आपल्या मनातली "दुनियादारी"

Submitted by उदयन.. on 25 July, 2013 - 02:17

दुनियादारी

सुशिंचे अत्यंत गाजलेले सर्वव्यापी पुस्तक... प्रेम, मत्सर, राग, द्वेष, जीवनातले सगळेच भाव ओतप्रोत भरलेले पुस्तक.. सगळेच प्रसंग अलगद म्हणा या जोरदार म्हणा मनाला स्पर्श करुन जातातच.. काही प्रसंग तर कित्येकांच्या कॉलेजच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने तर घडुनच गेलेले असतात
दिग्या, शिरीन, मिनु सुरेखा, श्रेयस.....ही व्यक्तिरेखा थोडीफार आपल्या मित्रांमधेच बघायला मिळते..
चित्रपट आल्यावर प्रत्येकाचा थोडाफार का होईना भ्रमनिरस झालाच आहे.. काहीजणांचा तर प्रचंड Wink

श्रेयस म्हणुन स्वप्निल बरोबर नाही.. शिरीन म्हणुन सई मोठी वाटते.. दिग्या म्हणुन अंकुश ने कमी मेहनत घेतली
मिनु मधे उर्मिला इतकी गोड वाटत नाही
फेसबुक , मायबोली, इतर ठिकाणी प्रचंड उलट्यासुलट्या प्रतिक्रिया वाचल्या आहे..

चला आज आपण आपल्या व्यक्तिरेखांना आपणच चेहरे द्यावे.. बघुया तुमच्या मनात कुणाला कोणत्या व्यक्तिरेखेमधे बघायला आवडेल
.
.

माझ्या मते

श्रेयस :- रणवीर कपुर

शिरीन :- दिपिका पादुकोन

मिनु :- काजल अग्रवाल / जेनलिया देशमुख

दिग्या :- रितिक रोशन / अर्जुन कपुर

साई - सुशांतसिंग राजपुत / रणबीर सिंग

श्रेयस च्या व्यक्तिरेखे साठी रणवीर कपुर ला ऑप्शन नाहीच त्याच बरोबर शिरीन साठी दिपीका ला ऑप्शनच नाही

माझ्या मते तरी

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

svalekar: नाही लिहिणार.

लिहिण्यातून टोन कळत नाही. म्हणून थोडसं स्पष्टीकरणः मायबोली चा वाचक-सदस्य म्हणून माझी भुमिका फक्त आनंद घेण्यार्याची आहे, कुठलेही वाद निर्माण करणं / घालणं / वाढवणं हा हेतू नाही. तुमचा हेतू लक्षात आला नाही, पण तुम्हाला आणि/वा अनेकांना आवडलेल्या लेखकाविषयी / लिखाणाविषयी / चित्रपटाविषयी कुणाला दुखवायचा माझा हेतू नाही. मी फक्त माझं मत मांडलं.

.

.

अनिश्का..
एखादी गोष्ट मला आवडत नाही म्हणून ती वाईट आहे ..दर्जेदार नाही ..असा सूर नसावा ..माझी आवड वेगळी आहे ..किंवा मला हे पुस्तक , मालिका , चित्रपट पटला नाही ..मग असा प्रश्न येत नाही ..
वर गोल्डन स्टार यांनी कुठलेही स्पष्टीकरण न देता इतरांनाही वाचू नका असा शहाजोग पणे सल्ल्ला दिला आहे ..

त्या विषयी दुमत आहे ..इतर मालिकांच्या धाग्यावर सुद्धा मत-मतांतरे आहेत ..पण तुम्ही ही मालिकाच बघू नका असा सल्ला कोणी देत नाही ..

आणि आपण टीका करत असताना ..त्या पुस्तक , किंवा चित्रपटामध्ये वाईट काय अहे ते सविस्तर लिहिले पाहिजे..एवढीच अपेक्षा असते ..

अरे धाग्याचा विषय काय......................

चालु काय आहे......................
.
.
.विषयाला धरुन लिहिता येत नसेल तर या धाग्यावर लिहित जाउ नका............

Pages