त्या पाच जवानांचे हौतात्म्य

Submitted by शरद on 9 August, 2013 - 10:55

आश्चर्य वाटले! आपले पाच जवान सीमेवर शहीद होतात आणि कुणाला त्यांचं सोयरसुतक नसावं!
चर्चा झाली. कशाची? अँथोनी काय म्हणाले, त्यांनी आपले विधान कसे बदलले, मुंडेंची जीभ कशी पुन्हा एकदा घसरली, भीमसिंगांनी काय मुक्ताफळे उधळली आणि पृथ्वीराज चव्हाण मानेंच्या अंत्यविधीसाठी का जाऊ शकले नाहीत याची!

पाकडे जेव्हा आमच्या जवानांवर हल्ले करतात तेव्हा आम्ही का ताबडतोब बदला घेत नाही याची चर्चा कुठेही नाही. का? आमचे सैनिक इतके नेभळट आहेत! मुळीच नाही. कारगिलचे युद्ध ही गोष्ट आरशासारखी स्पष्ट करते. आमच्या सैनिकांचे हात बांधलेले आहेत. राजकीय निर्णय होईपर्यंत ते काही करू शकत नाहीत. पाकिस्तान मध्ये तसे नाही. तिथे सैन्याचंच राज्य आहे.

त्यातच आमचे नेते काय काय मुक्ताफळे उधळतात. म्हणे 'सैनिक मरण्यासाठीच भरती होतात.' असे जर आमचे नेते बोलत असतील तर सैनिकांचे मनोधैर्य कुठे जाईल. या संदर्भात मला अमेरिकन जनरल पॅटन यांचं एक विधान सांगावंसं वाटतं. सैन्यासमोर बोलताना ते एकदा म्हणाले होते:-- "You DO NOT make the supreme sacrifice of your life for your country. Let the other basturd make the supreme sacrifice of HIS LIFE for HIS COUNTRY!" <तुम्ही आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊ नका, त्या XXXX ला त्याच्या देशासाठी प्राणांची आहुती द्यायला भाग पाडा!>

आमच्या जवानांमध्ये ही वृत्ती नक्कीच आहे. संधी तर देऊन बघा!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच एका निवृत जवानाशी बोललो. भारताची स्वतःची मुल्ये आहेत असे तो म्हणाला. त्यांनी डोकी कलम केली म्हणुन भारत अशी प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

शंकरदेव राय यांच्या काळात एका मुघल राज्याने हरलेल्या राज्याचे डोके कापुन संडासचे घाण पाणी पाहेर पडेल अश्या ठिकाणी ते लावायची व जनतेने पहाण्याची व्यवस्था केली होती म्हणे.

शिवाजी महाराजांनी सुध्दा अफजलखानाच्या प्रेताची जी व्यवस्था केली ती आज आजच्या सरकारच्या कृपेने शाबुत आहे.

कुत्र्याचे नाव टिप्पु ठेवण्याची पध्दत महाराष्ट्रात प्रतिक्रियात्मक होती किंवा कसे याचा खुलासा होत नाही पण बर्‍याच कुत्र्यांना कसाब नावाने संबोधले जाते.

आपले संधीसाधु राजकारणी संधी देतील? आपल्याला फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलाच सैन्याची आठवण प्रकर्षाने होते.

पुढच्या जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पाकिस्तान शी कारगिल टाईप युध्द होउ शकेल..

याची आता चाचपणी चालु आहे आपल्या राज्यकर्त्यांकडुन...... सगळा दोन्हीबाजुंच्या सत्तेचा खेळ आहे त्यात
सामान्य जनता आणि प्राणपणाने लढणारे सैनिक भरडले जातात

तो संस्कृती आणि विकृती यातला फरक आहे.दुर्दैवाने संस्कृतीवाल्याना भ्याड समजले जाते.
अगदी आधीपासून ते कारगिल पर्यंत तसेच त्या नंतरही मृत देहाची विटंबना करणे हा त्यांचा धर्म राहिला आहे.
आपले सैनिक हकनाक बळी पडतात त्याचा खेद जरूर होतो. खेद कशाला चीड येते.पण Tit For Tat हे आपले
धोरण कधीच नसते.निषेध व्यक्त केला की जबाबदारी संपली! १५ ऑगस्टला सैनिक हो तुमच्यासाठी वगैरे गळे
काढ्ले की देशप्रेम झाले.
जे राष्ट्र आज इतक्या कुरापती काढते आणि आपण सहन करतो.याला काय म्हणणार! लोकसत्तेतील जवानांच्या
आईंचे पत्र वाचले की शरम वाटते.

<पाकडे जेव्हा आमच्या जवानांवर हल्ले करतात तेव्हा आम्ही का ताबडतोब बदला घेत नाही याची चर्चा कुठेही नाही. का? > बदला घेत नाहीत असे कसे?
शेखर गुप्ता यांच्या इंडियन एक्सप्रेसमधील लेखातून : Even as we all vented in public debate and our government cynically bought peace with us all by throwing out Pakistani sportsmen, singers and businessmen, our army had got even in its own way, killing not two but three Pakistani soldiers in the same general area where the beheading incident happened. This is precisely what the army chief had said then in his press conference: that these are local incidents, and the army knows how to deal with them. Ok, the army may have still fallen short of Sushma Swaraj's expectations by seven, and in not bringing the heads back (she had demanded 10 Pakistani heads), but this is a very, very tough, efficient and unforgiving army. And you can be sure that the score for the five lives lost in Poonch will be more than settled soon enough. Except, they won't invite OB vans to cover this live. This is not a victim army, abandoned by the political class and the nation, or used as gun fodder. The last thing the world's fourth most powerful army deserves is the rest of us feeling sorry for it.
दोन भारतीय सैनिकांचा पाक सैन्याकडून शिरच्छेद झाला साधारण त्याच भागात भारतीय सैन्याने तीन पाक सैनिकांना ठार केले. आताच्या पाच सैनिकांवरील प्राणघातक हल्ल्याच्या काही दिवस आधीच भारतीय सैन्याने पाच घुसखोरांना ठार केले होते. पाक वृत्तपत्रांनी या लोकांना भारतीय सैन्याने त्यांच्या गावांतून उचलून नेले होते अशी बातमी दिली होती.

पाक आर्मी स्वतःचे महत्व वाढवण्यासाठी हे सगळं करतेय का?
राजकारण्यांना त्यांची जागा दाखवल्या जाईलच, हे नक्की.

विजय देशमुख "राजकारण्यांना त्यांची जागा दाखवल्या जाईलच" हे वाक्य कर्तरी प्रयोग वापरून पुन्हा लिहाल का?

वाटल्यास "हे वाक्य पुन्हा कर्तरी प्रयोग वापरून तुमच्याकडून लिहिल्या जाईल का?"

(माझा हा प्रतिसाद फक्त व्याकरणाशी संबंधित आहे)

मी ते २०१४ च्या संदर्भात लिहिलय. त्यावेळी (जनता) त्यांना त्यांची जागा दाखवून देईलच.

का कुणास ठाऊक, पण काही दिवसांपासुन कलियुगाचा अंत जवळ आल्यासारखा वाटतोय. (की मलाच भास होतोय?)

भरत मयेकरांशी पूर्ण सहमत,

हे दाखवल्या जाईल, नऊ वाजल्या होते वगैरे प्रकारचे प्रयोग इतके वारंवार का होत आहेत? कोण हे करत आहे? का करत आहे?

बाकीच्या देशात ज्या प्रकारे उलथापालथ होत आहे, त्या वेळेची राजकारणी वाट पाहत आहेत काय? अगदी छोट्या खुर्चीसाठी हमरीतुमरीवर लोक येत आहत. त्यांना देशाप्रती देशातील जवानांप्रती कुठलीही आस्था नाही. २ , ३ लाख दिले की पुरे. ते सुध्दा स्वतःच्या खिशातुन थोडी जातात. इतके मुर्दाड झालेत राजकारणी.

युद्ध हा तोडगा आहे का?
९/११ च्या हल्ल्यातील बळींची संख्या : २९९६
त्यानंतरच्या वॉर ऑन टेररमधील अमेरिकन बळींची संख्या : ६७१७

कलियुगाचा अंत जवळ आल्यासारखा वाटतोय.

लोकसभा आली की काही लोकान्ना असे भास होतात.

आणि निवडणुकीचा निकाल लागल्यावरही ते भास भासच रहातात

<<कलियुगाचा अंत जवळ आल्यासारखा वाटतोय.>>

नकीच कलियुगचा अंत जवळ आलाय. केदारनाथचा प्रलय हे एक छोटेसे ट्रेलर होते.

माझ्या नात्यात एक मेजर होते. ते आसाम येथे सिलिगुडीला असत. त्यांनी मला एकदा सांगितले की बॉर्डरवरची खरी धुमश्चक्री सामान्यांपर्यंत पोहोचत नाही व पोहोचवली जातही नाही. ते म्हणाले की शत्रूने आपला एक जवान मारला तर आपण त्यांचे शंभर जवान मारेपर्यंत उसंत घेत नाही. (एकास शंभर हे प्रमाण अगदीच गप्पांच्या ओघात आलेले फुशारकीयुक्तही नव्हते. ही मेंट इट)

कोणास ठाऊक? त्या पाच जवानांच्या हत्येनंतर आपल्या सैनिकांनी अनेक पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी पाठवलेही असेल.

भरत, तुम्ही लिंक दिलेले आर्टीकल हे पूर्णतः एकांगी वृत्त आहे. जणु काही ते कुणी पाकिस्तानी रिपोर्टरने लिहिल्यासारखे वाटते. तरीसुद्धा त्याचाच आधार घेऊन मी सांगू इच्छितो की, पाकिस्तान्यांनी केलेली कृती (आमच्या भागात येऊन घात लावून आमच्या गस्तपथकावर हल्ला करणे) आणि आमचे सैनिक करत असलेली कृती (आमच्या भागात घुसखोरी करत असणार्‍या आतंकवादी पथकावर, त्यांच्या वाटाड्यांवर आणि त्यांना मदत करत असणार्‍या पाकिस्तानी लोकांवर हल्ला करणे) यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यांचे किती जवान गेले आणि आमचे किती गेले हा प्रश्न इथे गौण ठरतो. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग कुणी, कधी आणि कसा केला हे जास्त महत्वाचे ठरते. मी जास्त तपशिलात जात नाही; पण वर मी लिहिलेले माझ्या माहितीनुसार सत्य आहे.

गेल्या महिन्यात मी दोनदा LOC च्या जवळ होतो आणि मिल्ट्री मधील अनेकांशी खूप चांगल्या गप्पा मारल्या. फर्स्ट हॅन्ड इन्फो वरनं हे मी नक्कीच सांगू शकतो की, आपणही त्यांना अगदी तसेच मारले. फक्त इकडे मुंडके आणले नाही. सीमावर्ती भागात राहणार्‍या नागरिकांनाही भरपूर माहिती असते आणि अश्या नागरिकांकडून अशी माहिती मिळाली की रोज असे अप्रत्यक्ष युद्ध चालू असते.

आता विचार करा की रोजच गोलाबारी का? तर सीमेवर घुसखोरी करण्यासाठी. गेल्या एक वर्षात हे प्रकार परत वाढले आहेत असे तर आता प्रेसही म्हणत आहेच.

आमचे सैनिक करत असलेली कृती (आमच्या भागात घुसखोरी करत असणार्‍या आतंकवादी पथकावर, त्यांच्या वाटाड्यांवर आणि त्यांना मदत करत असणार्‍या पाकिस्तानी लोकांवर हल्ला करणे) यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यांचे किती जवान गेले आणि आमचे किती गेले हा प्रश्न इथे गौण ठरतो. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग कुणी, कधी आणि कसा केला हे जास्त महत्वाचे ठरते. >>.

राईट. आपण त्यांच्याकडे घुसून वगैरे असे काही करत नाही हे ही खरेच आहे. ते जे वरच्या लिंक मधील चार लोकं मारले ते पण सिमारेष्याच्या अल्याड आलले लोकं पल्याड जाऊन नाही.

अर्थात ते इथे गौण ठरते आणि "मारले" हेच मुख्य ठरते, कुठे मारले ते नाही, असे काहींचे म्हणणे असल्यास प्रतिवाद करायची तशी गरज नाही !

शरद, तुमचा हेडरमधला मुद्दा आहे की आपल्या सैनिकांचे हात बांधले गेले आहेत. पाक हल्ल्याचा आम्ही बदला घेत नाही. भारतीय सैन्यही व्यवस्थित बदला घेते, हे सांगण्यासाठीच वरच्या प्रवीण स्वामींच्या लेखाची लिंक दिली.
भारताच्या सेनाप्रमुखांनीही शिरकाणाच्या वेळी. स्थानिक तुकड्यांना पाक आक्रमणास जशास तसे उत्तर देण्याचा आदेश आहे असे म्हटले होते. "India reserves its right to retaliate at the time and place of its choice. We won't remain passive when attacked," he said, adding he expected "commanders to be aggressive and offensive."

<प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा भंग कुणी, कधी आणि कसा केला हे जास्त महत्वाचे ठरते> प्रत्यक्ष नियंत्रण सेनेचा भंग कसा करू दिला जातो हा प्रश्न मला पडत राहतो.

भरत मयेकर,

>> प्रत्यक्ष नियंत्रण सेनेचा भंग कसा करू दिला जातो हा प्रश्न मला पडत राहतो.

माझ्या माहितीप्रमाणे नियंत्रण रेषा अधिकृत नाहीये. केवळ आपसांत (म्हणजे भारत व पाक यांच्यात) असलेल्या (अ)सामंजस्यावर आधारित रेषा आहे.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै.
+ १.
@ भरत ~ खरी परिस्थिती अशी आहे की एल.ओ.सी. हा प्रकार अधिकृतपणे कुठेच नोंदविला गेलेला नाही. तसे पाळले गेले तर पाकने बळकाविलेला काश्मिरचा भाग तो त्यांचा अधिकृत आहे अशी भारताने भूमिका घेतली असे म्हटले जाईल. आज काश्मिरची स्थिती अशी आहे की पाकव्याप्त आणि भारताच्या ताब्यातील भाग. या दोन भागातील [अनधिकृत] सीमारेषांनाच नियंत्रण रेषा असे संबोधण्यात येते. त्यावरूनच धुसफूस सुरू असते दोन्हीकडील सैन्यात.

इंग्रजीमध्ये याला De facto स्थिती म्हटले जाते. म्हणजे "in practice or actuality, but not officially established."

अशोक पाटील

तसे पाळले गेले तर पाकने बळकाविलेला काश्मिरचा भाग तो त्यांचा अधिकृत आहे अशी भारताने भूमिका घेतली असे म्हटले जाईल >>> अशोक जी बहुतेक नाही... भारताने अजुन पर्यंत तो भाग आमचा नाही असे अधिकृतपणे जाहीर केले नाही आहे.. (बहुदा) फक्त युध्द बंदी लागु झाल्यावर जो ज्या भागात असेल तो तिथेच राहिल पुढिल निर्णयापर्यंत ... असे काही तरी होते... त्यामुळे उद्या भविष्यात परत युध्द झाले ( अर्थात होणारच आहे लवकर) तर भारतीय सैनिक लाहोर पर्यंत गेले आणि युध्द बंदी लागु झाली तर आपल्याकडे लाहोर पर्यंतचा परिसर येईल..( परंतु त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असावी लागते...आपले राज्यकर्ते उदारपणे त्यांना त्यांचा भुभाग परत करण्यास कमी करणार नाही)

त्या भागाला आपण आपल्या नकाशात पाकव्याप्त कश्मिर असेच संबोधतो..( पाकिस्तानाने व्यापलेला कश्मिर)

Pages