आमंत्रण लेखनस्पर्धा - "आवताण ... लै वरताण" - बेफ़िकीर

Submitted by बेफ़िकीर on 6 September, 2011 - 09:48

सर्वधर्मीय देवता, विभुती, गाय, शंख, उंदीर, गरूड, खार, इतर वाहने, जटायू व अमिताभ बच्चन प्रसन्न

आगतम स्वागतम सुस्वागतम

आमच्या येथे आमच्या येथील मात्र सहसा आमच्या येथे नसणार्‍या आमच्या द्वादशद्वितीय
सुपुत्र मारत्या उर्फ़ नाना उर्फ़ शाहरूख उर्फ़ नवा डॉन याचे लग्न ठरलेले आहे.

अकलूज येथील बेरके गायकवाड पाटील इनामदार वाघमारे यांची सुलक्षणी कन्या हौसा
उर्फ़ यमुना उर्फ़ सौभाग्यकांक्षिणी वैजयंतीमाला बेरके गायकवाड पाटील इनामदार वाघमारे
हिच्याशी शके १९५२ दिनांक ८ ऑक्टोबर रोजी अकलूज येथेच घरच्या मांडवात मध्यरात्री दिड वाजता
विवाह सोहळा संपन्न झाल्याचे जाहीर करण्यात येईल याची खात्री असावी.

मर्तिकाला व विवाहाला न बोलावता जाण्याची प्रथा आहे तरीही हा आमंत्रणाचा उद्योग करायलाच
हवा असा आग्रह व पत्रिकांचा अर्धा खर्च बे.गा.पा.इ.वाघमारे यांनी धरल्यामुळे व दिल्यामुळे (अनुक्रमे)
ही पत्रिका पोचवत आहोत. आपल्या सर्व परिवारासकट शुभाशीर्वाद देण्यासाठी आठ दिवस आधीपासून
उपस्थित राहावेत व दोन्ही वेळेस पोटभर जेवावेत.

न आलेल्यांशी संबंध तोडण्यात येतील व त्यांच्या नावाने शिमगा करून जिव्नात पुन्हा त्यांच्याशी
रोटीबेटी किंवा इतर कस्लाच यव्हार होणार नाही. नवा डॉननंतर आम्हाला अजून दोन मुले आहेत याची काळजी घ्यावी.

आहेर आणतील त्यांना लाऊडस्पिकरवरून पायताणाने मारण्यात यील. आम्हाला हवेत फ़क्त शुभाशीर्वाद वधुवरासाठी!

यायची, जायची, प्यायची व झोपायची सोय स्वत:च्या हिंमतीवर करावी. खायला लई मिळेल. रोज आंघोळ
करणारे शक्यतो येऊ नका.

आपला

थंड उर्फ़ बाब्या उर्फ़ बाबूरावदादासाहेब उर्फ़ माणिक हिरवे पाटील
(इनामदार)

आमच्या मामाच्या लग्नाला यायचं हा?

चिम्या, बॊबी, गुड्डी, अभिमन्यू, लैला
मार्शल, पिंकी, ऐश्वर्या, समीर, पोपट,
कुच्चू, प्रियांका, बबली, मलाईका
आमीर आणि शेंबडा नारायणराव जगदाळे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin

धमाले...:हाहा: