Submitted by के अंजली on 8 August, 2012 - 00:56
सुटली मिठी जराशी
करपाश सैल झाले
आभाळ पावसाचे
हलकेच ऐल झाले
सैलावल्या बटांना
लटकाच राग आला
वेणीत मोगर्याच्या
रुसणे फुलास झाले
बेभान वाहणारा
वारा जरा निमाला
आणीक वादळाचे
गंधून श्वास गेले
सार्या फुलून आल्या
वाटा अश्या सुगंधी
अन जांभळे ऋतूही
मोहून खास गेले..!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खासच अगदी
खासच अगदी
सहज, सुंदर, गोड
सहज, सुंदर, गोड कविता.
------------------------------------------------------------------
"आणिक वादळाचे" इथे एक मात्रा कमी पडते आहे.
काहीतरी बदल करावा.
(कदाचित असा : "आणीक")
मस्तच.....
मस्तच.....
खूप गोड! फार आवडली.
खूप गोड! फार आवडली.
व्वा सुरेख. खुपच आवडली.
व्वा सुरेख. खुपच आवडली.
अभिनंदन.
सैलावल्या बटांना लटकाच राग
सैलावल्या बटांना
लटकाच राग आला<<< वा वा, सुंदर
अ प्र ति म !
अ प्र ति म !
ते जांभळे ऋतूही मोहून खास
ते जांभळे ऋतूही
मोहून खास गेले
शब्दातूनि कुणाच्या
ते मूर्त रुप ल्याले...
अंजली - तुमची कविता कधीच अपेक्षाभंग करत नाही हे पुन्हा तुम्ही दाखवून दिले....
केवळ अप्रतिम काव्य - शब्द - आशय व लय सर्व सर्व जमलंय अगदी... जियो
खूप खूप आवडली कविता धन्यवाद
खूप खूप आवडली कविता
धन्यवाद
सैलावल्या बटांना लटकाच राग
सैलावल्या बटांना
लटकाच राग आला
क्या बात है...
पण
आभाळ पावसाचे
हलकेच ऐल झाले....
हे खाssssस
सुंदर कविता, अंजली
क्या बात है कसली प्रचंड गेयता
क्या बात है
कसली प्रचंड गेयता आहे. वाचताना गायलाच लागलो चक्क. नखशिखांत सुंदर कविता आहे.
अंजली
मधे मधे गॅप घेत नका जाऊ
सुंदर कलाकृती... कवितेतील
सुंदर कलाकृती...
कवितेतील गेयता मोहवणारी आहे...
खूप छान आहे कविता आवडली
खूप छान आहे कविता आवडली
नितांत सुंदर कविता.
नितांत सुंदर कविता.
असं छानसं कौतूक मायबोली सोडून
असं छानसं कौतूक मायबोली सोडून इतर कुठे बरं अनुभवास येईल?
खूप धन्यवाद मंडळी!!
बेभान वाहणारा वारा जरा
बेभान वाहणारा
वारा जरा निमाला
आणीक वादळाचे
गंधून श्वास गेले
हे खासच आहे..
आवडली कविता.
व्वा! मस्त.
व्वा! मस्त.
"आभाळ पावसाचे हलकेच ऐल
"आभाळ पावसाचे हलकेच ऐल झाले"
या ओळी खास आवडल्या.
लैच लयदार काव्य !
लैच लयदार काव्य !
धन्यवाद!
धन्यवाद!
पुन्हा पुन्हा वाचत रहावी अशी
पुन्हा पुन्हा वाचत रहावी अशी कविता ...
अहाहा ! सुंदर . . . . !
अहाहा !
सुंदर . . . . !
आवडली
आवडली
सहीये
सहीये
आभाळ पावसाचे हलकेच ऐल झाले
आभाळ पावसाचे
हलकेच ऐल झाले व्वा.................... मस्त !!
कविता खूप आवडली! शब्दांची
कविता खूप आवडली!
शब्दांची निवड आणि प्लेसमेंट मस्तच!!
आभार!
आभार!
गोड कविता
गोड कविता ................................
छान आहे कविता.
छान आहे कविता. आवडली.
>>
बेभान वाहणारा
वारा जरा निमाला
आणीक वादळाचे
गंधून श्वास गेले
>> हे खूप आवडले.
फार सुंदर..
फार सुंदर..:)
Pages