नवीन राज्य निर्मीतीचे राजकारण

Submitted by नितीनचंद्र on 11 August, 2013 - 08:37

काँग्रेसने नाईलाजाने तेलंगणाला मान्यता दिल्यानंतर विदर्भ असो, बोडोलँड असो अश्या अनेक जुन्या मागण्या रस्त्यावर आल्या. हीच परिस्थीती नेहरुजींच्या काळात होती. इंग्रजांनी निर्माण केलेली चार राज्ये - १८ राज्यात परिवर्तीत झाली. या सगळ्यामागचा आधार होता भाषेवर आधारीत प्रांतरचना जी काँग्रेसला मान्य नव्हती.

अनेक आंदोलने, सत्याग्रह आणि एका उपोषणानंतर चेन्नीला झालेल्या मृत्युनंतर भाषावर आधारीत राज्य निर्मीतीला असलेला विरोध मागे पडला.

भाषेच्या आड अप्रभावी नेत्यांनी सत्ताअभिलाषा सुध्दा या आंदोलनात प्रभावी असावी.

आज भाषेच्या आधाराचे कारण प्रभावी राहीले आहे कारण ५-१० मैलामागे भाषा बदलते. पण हिंदी भाषीक राज्यांचे आणखी किती तुकडे होणार आहेत माहीत नाही.

वेगळा विदर्भ कसा चुकिचा आहे. सरकारी नोकरांचे पगार द्यायला महसुल किती लागतो यावर श्रीकांत जिचकार या विदर्भातल्या नेत्याचा अभ्यासपुर्ण लेख पुन्हा पुन्हा वाचल्या शिवाय वेगळ्या विदर्भाची मागणी किती अव्यवहार्य आहे हे नेत्यांना पटणार नाही.

भाजपाच्या राज्यात उत्तरांचल ( उत्तराखंड ) या राज्याच्या नावाबाबत एकमत नसलेल्या आणि अश्या ३-४ राज्यांची निर्मीती झाली. तेलंगणच्या मुद्यावर आम्ही लहान लहान राज्यांच्या निर्मीतीच्या धोरणाचा हलक्या आवाजात का होईना भाजपाने उच्चार केला.

काय साधाणार आहे अनेक लहान राज्ये निर्माण करुन ? खरच इतकी प्रशासकीय आवश्यकता आहे की यातुन पुन्हा पुन्हा याच मागण्या वाढत राहुन प्र्त्येक जिल्ह्याचे एक राज्य निर्माण व्हावे ही परिस्थीती येई पर्यंत चालु ठेवायचे याचा उलगडा होणे गरजेचे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितीनचंद्र,

जिचकारांच्या लेखात एक लक्षवेधक विधान सापडलं.

>> Compared to the rest of Maharashtra, the number of Schools and Colleges in Vidarbha
>> are more.

याचा अर्थ विदर्भात शिक्षणाची तरतूद आहे. मात्र हे शिक्षण उपजीविकेस योग्य नसावे. अर्थात, ही रड सार्‍या भारताचीच आहे. परंतु घाटावर/कोकणात जशी कृषी विद्यापीठे दिसतात (बरोबर बोललो का?) तशी विदर्भात आहेत का? कृपया चूकभूल देणेघेणे. मला या बाबतीत फारशी माहिती नाही. गंगाधर मुटे हे मायबोलीकर नाव चटकन डोळ्यासमोर आलं.

विदर्भाची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे, हे जिचकारांच्या लेखातलं निरीक्षण आहे. ते मी जसंच्या तसं खरं धरलं आहे.

आ.न.,
-गा.पै.

महाराश्त्रात प्रत्येक विभागात एक कृषी विद्यापीठ आहे. विदर्भात ते अकोल्याला पंजाबराव देशमुख कृ वि या नावाने आहे... धन्यवाद

<< हा मनुष्य त्यावेळी राज्यमंत्री (?) होता. >> माझ्या माहितीनुसार श्रीकांत जिचकर हे दुर्मिळ असे अत्यंत उच्चशिक्षित, हुषार व अभ्यासू राजकारणी होते. या तरूण नेत्याबद्दल त्यावेळीं तरी खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. [ अर्थात, या विषयावरच्या त्यांच्या मताच्या स्विकार्हतेशीं याचा संबंध जोडण्याचा हेतू नाही ].

Pages