ऑनलाईन शब्दकोश

Submitted by रैना on 21 July, 2013 - 23:24

तुम्ही वापरत असलेल्या ऑनलाईन शब्दकोशांबाबत लिहीणार का कृपया
लिहीताना
भाषा- संकेतस्थळ-URL-अनुभव/अधिक माहिती असे लिहा म्हणजे वर्गीकरण करण्यास सोपे जाईल.
वेळ मिळाला की मी नंतर इथे चिकटवेन.

उदाहरण १
मराठी-इंग्रजी शब्दकोश - मोल्सर्वर्थ
http://dsal.uchicago.edu/dictionaries/molesworth/

अधिक माहिती/अनुभव
शब्दकोश उत्तम आहे, पण रोमन मध्ये टाईप केल्यास उत्तर मिळतेच असे नाही. संकेतस्थळाचा वापर अजून चांगला करता येऊ शकतो. कधी वेगवेगळ्या प्रकारे query टाकुन पहावी लागते. उपलब्धता चांगली आहे- साईट डाऊन असलेली माझ्या तरी पाहण्यात नाही.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदी शब्दार्थांसाठी सध्या मी 'पुस्तक' हा शब्दकोश वापरते.
हिंदी-हिंदी
www.pustak.org

साईट कधीतरी डाऊन असते. फारशी आयफोन फ्रेंडली नाही. पण शब्दार्थासाठी मला आवडते. विशेषत: हिंदी, अवधी, ब्रज भाषेतले अनेको शब्द सापडतात.
शब्द टायपण्याची सोय नाही. शब्द माहित असला तरच काम होते.

http://www.saakava.com/Dictionary.aspx ही एक आहे. मुलुंडावर कोणीतरी सांगितली होती. इथे मराठी टंकण्याची सोय आहे. फारसा वापरत नाही. सवयीने आधी मोल्सवर्थ वगैरेच उघडले जाते. पण तिथेही शब्द मिळाला नाही तर इथे बघतो.

इंग्लिश टू मराठी साठी चांगली साईट आहे. बहुतेकवेळा शब्द सापडतात. मराठी टू इंग्रजी करायचे असल्यास बटन सिलेक्ट करावे लागते
http://www.khandbahale.com/englishmarathi-q-.htm

याही ठिक आहेत. नेहेमीच शब्द सापडतात असे नाही
http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php

http://www.shabdkosh.com/mr/

भारतीय भाषांमधले शब्दकोश -
http://dsal.uchicago.edu/dictionaries/list.html#malayalam

आंतरजालावरच्या काही शब्दकोशांमध्ये वाचक भर टाकू शकतात, बदल करू शकतात. असे शब्दकोश शक्यतो वापरू नयेत. वर लिंक असलेला आयआयटीबीच्या सर्व्हरवर असलेला शब्दकोश असा आहे. त्यात काही चुका आहेत.

हा एक वेगळा शब्दकोश माझ्या कडूनः

http://smriti.com/urdu/urdu.dictionary.html

विषेशतः गालिबच्या गझलांतील उर्दू शब्दांची डीक्शनरी आहे.

*

ऐसीअक्षरे नामक सायटीच्या फ्रंट पेजवर मराठीसंदर्भकोषांची सूची आहे. त्यात मोल्सवर्थ, दाते कर्वे, परिभाषा कोष, इ. इ. आहेत.. हे याकरता की मी इतर लिंक्स लक्षात ठेवण्या ऐवजी तिथे जाऊन पहातो. अश्या प्रकारचा 'स्टिकी' धागा इथे करता आला तर चांगली सोय होईल असे वाटते.

खप्रे मी वापरली आहे. फार हँग होते. फोनावरुन तर लईच. Sad
एकतर या कुठल्याही डिक्शनर्‍या प्रॉम्प्ट देत नाहीत. माझं स्वप्न आहे की कधीतरी टेकी लोक्स टाईमपास म्हणुन बोटाने स्क्रीन गिरवायचे अ‍ॅप निर्माण करतील. त्यावर बोटाने शब्द लिहीला की ते नीट र्‍हस्व, दीर्घ सुधारुन देईल - जपान्यांसारखे. Proud

खप्रेचा सर्चही भंकस आहे.

पण त्यांचा डेटाबेस चांगला आहे. किती आरती, संग्रह, गाथा- काय वाट्टेल ते मिळते तिथे.

सेनापती, पहिले पान उलटले की धाग्याच्या डोक्यावर टाकेन. तोपर्यंत स्क्रोल करुन काम चालतय.

इब्लिस-
मराठीसंदर्भकोषांची सूची आहे>> वाचून तरी फार भारी वाटले. पाहते.

रैना,
खांडबहाले (http://www.khandbahale.com/marathienglish.php) डिक्शनरी प्रॉम्प्ट देते. पण त्यावर तो मराठी किबोर्ड दिसतो. तो बंद केला की प्रॉम्प्ट दिसतात.
त्याशिवाय गुगल आएमइ पिसीवर असेल तर ते वापरुन लिहीतानाही प्रॉम्प्ट येतात.
मात्र हे सगळे प्रॉम्प्ट बरोबरच असतात असे नाही. र्‍हस्व दिर्घ चुकलेलेही असते, त्यातले आपल्याला योग्य वाटेल ते सिलेक्ट करायचे
बोटाने स्क्रिन गिरवायचा अ‍ॅप मात्र नाहीये.

माझं स्वप्न आहे की कधीतरी टेकी लोक्स टाईमपास म्हणुन बोटाने स्क्रीन गिरवायचे अ‍ॅप निर्माण करतील. त्यावर बोटाने शब्द लिहीला की ते नीट र्‍हस्व, दीर्घ सुधारुन देईल <<< त्याची चाचणी करण्यासाठी ते डॉक्टर लोकांना वापरायला द्यायला पाहिजे. Proud Light 1

http://www.shabdkosh.com/mr/

त्यावर टंकायला जमले तर बरा आहे शब्दसंग्रह. त्यांचा किबोर्ड खूपच वेगळा आहे त्यामुळे हवा तो शब्द टंकताना नाकी
नऊ येतात.