वाढदिवसाची भेट ..मिसलेली .... :)

Submitted by pinkswan on 6 August, 2013 - 15:44

अवलच्या शाळेत शिकता शिकता तिच्यापासुनच प्रेरणा घेवून , मुलिच्या वाढदिवसाला आपणच काहितरी बनवावे असे ठरवले. अवलने हि ग्रिन सिग्नल दिला Happy आणि मुलिचा वाढदिवस २५-२८ दिवसावर असताना विणकाम सुरु केले. पण मधे बदललेल्या प्लॅनिग् मुळे (आई -बाबांचे येणे आणि त्यांच्यासोबत भट्कन्ती )माझे विणकाम वाढदिवसाला काही पुर्ण होवु शकले नाही ..(आधि जरा कल्पना होतिच असे होइल ,म्हणुन मुलिला काहिच कळु दिले नाही Wink बनला नाहीच तर ऐन दिवशी रडारडी ! :))
मग मधल्या गॅप (१ महिना ) नंतर तो करायला घेतला आणि पुर्ण केला .मुलिला घालुन पहिले असता लक्षात आले कि गळा थोडा खाली येतोय ..मग काय ...गुरुकडे धाव घेतली ...आणि मग अवलने गळ्यापाशीअजुन २ ओळी विणकाम करायला सुचवले. मग आता तो पुर्ण झाला . तो असा..

वाढदिवसाला पुर्ण झाला नसला तरी आता मुलिला घालायला दिल्यावरहि स्वारी एकदम खुश ! Happy

20130805_152544(2).jpg

आणि ही चुकुन, चुकुन तयार झालेली गळ्याची डिझाइन Happy

20130805_152750(2).jpg

माझे याआधिचे विणकाम...
http://www.maayboli.com/node/43168

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! आता लेखिकाही व्हायला लागलीस की Happy
पिंकस्वानचे खरच खुप कौतुक वाटते. अतिशय आदर्श विद्यार्थिनी आहे ती. मी ज्या पद्धतीने शिकवले, जे जे शिकवले, अगदी सगळे तिने आत्मसात केले.
ऑन लाईन शिकण्याचा महत्वाचा अपुरेपणा म्हणजे प्रत्यक्ष संपर्काचा अभाव. पण तो तिने याहू चॅटचा आणि स्काईपचा सुयोग्य वापर करून दूर केला.
लहान मुलं, परका प्रदेश, अपरिहार्यपणे येणारे मोकळेपण यावर मात करण्यासाठी तिने विणकामाची मदत घेतली अन त्यात खरोखर प्राविण्य मिळवले अन आनंदही !
हा फ्रॉक नेट वरून तिने स्वतः शोधला, निवडला, अन आपला आपण विणलाही. शेवटची गळ्याची कलाकुसर तर खास तिचीच. अगदी नेमकं सांगायचं तर नवा डिझायनर तयार होतोय Happy
तिचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कधीही काही अडलं तर अत्यंत मोकळे पणाने ती विचारते, यामुळेच चांगला विद्यार्थी घडतो, नाही का ?
पिंकस्वान, खुप खुप शुभेच्छा अन हो शाब्बासकी ही Happy

वा, खूप खूप सुंदर .....
अननसाचे डिझाईन काय मस्त जमले आहे ....

अवलचेही कौतुक... - गुरु -शिष्या - दोघीही ग्रेट ....

खूप गोड दिसते आहे. अगदी सफाईचे झाले आहे काम. हैद्राबादकडे नरसापूर ये थे वर्ल्ड क्लास लेस वर्क होते आणि एक्स्पोर्टही होते. असे फ्रॉक हैद्राबादेत प्रदर्शनात नक्की मिळतात व ह्या वयाच्या मुलींसाठी हम खास घेतले जातात.

प्रतिसाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद !
अवल जरा जास्तच कौतुक करतेय ..खरतर ति खुपच छान शिकवते..याआधी हि मी दोन वेळा विनकाम शिकण्याचा प्रयत्न केला होता..पण दोन्हि वेळेस ज्या शिकवत होत्या त्यांना माझी आवड टिकवून ठेवता आली नाही Wink .पण अवल ने मात्र सतत नाविन्य ठेवुन आणि पेशन्स ने शिकवुन अजुनहि माझे वेड जागे ठेवले आहे Happy
अवलच्या पेशन्स साठी हॅट्स ऑफ !

Pages