तुला बदनाम करतो मी.....

Submitted by वैवकु on 13 August, 2013 - 13:02

कधी नव्हतीच माझी ना विरोधी बाकड्यासाठी
युती करणार नाही मी तुझ्या एका मतासाठी

कसे मग यायचे शिकता कसे वागायचे असते
बरे असतेच लोकांनी फसवणे आपल्यासाठी

तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुला इतक्यात सल्ला व्यक्तिगत मागू कशासाठी

फलाटे रूळ यांसाठी श्रमवले दु:ख मी माझे
सुखा तू 'आग'-गाडी आण त्याच्या सार्थकासाठी

मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्‍यासाठी

मला जाणीव असते विठ्ठला तू स्तुत्य असल्याची
तुला बदनाम करतो मी स्वतःला निंदण्यासाठी

________________________________________________

मध्यंतराच्या काळातली ही गझल मायबोलीकरांसोबर शेअर करायला विसरलोय हेच विसरलो होतो .क्षमस्व .आज आठवले Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्‍यासाठी >> हे खूप आवडले.

मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्यासाठी

मला जाणीव असते विठ्ठला तू स्तुत्य असल्याची
तुला बदनाम करतो मी स्वतःला निंदण्यासाठी >>> सुरेख शेर..!

मतलासुद्धा खूप आवडला. ले.शु.
धन्यवाद!

छान...

कसे मग यायचे शिकता कसे वागायचे असते
बरे असतेच लोकांनी फसवणे आपल्यासाठी

तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुला इतक्यात सल्ला व्यक्तिगत मागू कशासाठी

मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्‍यासाठी

वा ! सहजता खुप आवडली शेरातील.

अख्खी गझल जमून आलेली.
मनाचे कायदे हरतील ह्या एकाच भीतीने
कधीही भांडलो नाही स्वतःशी मी खर्‍यासाठी

मला जाणीव असते विठ्ठला तू स्तुत्य असल्याची
तुला बदनाम करतो मी स्वतःला निंदण्यासाठी

अगदी पटले, पोचले शेर.

एकदम छान...
"कसे मग यायचे शिकता कसे वागायचे असते
बरे असतेच लोकांनी फसवणे आपल्यासाठी "
क्या बात है!!

अमेय धन्स
मारुतीकांबळे खरे लिहिल्याबद्दल विशेष आभार Happy (आज आपणास प्रथमच पाहिले ..निदान ह्या नावाने तरी )