधे जाणारी नदी.

हा डेविल्स ब्रिज

त्या लढाईचे चित्रण करणारे एक पेंटींग तिथे आहे. ( या लढाईवर अनेक चित्रकारांनी चित्रे काढली आहेत. )

जूना आणि नवा पूल

देखणा गुलाबी तूरा

हंडीसारखे फुल

जांभळी फुले

खाली जाणारी नदी

दगडात कोरलेले स्मारक

दोन्ही ब्रिज जरा लांबून

जून्या पूलाकडे येणारा रस्ता

परीसरातली हिरवाई, यातच वरची फुले होती

बंगी जंपिंग.. ( त्या माणसाच्या आकारामूळे पूलाच्या आकाराची कल्पना येईल. )

दूसर्‍या बाजूने पूल

जरा खालच्या बाजून नदी

गॉर्ज

नदीकडे जायची वाट..

याबरोबरच पहिली सहल संपली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच. Happy
स्मारकाच्या खाली असलेली लिपी रोमन नाहीये, (सिरिलिक/रशियन वाटते आहे.) ते कसे काय?

हरी हरी वसुंधरापे नीला नीला ये गगन
ये किसपें बादलोंकी पालकी उडा रहा पवन
दिशांए देखो रंग भरी चमक रही उमंग भरी
ये किसने फूल फूलपे किया सिंगार है
ये कौन चित्रकार है...

हिमालय,काश्मीर्,कॅनडा आणी युरोपचे सौंदर्य पाहिले की असेच म्हणावेसे वाटते आणी दिनेशजी तुम्ही अशी सहल आम्हाला घरबसल्या घडवत आहात त्याबद्दल धन्यवाद्.:स्मित:

नदीचे फोटो आणी तिची खोली जबरी आहे. खरच धडकी भरते. का कोण जाणे पण मला स्विस, जर्मनी आणी ऑस्ट्रिया अशा ठिकाणचे फोटो पाहीले की दुसर्‍या महायुद्धाची आठवण येते आणी व्हेअर इगल्स डेअर हा चित्रपट सारखा डोळ्यासमोर येतो. विशेषतः तो पुलाचा फोटो. अजून येऊ द्या.

सुरुवातीचे फोटो बघुन पुल किती मोठा असेल हे कळत नाही. पण बंजी (का बुंगी) जंप आणि नंतरचे फोटो बघुन खरच धडकी भरते... Happy