आपल्या मनातली "दुनियादारी"

Submitted by उदयन.. on 25 July, 2013 - 02:17

दुनियादारी

सुशिंचे अत्यंत गाजलेले सर्वव्यापी पुस्तक... प्रेम, मत्सर, राग, द्वेष, जीवनातले सगळेच भाव ओतप्रोत भरलेले पुस्तक.. सगळेच प्रसंग अलगद म्हणा या जोरदार म्हणा मनाला स्पर्श करुन जातातच.. काही प्रसंग तर कित्येकांच्या कॉलेजच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने तर घडुनच गेलेले असतात
दिग्या, शिरीन, मिनु सुरेखा, श्रेयस.....ही व्यक्तिरेखा थोडीफार आपल्या मित्रांमधेच बघायला मिळते..
चित्रपट आल्यावर प्रत्येकाचा थोडाफार का होईना भ्रमनिरस झालाच आहे.. काहीजणांचा तर प्रचंड Wink

श्रेयस म्हणुन स्वप्निल बरोबर नाही.. शिरीन म्हणुन सई मोठी वाटते.. दिग्या म्हणुन अंकुश ने कमी मेहनत घेतली
मिनु मधे उर्मिला इतकी गोड वाटत नाही
फेसबुक , मायबोली, इतर ठिकाणी प्रचंड उलट्यासुलट्या प्रतिक्रिया वाचल्या आहे..

चला आज आपण आपल्या व्यक्तिरेखांना आपणच चेहरे द्यावे.. बघुया तुमच्या मनात कुणाला कोणत्या व्यक्तिरेखेमधे बघायला आवडेल
.
.

माझ्या मते

श्रेयस :- रणवीर कपुर

शिरीन :- दिपिका पादुकोन

मिनु :- काजल अग्रवाल / जेनलिया देशमुख

दिग्या :- रितिक रोशन / अर्जुन कपुर

साई - सुशांतसिंग राजपुत / रणबीर सिंग

श्रेयस च्या व्यक्तिरेखे साठी रणवीर कपुर ला ऑप्शन नाहीच त्याच बरोबर शिरीन साठी दिपीका ला ऑप्शनच नाही

माझ्या मते तरी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए... दुनियादारी मराठी सिनेमा आहे आणि त्याला मराठीच ठेवा... उगाच हिंदी वाले त्यात घुसवु नका त्यात .... कास्टींगच करायचि तर मराठी कलावंत सुचवाना... उगाच हिंदी नावे घेण्यात काही अर्थ नाही

अरे मराठी मधे झाला आहे आणि त्याच्या अब्रुचे धिंडवडे सुध्दा निघाले आहेत....... उगाच परत मात्र करु नकोस मराठी मधे आणुन ......त्यापेक्षा हिंदी व इतर भाषेतले कलाकार निवडा Wink

मराठीत इतर हिरो वै आहेत की.
त्यांचा विचार करा.

साइ म्हणजे व्हीलन काय?? तो अशोक सराफ. जुन्या काळातला.
दिग्या रवीन्द्र महाजनी
श्रेयस ???
शिरीन ???

पुस्तक न वाचताही मी लिहिलय...

<<अरे मराठी मधे झाला आहे आणि त्याच्या अब्रुचे धिंडवडे सुध्दा निघाले आहेत....... <<

उद्या... अब्रुचे धिंडवडे माबोवर उडालेत. पण पिक्चर तुफान चाल्लय! कालच टीव्हीवर बघितला रिव्ह्यु! Happy

झकोबा... दिग्या- रविंद्र महाजनी???

उदयन, मराठीतही खुप चांगले कलाकार आहेत पण यांच्या नावावर चित्रपट चालतात, असा गैरसमज असल्याने बहुदा निर्माते दिग्दर्शक या कलाकारांना संधी देत नसावेत.
फेरारी कि सवारी मधले छोट्या छोट्या भुमिकेतले सर्वच कलाकार मराठी होते आणि त्यांची कामगिरी अत्त्युत्तम होती.

हे जे तथाकथित नाववाले कलाकार आहेत त्यांनी आपल्या शरीराकडे अजिबात लक्ष दिलेले नाही. त्यामूळे कमी वयातच ते थोराड दिसायला लागलेले आहेत. योग्य ती मेहनत घेतली असती तर त्यापैकी अनेकजण त्या त्या भुमिकेत शोभलेही असते.

दिनेश दा........ तुमचे म्हणने बरोबर आहे परंतु त्यासाठी मेहनत नावाचा प्रकार घ्यायला लागतो..

याच विषयावर थोड्याफार फरकाच्या कथानकाची "बेधुंद मनाची लहर" नावाची ई टिव्ही मराठीवर आलेली होती

त्यात जे व्यक्तिरेखा दाखवलेल्या त्या सगळयाच जवळपास जाणार्या होत्या...

श्रेयस तळपदे, संतोष जुवेकर, अंकुश चौधरी, मकरंद अनासपुरे, सोनाली खरे, इत्यादी जे कलाकार होते... त्यांना बघुन नक्कीच ते कॉलेजकुमार वाटतच होते.
.

मराठीत कलाकार नक्कीच आहेत परंतु एखाद्या भुमिके साठी मेहनत घेणे हा प्रकार अपवादात्मच आहे..

क्वचितच एखादा अतुल कुलकर्णी "नटरंग" सारख्या चित्रपटासाठी मेहनत घेतो ..

तसाच "बालगंधर्व" चित्रपटात देखील सुबोध यांनी मेहनत घेतलेली आणि ती दिसुन देखील आलेली..

याच विषयावर थोड्याफार फरकाच्या कथानकाची "बेधुंद मनाची लहर" नावाची ई टिव्ही मराठीवर आलेली होती

त्यात जे व्यक्तिरेखा दाखवलेल्या त्या सगळयाच जवळपास जाणार्या होत्या...
>>
१०-१२ वर्सापूर्वीची गोस्ट हाय. त्यावेळेला त्ये लोक कालेजातच होते नाहीतर कॉलेजातून पास होऊन बाहेर पडलेले होते.

आत्ता धड पिक्चर मिळत नाय, सिरियल नाय, बापाचा पैसा नाय हिंदीतल्या स्टारपूत्रांसारखा.
नाटकांचे दौरे करत कुठे फिटनेसकडे लक्ष देत बसणार?

शिरीनला आणि दिघ्याला दुसरे कोणी नसते शोभले....

प्रोफेसर M.K. साठी सचिन पिळगावकर शोभला असता. (तसंही तो स्वतःला स्व.जो.चा बाप समजतो. Proud )

श्रेयससाठी एखादा नवीन पण तरुण कलाकार चालला असता.

अवांतर :
बाकी, मला एक प्रश्न पडलाय....

श्रेयसच्या आईच्या प्रियकराच नाव जर 'श्रेयस' होत, तर त्या प्रोफेसरच्या नावाचे इनिशिअल्स M.K. कसे काय? (अर्थात माझ्यामते, ते S.K. असायला हव होत.) (S फॉर 'श्रेयस')

माझा अंदाज कितपत खरा आहे, माहित नाही पण मालिकेतील कामाचा अतिरेक झाल्याने, शरीर / आवाज याकडे लक्ष देणे कमी होत गेले.
अरुण सरनाईक, सुर्यकांत, चंद्रकांत. इतकेच काय चंद्रकांत गोखले यांनी पण शेवटपर्यंत फॉर्म राखला होता.

काल रात्री मी चित्रपट पाहिला. दिग्दर्शक-पटकथा लेखकांचा सिनेमा बनवताना असलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा जरी १०० टक्के मान्य केला तरीही मला स्वतःला न पटलेल्या / खटकलेल्या चित्रपटातील गोष्टी -

१. मुळ पुस्तकामधील शिरीन व प्रितम (पटेल) ही तसेच मिनु (मकवाना) यांना विनाकारण ओढून-ताणून मराठी बनवले आहे. त्यातल्या त्यात मिनु इनामदार एकवेळ ठीक आहे, पण उगाचच पोलिस इन्स्पेक्टरची मुलगी म्हणजे जास्तीच जुळवा-जुळव वाटते.

२. त्यातील अजिबात न पटणारी गोष्ट म्हणजे शिरीन व साईचे जमवलेले लग्न म्हणजे तर खूपच कहर झाला आहे. त्यामुळे शेवटी ते लग्न मोडून शिरीन व श्रेयसचे लग्न होणे हा तद्दन बाजारुपणा वाटतो. कारण कट्टा गँग व साईची गँग यातून विस्तवसुध्धा जात नसतो तर शिरीन त्याच्याशी ठरलेले लग्न कट्टा गँगपासुन कसे काय लपऊन ठेऊ शकते? त्यामुळे या पेक्षा मुळ कादंबरीप्रमाणे शिरीनचे लहानपणीच लग्न ठरलेले दाखवले असते तर ते जास्ती वास्तववादी झाले असते व तीच्या होणार्‍या नवर्‍याला जास्ती उदात्त / प्रगल्भ दाखऊन तो आपण होऊन शिरीन - श्रेयसच्या मार्गातुन बाजुला होतो किंवा त्याला अ‍ॅक्सिडेंटमध्ये गेलेला दाखऊन शिरीनच्या जीवनात आलेली पोकळी पाहून श्रेयस मिनुकडे न जाता शिरीनकडे जातो असे दाखवता आले असते.

३. कारण मुळात दिग्या व साई हे दोघेही लहानपणापासुनचे मित्र असतात. साईच्या बहिणीमुळे (शशिकला देडगावकर, जी दिग्यावर एकतर्फी प्रेम करीत असते पण दिग्या तीला मित्राची बहिण या नजरेने कायम पहात असतो, त्यातुन शशिकला दिग्यावर अतिप्रसंगाचा आळ गेते व दिग्या व साईमध्ये दुष्मनी पैदा होते, हा महत्वाचा संदर्भ दाखवलाच नाही आहे.

४. तसेच वर रियाने लिहिल्याप्रमाणे कट्टा गँगच्या जोड्या जमणे / गँग घट्टपणे जवळ येणे तसेच अश्क्याचे गॅगपासुन दुरावणे जास्ती मनाला पटले असते.

५. पिक्चरचा शेवट कादंबरीप्रमाणे शोकांतिका दाखवून सुहास शिरवळकरांना अभिप्रेत असलेली "दुनियादारी" अधिक इफेक्टीव्हली दाखवता आली असती.

६. बाकी सिनेमाच्या टेक्निकल बाबींबद्द्ल - सिनेमॅटोग्राफी उच्च दर्जाची (नेहमीप्रमाणे), सिनेमाचा वेग योग्य राखला आहे, पण आवाजाची क्वालिटी खराब वाटली त्यामूळे संवाद नीट कळत नव्हते. (कदाचित त्या थियेटरचा लोकल प्रॉब्लेम असेल).

मराठी सिनेमात मूळ कथेची वाट लावली आहे.....हिंदी मध्ये बॉलीवूड मसाला घालून जे काही होईल ते नाही बघवनार.

श्रेयस च्या भूमिकेत स्वजो पेक्षा अभिजीत खांडकेकर चांगला दिसला असता.

खालील मजकूर सु.शी.प्रेमींनी वाचू नका....

_______________________________________________________

इतर सगळ्यांशी असहमत आहे मी. 'दुनियादारी' पुस्तक विकत घेऊन वाचण्यासारख
अजिबात नाही. त्यापेक्षा चित्रपट खूपच छान आहे, असं माझ ठाम मत बनल आहे.

पुस्तकातलं एकही पात्र मला पटलेलं नाही...आणि आवडण तर लांबची गोष्ट आहे.
हे पुस्तकं वाचल्यावर काहीही चांगलं, दर्जेदार साहित्य वाचल्याचा अनुभव येत नाही.

_______________________________________________________

एक प्रामाणिक सल्ला :

'दुनियादारी' अजून वाचल नसेल तर वाचण्याचा विचारही करू नका....
चित्रपट मात्र नक्की पहा...आणि कुठलाही इतर संदर्भ न ठेवता आणि इतरांचे 'रिव्हू' आणि मते न वाचता.

इतर सगळ्यांशी असहमत आहे मी. 'दुनियादारी' पुस्तक विकत घेऊन वाचण्यासारख
अजिबात नाही. त्यापेक्षा चित्रपट खूपच छान आहे, असं माझ ठाम मत बनल आहे.

स्मित

पुस्तकातलं एकही पात्र मला पटलेलं नाही...आणि आवडण तर लांबची गोष्ट आहे.
हे पुस्तकं वाचल्यावर काहीही चांगलं, दर्जेदार साहित्य वाचल्याचा अनुभव येत नाही.

>> स्मित
_______________________________________________________

एक प्रामाणिक सल्ला :

'दुनियादारी' अजून वाचल नसेल तर वाचण्याचा विचारही करू नका....
चित्रपट मात्र नक्की पहा...आणि कुठलाही इतर संदर्भ न ठेवता आणि इतरांचे 'रिव्हू' आणि मते न वाचता.

>> स्मित

पसंद अपनी अपनी स्मित
तुम्हाला सांस बहू मालिका आणी बडजात्यापट जाम आवडत असणार अस मात्र वाटतय .

Golden star: सुहास शिरवळकर ह्या माणसाची काही पुस्तकं वाचल्यावर माझंही असच मत झालं होतं कि ह्यात दर्जेदार असं काहिही नाहीये. ओढून ताणून केलेल्या ईंग्रजी (वेस्टर्न - ते काऊबॉईज वाल्या) गोष्टींचं मराठीकरण आहे. असो. हे माझं मत आहे. थोडसं वैयक्तिक संदर्भातून असलेली लेखकाविषयीची माहिती सुद्धा ह्याला कारणीभूत आहे - (त्यांच्या शालेय - महाविद्यालयीन जीवनापासून). हे झालं माझं वैयक्तिक व्हेंटिंग.

बाकी चित्रपट पाहीला तर त्याविषयी काय वाटलं ते जमेल तसं लिहिन.

Pages