आधुनिक पाश्चात्य शास्त्रिय संगीताचा एक सर्जनशील निर्माता- आन्द्रे रियू

Submitted by रेव्यु on 4 August, 2013 - 02:11

आंद्रे लीयाँ मारी निकोलास रियू हा पाश्चात्य शास्त्रीय व उपशास्त्रिय तसेच इतर पारंपारिक संगीतात अविष्कार करणारा २०व्या व २१व्या शतकातील अत्यंत यशस्वी कंपोजर समजला जातो. संगीताच्या शुचितेस धक्का न लागू देता ( यावर वाद आहे) भव्य सेट्स व स्थानिय व त्याबरोबरच देशोदेशीच्या तरुण कलाकारांना प्रोत्साहन देत त्याने पाश्चात्य संगीतात ( विशेषतः) ऑर्केस्ट्रा, ऑपेरा,वॉल्ट्झ, सोप्रानो अशा प्रकारांना जनमानसापर्यंत पोहोचविले आहे.
या संगीतकाराचा व माझा संबंध ( म्हणजे पडद्यावर्-छोट्या पडद्यावर) ग्रँड कॅन्यन व लास वेगासच्या सफरीत बसमध्ये आला. ८ तासाचा सलग प्रवास अन नेवाडाचे रण सुसह्य होण्यासाठी आमच्या चिनी गाईडने आंद्रेची डी व्ही डी लावली होती. अन जे मी ऐकले त्यात सुमधुर , नीटनेटके संगीत होते, प्रेक्षकांच्या काळजास हात घालणारी किमया होती अन प्रचंड पण संयत शोमनशिप ( ज्याला पु.ल्.खेळिया म्हणत) होती. भव्य सेट , स्थानिक कलाकार, देशविदेशातील तरुण गायक व वादक, त्याबरोबरच नर्म विनोद, प्रेक्षकांना त्या संगीत अन आनंदोत्सवात सामील करून घ्यायची ती शैली यांनी मी मोहून गेलो अन त्याचा प्रचंड चाहता झालो. आजमितीला त्याच्या बहुतेक सर्व काँसर्टचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे .पाश्चात्य संगीताच्या कोणत्याही खुब्या माहित नसतांना केवळ निखळ संगीताचा शुध्द आनंद मी घेतला आहे.
याची वैशिष्ट्ये म्हणजे जोहान्न स्ट्रॉसचा वॉल्ट्झ, जो त्याने वाजवण्यास सुरुवात करताच आबालवृध्दांची पावले जोड्याजोड्याने नृत्य करू लागतात अन तेवढ्याच तल्लीनतेने वादक त्यात खुमारी आणतात.
आंद्रे ने संगीताचे धडे वयाच्या पाचव्या वर्षापासून घेण्यात सुरुवात केली.याचा जन्म १९४९ सालचा आहे. म्हण्जे तो आता ६४ वर्षांचा आहे.हा मूळचा डच व्हायोलनिस्ट आहे.मिष्किल डोळे, स्टेजवर सर्व काही व्यवस्थित अन काटेकोर असावे यावर भर, उत्तमोत्तम सेट तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ध्वनी संयोजन, प्रत्येक देशातील ऐतिहासिक स्थळांवर कार्यक्रमांचे आयोजन या देखील त्याच्या कार्यक्रमाच्या विशेष उठाव आणणार्‍या बाबी आहेत.
१९८८ साली त्याने आपल्या वैयक्तिक परफॉर्मन्स स्वतंत्र ऑर्केस्ट्रा ( १२ सदस्य) सुरुवात केली. आणि आजवर अनेक देशात शेकडो प्रयोग केले आहेत.
पाश्चात्य संगीतास लोक संगीत तसेच भव्य दिव्य सेट व लोकप्रिय सिने ट्युन्सची जोड देवून त्यास जनमानसापर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांवर शास्त्रिय संगीत हे आपली शुचिता गमावून बसत आहे अशी टीका देखील तेथील दुढ्ढाचार्यांनी केली आहे.
डेव्हिड टेंपलटन हा टीकाकार म्हणतो
Ironically, it is Rieu’s own success that has earned him a horse-drawn carriage full of criticism, a pot-shot laden backlash aimed chiefly at the calculated emotionalism and theatrical flourishes of his performances, which, according to many, only cheapen the classical-music experience.

याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे साठी पलिकडील जोडपी याच्यावर फिदा असतात आणि त्यावर फिदा होणार्‍या चाहत्यांचे हे म्हणणे आहे
http://www.dailymail.co.uk/femail/article-2252240/Andre-Rieu-Hes-63-year...
तर असा हा आंद्रे रियु.
याच्या संगीताची बरीच रेकॉर्डिंग्ज यु ट्युबवर आहेत व या मा़झ्या लेखाचे वाचन केल्यावर जर कुणाला ( ज्याना त्याच्या बद्दल माहित नसलेल्याना ) ऐकायचे असेल तर या लिंक्स मी देत आहे. ऐकल्यावर तुमच्या प्रतिक्रिया वाचायला आवडेल.
http://www.youtube.com/watch?v=IdJH-_ShZL8
http://www.youtube.com/watch?v=uATKVB7Qfgo
http://www.youtube.com/watch?v=oKbdqMADjII
आणि यशिवाय अगणित रेकॉर्डिंग्ज तेथे आहेत.
अरे हो . या वर्षी मे मध्ये नेदरलँड्समध्ये नवीन राज्याभिषेकाला आमंत्रित केला गेलेला तो मानकरी होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्या रसिक मायबोलीकरांना माझ्यासाऱखेच काही सुंदर अनुभवायचे आहे त्यांनी या लिंक्स आवर्जून पहाव्या, संपूर्ण कुटुंबांनी आनंद घेण्यासारखा हा अनुभव आहे.

रेव्यु, धन्यवाद Happy
हे गाणे ऐकल्यावर आंद्रे रियु याच्या दोन सिडीज मी मुद्दाम घेऊन आले होते. खुप आवडतात त्या सिडिज. इतर युट्युब वरचे संगितही फार मस्त आहे.