अपूर्णतेच्या खिन्नतेने तळमळत,
जागलेल्या रात्री...
चढत्या रात्रीने शहाणपण शिकवलं!
खरं खोट्याची सीमा लख्ख केली...
नवी उमेद श्वासात भरून घेता आली,
खंतावणार्या गोष्टींमध्ये अडकून राहिलेला पाय अलगद सोडवता आला..
ह्या खिन्नतेमुळे आलेली डोळ्यांवरची झापड, दूर सारता आली..
जगण्यातले अनेक पैलू, डोळसपणे बघता आले
कुठल्याही भावनांचा डोह आता दुरून पाहता येतो,
त्या भावनांत डुबकी मारून बाहेर आल्यानंतर,
अंगावरचे कपडे निथळेपर्यंतच त्याची ओल टिकते, ही अक्कल आली...
स्वतःहून अशी मारलेली उडी परवडते..
योग्य वेळी बाहेर येण्याचं भान राहतं,
पण म्हणून, कुणी ओलेच कपडे आणून दिले तर, ते न चढवण्याइतपत समजही आली...
ही सारी किमया त्या जागल्या रात्रींनी केली...
पुर्णत्वाच्या वेडापायी, निसटलेल्या क्षणांची भरपाई करण्याची ताकद, 'अपूर्णतेला स्वेछेने' स्वीकारण्याने दिली...
खरं नि खोट्याची सीमा लख्ख केली... लख्ख लख्ख केली..!
-बागेश्री
ब्लॉगवर "कुछ पन्ने" सदरातून
venusahitya.blogspot.in
<खरं नि खोट्याची सीमा लख्खं
<खरं नि खोट्याची सीमा लख्खं केली... लख्खं लख्खं केली..!> मस्त..
छान!
छान!
सुंदर बागे!
सुंदर बागे!
लखलखित निवेदन बागेश्री ,
लखलखित निवेदन बागेश्री , गद्यपद्याच्या सीमेवरचं.
व्वा. कविता फार आवडली.
व्वा. कविता फार आवडली.
कविता भावली.
कविता भावली.
स्वतःहून अशी मारलेली उडी
स्वतःहून अशी मारलेली उडी परवडते..
योग्य वेळी बाहेर येण्याचं भान राहतं,
पण म्हणून, कुणी ओलेच कपडे आणून दिले तर, ते न चढवण्याइतपत समजही आली..
जे ब्बात ! लखलखाट आवडला.
अंगावरचे कपडे निथळेपर्यंतच
अंगावरचे कपडे निथळेपर्यंतच त्याची ओल टिकते... बहोत खूब...
विचार छान मांडलेत.... ओघवतं
विचार छान मांडलेत.... ओघवतं लेखन.
क्या बात है!!!! मस्स्स्स्त
क्या बात है!!!! मस्स्स्स्त कविता.
व्वा ! खुप आवडली
व्वा !
खुप आवडली
सुंदर!!
सुंदर!!
भारती ताई +१
भारती ताई +१
एकुणच आशय खूप आवडला...!!
एकुणच आशय खूप आवडला...!!:)
धन्यवाद!! माझी ललितंही
धन्यवाद!!
माझी ललितंही काव्यमय व्हायला लागलीत बहुधा
क्या बात है
क्या बात है