ऋतू जांभळा..

Submitted by के अंजली on 8 August, 2012 - 00:56

सुटली मिठी जराशी
करपाश सैल झाले
आभाळ पावसाचे
हलकेच ऐल झाले

सैलावल्या बटांना
लटकाच राग आला
वेणीत मोगर्‍याच्या
रुसणे फुलास झाले

बेभान वाहणारा
वारा जरा निमाला
आणीक वादळाचे
गंधून श्वास गेले

सार्‍या फुलून आल्या
वाटा अश्या सुगंधी
अन जांभळे ऋतूही
मोहून खास गेले..!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहज, सुंदर, गोड कविता.
------------------------------------------------------------------
"आणिक वादळाचे" इथे एक मात्रा कमी पडते आहे.
काहीतरी बदल करावा.
(कदाचित असा : "आणीक")

ते जांभळे ऋतूही
मोहून खास गेले
शब्दातूनि कुणाच्या
ते मूर्त रुप ल्याले...

अंजली - तुमची कविता कधीच अपेक्षाभंग करत नाही हे पुन्हा तुम्ही दाखवून दिले....

केवळ अप्रतिम काव्य - शब्द - आशय व लय सर्व सर्व जमलंय अगदी... जियो

क्या बात है

कसली प्रचंड गेयता आहे. वाचताना गायलाच लागलो चक्क. नखशिखांत सुंदर कविता आहे.
अंजली
मधे मधे गॅप घेत नका जाऊ Happy

बेभान वाहणारा
वारा जरा निमाला
आणीक वादळाचे
गंधून श्वास गेले

हे खासच आहे..
आवडली कविता.

छान आहे कविता. आवडली.
>>
बेभान वाहणारा
वारा जरा निमाला
आणीक वादळाचे
गंधून श्वास गेले
>> हे खूप आवडले.

Pages