त्या पाच जवानांचे हौतात्म्य

Submitted by शरद on 9 August, 2013 - 10:55

आश्चर्य वाटले! आपले पाच जवान सीमेवर शहीद होतात आणि कुणाला त्यांचं सोयरसुतक नसावं!
चर्चा झाली. कशाची? अँथोनी काय म्हणाले, त्यांनी आपले विधान कसे बदलले, मुंडेंची जीभ कशी पुन्हा एकदा घसरली, भीमसिंगांनी काय मुक्ताफळे उधळली आणि पृथ्वीराज चव्हाण मानेंच्या अंत्यविधीसाठी का जाऊ शकले नाहीत याची!

पाकडे जेव्हा आमच्या जवानांवर हल्ले करतात तेव्हा आम्ही का ताबडतोब बदला घेत नाही याची चर्चा कुठेही नाही. का? आमचे सैनिक इतके नेभळट आहेत! मुळीच नाही. कारगिलचे युद्ध ही गोष्ट आरशासारखी स्पष्ट करते. आमच्या सैनिकांचे हात बांधलेले आहेत. राजकीय निर्णय होईपर्यंत ते काही करू शकत नाहीत. पाकिस्तान मध्ये तसे नाही. तिथे सैन्याचंच राज्य आहे.

त्यातच आमचे नेते काय काय मुक्ताफळे उधळतात. म्हणे 'सैनिक मरण्यासाठीच भरती होतात.' असे जर आमचे नेते बोलत असतील तर सैनिकांचे मनोधैर्य कुठे जाईल. या संदर्भात मला अमेरिकन जनरल पॅटन यांचं एक विधान सांगावंसं वाटतं. सैन्यासमोर बोलताना ते एकदा म्हणाले होते:-- "You DO NOT make the supreme sacrifice of your life for your country. Let the other basturd make the supreme sacrifice of HIS LIFE for HIS COUNTRY!" <तुम्ही आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊ नका, त्या XXXX ला त्याच्या देशासाठी प्राणांची आहुती द्यायला भाग पाडा!>

आमच्या जवानांमध्ये ही वृत्ती नक्कीच आहे. संधी तर देऊन बघा!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाइन ऑफ अ‍ॅक्च्युअल कंट्रोल असा काही कन्सेप्ट आहे का?
सीमेवर तारांचे कुंपण घातले जत असल्याच्या बातम्या वाचल्या आहेत.
या बातमीतला फोटो पहावा.

नाही मयेकर..... त्या युध्दानंतर जो जिथे राहिला तो भाग त्याचा याचा आधार घेउन लाईन ऑफ कंट्रोल दोघांच्या चर्चेमधुन स्थापन झाली आहे...जी काही ठिकाणी भारताला आणि काही ठिकाणी पाकिस्तानाला मान्य नाही...
,
,
,जसे चीन आणि भारत यांच्यात मॅकमोहन लाईन आहे.. आणि त्यावर सुध्दा संघर्ष आहे तोच प्रकार इथे आहे

उदयन.... अगदी तांत्रिक नसला तरी एक व्यावहारिक सुविधेचा प्रकार म्हणून तो एल.ओ.सी. चा प्रकार दोन्ही राष्ट्रांनी पाळल्याचे दिसत आहे. या एल.ओ.सी. वर ना युनोने ना अन्य मित्र राष्ट्राने लक्ष घातल्याचे दिसत नाही. किंबहुना परिस्थिती त्या त्या वेळेची हालचाल पाहून हाताळणे ही एकमेव बाब आपल्या हाती आहे.

विकीवर मला एक नकाशा मिळाला आहे, जो काश्मिरचे तुकडे [अनधिकृत] कशा रितीने झाले आहेत हे दर्शवितो. यातील हिरवा प्रांत या घडीला पाकव्याप्त आहे तर भगवा भारताकडे. एल.ओ.सी. ठळकपणे दिसत्येच.

522px-Kashmir_map.jpg

यातील हिरवा प्रांत या घडीला पाकव्याप्त आहे तर भगवा भारताकडे .>>> हो.. परंतु आपल्या अधिकृत नकाशात तो भाग भारताचाच दाखवतात आजच्या घडीला

Government of India composing “befitting reply” to Pakistan

india.JPGNone of the action buttons were clicked when reports last came in.

मनमोहनसिंग यांचं जुनं विधान आठवतं. पाकिस्तानमध्ये कोणाशी बोलावं हेच कळत नाही. करणी आर्मीची बोल पंतप्रधानाला? कारण पंतप्रधानची आर्मीवर काहीही हुकुमत नाही.

ते म्हणाले की शत्रूने आपला एक जवान मारला तर आपण त्यांचे शंभर जवान मारेपर्यंत उसंत घेत नाही.
>>>
हे उलटेही असेल ना? म्हनजे आपण त्यांचा एक मारला तर तेही आपले १०० मारेपर्यन्त उसन्त घेत नसतील ना ? कदाचित त्यांचा फॉर्म्युअला वेगळा असेल. मग पुन्हा आपन.. असा गुणाकार करीत रहायचे असते का? मग दोन्ही कडची आर्मी 'सावकार भिकारी'खेळातल्या चलना प्रमाणे सम्पून जाईल ना?

सिंधुरक्षकवर १८ जण मरण पावले, त्या १८ मृतांना हुतात्मा म्हणणार का ?

की अपघाती मृत म्हणुन घोषीत करणार ?

<<सिंधुरक्षकवर १८ जण मरण पावले, त्या १८ मृतांना हुतात्मा म्हणणार का ? की अपघाती मृत म्हणुन घोषीत करणार ?>>

आपला हेतु वाद निर्माण करण्याचा आहे काय? नसावा असे गृहित धरून उत्तर लिहितो. कुठल्याही रक्षकदलात (आर्मी, नेव्ही, एयरफोर्स) असे प्रसंग उद्भवत असतातच. त्यांची वर्गवारी करण्याचे नियम आहेत. शत्रुच्या सानिध्यात आणि शत्रुच्या कारवाईमुळे मृत पावलेले जवान हा सर्वात उच्च वर्ग. अशा मृतांच्या कुटुंबियांना शेवटच्या पगाराइतकी १००% करमुक्त फॅमिली पेन्शन मिळते. शत्रुच्या सानिध्यात नसताना परंतु शत्रुच्या कारवाईमुळे मृत पावलेले जवान हा दुसरा वर्ग. फिल्ड एरिया मध्ये शत्रुच्या सानिध्यात नसताना आणि शत्रुच्या कारवाईशिवाय मृत पावलेले जवान हा तिसरा वर्ग. आणि अन्य अपघाती मरण हा चौथा वर्ग.

माझ्यामते "सिंधुरक्षक" तिसर्‍या वर्गात मोडते. जर शत्रुकडून घातपात झाला असेल ( शक्यता नाकारता येत नाही) तर कदाचित दुसर्‍या वर्गात येईल. पण नेव्हीने ही शक्यता धुडकावून लावली आहे; म्हणजे तिसरा वर्गच येईल.

हुतात्मा या शब्दाची रक्षक दलांकडे व्याख्या नसावी असे वाटते. कारण तो सापेक्ष शब्द आहे असे माझे मत आहे.

Pages