"नाही"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 21 July, 2013 - 12:40

वाटते जे ते कधी घडणार नाही
अन नको जे ते कधी दडणार नाही

मी "असा "कोणास आवडणार नाही
मी "तसा " कोणास नावडणार नाही

आपल्या भेटीमधे होईल का हे ?
मोहरी आगीत तडतडणार नाही ?

दैव रुसल्यावर यमाला आळवावे
तो कदाचित हात आखडणार नाही

आसवे प्राशून हल्ली झिंगतो मी
एकही डोळ्यांतुनी पडणार नाही

ओरडे तो जो भरुनी गच्च आहे
कोरडे आभाळ गडगडणार नाही

व्यक्त होतो मी असा शब्दांत थोड्या
मोकलूनी धाय परवडणार नाही

येथल्या गर्दीत आहे प्राणवायू
एकटा मी सांग तडफडणार नाही ?

मी ख-या "कैलास"च्या शोधात आहे
शोधल्यावर काय सापडणार नाही

-डॉ.कैलास गायकवाड.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"आसवे प्राशून हल्ली झिंगतो मी
एकही डोळ्यांतुनी पडणार नाही

ओरडे तो जो भरुनी गच्च आहे
कोरडे आभाळ गडगडणार नाही" >>> हे दोन सर्वात विशेष वाटले.

वाटते जे ते कधी घडणार नाही
अन नको जे ते कधी दडणार नाही

आपल्या भेटीमधे होईल का हे ?
मोहरी आगीत तडतडणार नाही ?

दैव रुसल्यावर यमाला आळवावे
तो कदाचित हात आखडणार नाही

मी ख-या "कैलास"च्या शोधात आहे
शोधल्यावर काय सापडणार नाही

गझल आवडली. वरील शेर विशेष, ठळक केलेले शेर फार आवडले.

व्यक्त होतो मी असा शब्दांत थोड्या
मोकलूनी धाय परवडणार नाही

येथल्या गर्दीत आहे प्राणवायू
एकटा मी सांग तडफडणार नाही ?

मी ख-या "कैलास"च्या शोधात आहे
शोधल्यावर काय सापडणार नाही <<< वा वा वा

शेवटची ओळ तर फारच आवडली. शोधल्यावर काय सापडणार नाही! दिलखुलासपणे कोणीही दाद द्यावी अशी ओळ! अभिनंदन! Happy

आसवे प्राशून हल्ली झिंगतो मी
एकही डोळ्यांतुनी पडणार नाही
.
व्यक्त होतो मी असा शब्दांत थोड्या
मोकलूनी धाय परवडणार नाही

व्वा,!!

मी ख-या "कैलास"च्या शोधात आहे
शोधल्यावर काय सापडणार नाही

विचार, आणि दुसरी ओळ फारच आवडली.
कधी-कधी मक्त्याचा आग्रह सोडला तर शेर अधिक चांगला होऊ शकतो, असे वाटते.

आसवे प्राशून हल्ली झिंगतो मी
एकही डोळ्यांतुनी पडणार नाही
मी ख-या "कैलास"च्या शोधात आहे
शोधल्यावर काय सापडणार नाही ..
हे खूप विशेष. गझल आवडली.

सगळेच शेर आवडले.
मस्त गझल !

जे ते आणि घडणार दडणार यांवरून माझा एक शेर आठवला.

घडू जे नये ते घडे रोज हल्ली
खरे कोपऱ्‍याला दडे रोज हल्ली

राजीव

घडू जे नये ते घडे रोज हल्ली
खरे कोपऱ्‍याला दडे रोज हल्ली

वा...चांगला शेर.