Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 21 July, 2013 - 12:40
वाटते जे ते कधी घडणार नाही
अन नको जे ते कधी दडणार नाही
मी "असा "कोणास आवडणार नाही
मी "तसा " कोणास नावडणार नाही
आपल्या भेटीमधे होईल का हे ?
मोहरी आगीत तडतडणार नाही ?
दैव रुसल्यावर यमाला आळवावे
तो कदाचित हात आखडणार नाही
आसवे प्राशून हल्ली झिंगतो मी
एकही डोळ्यांतुनी पडणार नाही
ओरडे तो जो भरुनी गच्च आहे
कोरडे आभाळ गडगडणार नाही
व्यक्त होतो मी असा शब्दांत थोड्या
मोकलूनी धाय परवडणार नाही
येथल्या गर्दीत आहे प्राणवायू
एकटा मी सांग तडफडणार नाही ?
मी ख-या "कैलास"च्या शोधात आहे
शोधल्यावर काय सापडणार नाही
-डॉ.कैलास गायकवाड.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"आसवे प्राशून हल्ली झिंगतो
"आसवे प्राशून हल्ली झिंगतो मी
एकही डोळ्यांतुनी पडणार नाही
ओरडे तो जो भरुनी गच्च आहे
कोरडे आभाळ गडगडणार नाही" >>> हे दोन सर्वात विशेष वाटले.
वाटते जे ते कधी घडणार नाही अन
वाटते जे ते कधी घडणार नाही
अन नको जे ते कधी दडणार नाही
आपल्या भेटीमधे होईल का हे ?
मोहरी आगीत तडतडणार नाही ?
दैव रुसल्यावर यमाला आळवावे
तो कदाचित हात आखडणार नाही
मी ख-या "कैलास"च्या शोधात आहे
शोधल्यावर काय सापडणार नाही
गझल आवडली. वरील शेर विशेष, ठळक केलेले शेर फार आवडले.
व्यक्त होतो मी असा शब्दांत
व्यक्त होतो मी असा शब्दांत थोड्या
मोकलूनी धाय परवडणार नाही
येथल्या गर्दीत आहे प्राणवायू
एकटा मी सांग तडफडणार नाही ?
मी ख-या "कैलास"च्या शोधात आहे
शोधल्यावर काय सापडणार नाही <<< वा वा वा
शेवटची ओळ तर फारच आवडली. शोधल्यावर काय सापडणार नाही! दिलखुलासपणे कोणीही दाद द्यावी अशी ओळ! अभिनंदन!
आसवे प्राशून हल्ली झिंगतो
आसवे प्राशून हल्ली झिंगतो मी
एकही डोळ्यांतुनी पडणार नाही
.
व्यक्त होतो मी असा शब्दांत थोड्या
मोकलूनी धाय परवडणार नाही
व्वा,!!
मी ख-या "कैलास"च्या शोधात
मी ख-या "कैलास"च्या शोधात आहे
शोधल्यावर काय सापडणार नाही
विचार, आणि दुसरी ओळ फारच आवडली.
कधी-कधी मक्त्याचा आग्रह सोडला तर शेर अधिक चांगला होऊ शकतो, असे वाटते.
कधी-कधी मक्त्याचा आग्रह सोडला
कधी-कधी मक्त्याचा आग्रह सोडला तर शेर अधिक चांगला होऊ शकतो, असे वाटते.>>>
प्रचंड सहमत आहे.
चांगली आहे गझल ! पण मोहरी
चांगली आहे गझल !
पण मोहरी आगीत ऐवजी तेलात पाहीजे होते असे मला वाटते
शोधल्यावर काय सापडणार
शोधल्यावर काय सापडणार नाही,
मस्तच!
मस्त गझल
मस्त गझल
मस्त गझल!!!
मस्त गझल!!!
बरेच सुटे मिसरे आवडले !
बरेच सुटे मिसरे आवडले !
गझल आवडली! गर्दी आणि मक्ता
गझल आवडली!
गर्दी आणि मक्ता विशेष.
गझल छान सुटसुटीत नेटकी शेवटचे
गझल छान सुटसुटीत नेटकी
शेवटचे तीन शेर सर्वाधिक आवडले शेवटच्या ओळी बाबत बेफीजी + १
आसवे प्राशून हल्ली झिंगतो
आसवे प्राशून हल्ली झिंगतो मी
एकही डोळ्यांतुनी पडणार नाही
मी ख-या "कैलास"च्या शोधात आहे
शोधल्यावर काय सापडणार नाही ..
हे खूप विशेष. गझल आवडली.
दैव रुसल्यावर यमाला आळवावे तो
दैव रुसल्यावर यमाला आळवावे
तो कदाचित हात आखडणार नाही
<< क्या बात !
सगळेच शेर आवडले. मस्त गझल
सगळेच शेर आवडले.
मस्त गझल !
जे ते आणि घडणार दडणार यांवरून माझा एक शेर आठवला.
घडू जे नये ते घडे रोज हल्ली
खरे कोपऱ्याला दडे रोज हल्ली
राजीव
घडू जे नये ते घडे रोज
घडू जे नये ते घडे रोज हल्ली
खरे कोपऱ्याला दडे रोज हल्ली
वा...चांगला शेर.
रोज हल्ली ह्या रदीफ वरून वरून
रोज हल्ली ह्या रदीफ वरून वरून त्या गझलेवर चर्चा झालेली आठवते आहे