सुमेधाव्ही. व त्यांचा माबोप्रसिध्द उंदीर.आणि देशव्यापी प्रतिक्रिया

Submitted by उदयन.. on 6 August, 2013 - 08:35

सुमेधींच्या घरात उंदीर आला ही गोष्ट मायबोलीवरुन देशभरात गाजली : पहा काही प्रसिध्द व्यक्तिंच्या प्रतिक्रिया

दिग्गी:- उंदीर हे अल्पसंख्याकाचे प्रतिक आहे....सुमेधा या आरएसएस च्या कार्यकर्त्या आहेत म्हणुनच त्यांना आपल्या देशातुन अल्पसंख्यांना हुसकुन लावण्याचे काम करत आहे... मी माननिय प्रधानमंत्रींना विनंती करतो की यांच्यावर त्वरीत बंदी आणावी आनि उंदरासारख्या महान प्राणी वाचवावा..

पप्पुराजा:- उंदीर काय आहे...उंदीर ही समस्या नाही आहे...ती एक भिती आहे..जी तुमच्या मनात बसली आहे... समस्या वगैरे काहीच नसते...आत्मविश्वास वाढवा की मी या भितीमधुन बाहेर येणार.. मग तो उंदीर आनि तुम्ही एकाच घरात सुखी समाधानाने राहाणार...

फेकुचंद:- मी हिंदु राष्ट्रवादी आहे... उंदीर हे हिंदु देवतेचे वाहन आहे...त्याला हुसकुन लावणे अजिबात खपवुन घेणार नाही....आमच्या गुजरात मधे बघा.... किती उंदर आहेत... किती काळजी घेतो.. यांच्या मुळेच गुजरात चा विकास झाला आहे... विकासाची भाषा करा.. उंदरांना वाचवण्याची भाषा करा... हे काँग्रेस सरकार उलथुन टाका..आणि उंदरांना विकासाची दिशा द्या...

चं मित्रा:- सुमेधी यांना जी काही रत्ने मिळाली आहेत ती आमचे सरकार आल्याबरोबर काढुन घेउ

इटालिअन:- मै..............इश.........उंदरोकी..............कडी .निंदा.............करती हु.....ये उंदीर.........अन्न सुरक्षा बिल के खिलाफ आहे.................ये उंदीर..हमारे अन्न खाते है......और खतम कर देते है........फिर हम ..गरिबो को क्या दे........?

सॉफ्टसिंगः
- या उंदरांना हकलुन द्यायला हवे.........यांनीच ती वास्तु पोखरली होती ... यांच्या बद्दल मी राष्ट्रपतींना चिठ्ठी पाठवलेली ... उंदरांचे निलंबन करा म्हणुन .....परंतु मला खाली पाडायचे होते म्हनुनच त्यांना पोखरायला वेळ दिला......... माझे तोंड उघडले तर बरेच उंदरांची कारस्थाने बाहेर पडतील

आतिश- ये कायका बवाल मचा है.. ये हमारे बिहार मे भी बहुत उंदर मचे है......ये सब गुजरात से आये हुये है... जब से समर्थन वापस लिया है तब से ये हमारे राज्य मे कुछ ना कुछ उधम मचाते है...

जलिता: सुमेधी जी........तुम्ही आमच्या लोकांच्या विरोधी आहे... तुम्हाला श्रीलंका सरकार ने फितवले आहे...
या बद्दल मी विधानसभेत तुमच्या विरुध्द ठराव मांडणार आहे

अब्बरः- उंदिर हे १० रुपयाचे जेवण जेउ शकतात...मी स्वतः पहिले आहे स्वतः ... हे एवढा भात.. ३ चपात्या वर वरण.. कोण म्हणते महागाई आहे उंदरांसाठी... ? सुमेधी जी तुम्हाला १० रुपये उंदरांवर खर्च करायला महाग आहेत का ?

उमर:- आय यम वेरी डिस्पाँईंट ... घरात काहीच न करता तुम्ही त्याला परत पाठवत आहेत...? तो काय तुमच्या घरी ट्रॅव्हल करायला आलेला.......? अश्याने त्याचे मानसिक खच्चीकरण करत आहात ...

शिरा हानः- मी उंदराला श्लोक म्हण्याचा आदेश देत आहे........जर रेडा वेद म्हणु शकतो तर उंदीर श्लोक का नाही ? तो शाळेत शिकलाच नसेल....शिकला असता तर आज ही वेळ आली नसती त्यावर ..

सर्द वारः- भारत हा एक कृषीप्रधान देश आहे या देशात सगळ्यांना भरपुर वाव आहे.. तरी सुध्दा माझा याला विरोधच असणार आहे... कारण धान्यांपासुनच वाईन निर्माण होते..जर धान्यांना नुकसान झाले तर वाईननिर्मितीवर परिणाम होईल ....मी आजच बीसीसीआय च्या मिटींमधे हा मुद्दा मांडतो..

टग्या. :- हे भयंकरच आहे म्हणायचे... आम्ही म्हणतो की या उंदरांना इतकी प्रसिध्दी कशाला देत आहेत..यांच्या सारख्या टग्यांच्या "मुत्रा"मुळेच प्लेग सारखा रोग पसरतो... ( आयला आता परत काही गोंधळ होउ नये म्हणजे मिळवले)

मी मराठी.:- तो मराठी माणसांच्याच का घरात घुसला ? भय्याच्या घरात का नाही....? हे लोंढे थांबवायला हवेत...? नाहीतर सुमेधी सारख्या मध्यमवर्गीय मराठी लोकांना आपल्या घरात राहता येणार नाही..

बाबा:- मी जर शाहरुख आणि सलमान या राष्ट्रीय दोन टोकांना एकमेकांना मिळवु शकतो तर ..सुमेधी आणि उंदीर यांच्यात सुध्दा मैत्री जोडु शकतो...

डे:- सुमेधी आणि उंदीर यांना वेगवेगळॅ कराय्ला हवे...असे ही उंदराचे स्वतंत्र अस्तित्व आहे.. मग त्याल सुमेधी यांच्या बरोबर ठेवला तरी काय फरक पडतोय ?

खिल गळे:- आता तुम्ही वर पाहिले की आपल्या नेते मंडळीना या बद्दल काय वाटत आहे आता आपण पाहु पुढे .......

आजचा सवाल बघा स्क्रिन वर .. ९५% जनता म्हणत आहे की उंदराने सुमेधी यांच्या घरावर अवैध कब्जा केलेला आहे.. त्याविरुधचा सुमेधी यांचा लढा हा चालुच राहिला पाहिजे... माझ्या बरोबर मुंबई स्टुडीओ मधुन खोब्व्रागाडे आहेत आणि पुणे स्टुडीओ मधुन मेधाताई आहेत त्याच बरोबर इथे माझ्याबरोबर विवेक जी आहेत

...मी चर्चेला सुरुवात करणार आहे ... वेधाताईंकडुन.... ताई मला सांगा तुम्ही अनेक लढे राज्यपातळीवर , देशपातळीवर अनेकदा विविध विषयांवर चालवलेले आहेत.. त्यात तुम्ही यशस्वी देखील झालेला आहात ...तुम्हाला काय वाटते की या आगळ्यावेगळ्या मोहीमे बद्दल सुमेधी यांच्या लढ्या विरुध्द...

एका खाजगीसोशल साईट वरुन हा चालवलेला त्यांचा लढा आज देशव्यापी झालेला आहे...तुम्हाला , मला. आपल्याला या त्यांच्यासारखाच अनुभव आलेला आहे... आपल्या देखील घरात उंदीर नावाचा प्राणी घुसलेला असतो... आपण असे सोशल मिडीयावर टाकुन इतरांची मत मागवत असतो का ? काय वाटते... ही उंदरांच्या उपद्रवाविरुध्द एक नविन वैचारीक क्रांती ची दिशा या देशाला मिळत आहे ?

मी एक ब्रेक घेत आहे

पहात रहा फक्त काहीपण डोंबलाचे मत.......

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुमेधाव्ही. व त्यांचा माबोप्रसिध्द उंदीर.आणि देशव्यापी प्रतिक्रिया >> यावर सन्माननीय प्रथितयश माबोकरांच्या प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत.

माझा एक पैसा:

मितीश काणे : हे उंदीर म्हणतात की त्यांच्या बिळात विकास झाला आहे मग ते इथे मराठी माणसांच्या घरात काय करतात? जर त्यांच्या बिळाचा खरोखर विकास झाला आहे तर त्यांनी आमचे घर सोडुन जावे. नाहीतर मग आम्हीच त्यांना हाकलून देऊ. सांगताव हहा!!

उद्या Rofl

पण वेगळा धागा का काढला?
हे म्हणजे 'तिकडच' बिळ सोडुन नविन बिळात वेगळ बिर्हाड थाटल्यासारख वाटतय

अरे तो धागा खरच माहीती साठी होता......त्याचा मायबोलीकरांनी विनोदी धाग्यात रुपांतर केले..

या सर्व प्रतिक्रियांच्या नादात ज्यासाठी धागा काढलेला त्याची माहीती मिळालीच नाही ...;)
.
.
म्हणुन वेगळा धागा काढला

दादू :- हा उंदीर इतक्या छोट्या जागेत कसा राहतो याचे फोटो घेतले पाहिजे. बिळाचा एरिअल व्ह्यु काय मस्त येइल ना?

Proud

उंदरांना सन्मानाने वागवले नाहीतर तर फजिती होईल बरे.. Proud

ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. एक नगर होतं, तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हां आपण तिचा सूड घ्यावा.

त्यांनी रात्रीं हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी फजिती झाली. सासू-दिरांनी निंदा केली, घरांतून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे. रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या आमावस्येच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. ही घरांतून निघाल्यावर तें बंद पडलं.

पुढं अमावस्येच्या दिवशी राजा शिकार करून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार घडला. आपले गावातले सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गप्पा मारीत आहेत. कोणाच्या घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो, काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा, माझा थाटमाट जास्ती व्हावचा, त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत.

इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो, काय सांगू? मी ह्या गावाच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती, तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला. तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा उदरांनी विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसर्‍या दिवशी तिची फजिती झाली. सासू-‍‍दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणन मला हे दिवस आले.

ती दरवर्षी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो! असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरीं आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलें आहे काय? म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. सार्‍या घरांत मुखत्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करु लागली. जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो! साठा जन्माची ही कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

वाग्विजयसिंगः इन उंदरोंको हम अच्छी तरह जानते हँ. यह सब जगह घूसते हँ. मतलब - इनका सब जगह संचार हँ.यह सब जानते हँ ऑर इनको भला कौन नही जानता?
'सौ टका टंच.....!'

Pages