अ‍ॅशेस २०१३

Submitted by रंगासेठ on 18 July, 2013 - 03:29

तसा हा धागा बराच आधी यायला हवा होता. पहिली टेस्ट अफलातून झाली, अ‍ॅश्टन अ‍ॅगरने पराक्रम गाजवला, अतिशय रंगतदार सामना होवून इंग्लंडने पहिली कसोटी जिंकली.

आजपासून दुसरी कसोटी सुरू होतीय, क्रिकेट पंढरीत, लॉर्ड्स वर. स्टीव फीन जखमी असल्याने बाहेर बसेल कदाचित, ऑस्ट्रेलिया कॉवन आणि स्टार्क ला कट्टा देऊन 'उस्मान खवाजा' आणि 'हॅरिस' ला घेतील.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त . रडके English हरायला हवे , पण अवघड आहे .
Fault यांच्या बाजूने असला की Play hard यांच्या विरूद्ध असला की Spirit of cricket Sad

मस्त झाली होती पहिली मॅच. ऑसीज आताही हरणार असे वाटते. भारताविरूद्धच्या ४ धरून ऑस्ट्रेलिया आता पाच सलग हरले आहेत. गेल्या ३० वर्षांत बहुधा हे झालेले नाही. अजून एक हरले तर १९८४ मधे ६ हरले होते त्याची बरोबरी होईल (तेव्हा त्यांचे लिली, दोघे चॅपेल्स वगैरे नुकतेच निवृत्त झालेले होते व विंडीज पूर्ण भरात होती)

ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत असले रेकॉर्ड म्हणजे मोठे आश्चर्यच आहे.

ऑस्ट्रेलिया ला सदैव जिंकत रहायची सवय झाली होती. गेले आठ-दहा वर्षं जिंकत असताना त्यानी जी मग्रुरी दाखवली त्यामुळे आतां त्यांच्या पडत्या काळात त्याना सहानुभूति मिळणं कठीण आहे;
आपण त्यांच्या या उतारा वरच्या प्रवासा ची मजा लुटायला हवी.

हॅरिस चान्गला गोलंदाज आहे. तो ही सिरीज गाजवेल असे मला वाटते.

>> Fault यांच्या बाजूने असला की Play hard यांच्या विरूद्ध असला की Spirit of cricket
असं नाहीये. ब्रॉड स्वतःहून निघून न गेल्यामुळे इथे खूप लोकं बोंब मारताहेत. मला स्वतःला त्यात काही वावगं वाटलं नाही. डीआरएसचे नियम बदलायला हवे आहेत मात्र. इतका ढळढळीत चुकीचा निर्णय असेल तर तिसर्‍या पंचाने हस्तक्षेप करून निदान त्या पंचाला सांगायला हवं आहे काय टिव्हीवर दिसतं आहे ते.

असो. मॅच मस्त झाली. दुसरी पण मस्त व्हायला लागली तर शेवटच्या दिवशी लॉर्डस वर जाईन बहुतेक. शेवटच्या दिवसाची तिकीटं कधीच आगाऊ विकत नाहीत.

ब्रॉड स्वतःहून निघून न गेल्यामुळे इथे खूप लोकं बोंब मारताहेत. मला स्वतःला त्यात काही वावगं वाटलं नाही >> त्याच्यावर कारवाई का झाली नाही हा प्रश्न आहेच , त्याच्या बाबांनी दिनेश रामदीनला माहित असूनही झेलच अपील केल्याबद्द्ल Spirit Of Cricket च उल्लंघन केल्याबाबत कारवाई केली होती .

तरीही ऑसीजच्या शेवटच्या जोडीने 'ऑसी स्पीरीट' दाखवलं, हेंही खरं. पण, एकंदरीत, इंग्लंडचंच पारडं सध्यां जड आहे, हें निर्विवाद.

>> इंग्लंडचंच पारडं सध्यां जड आहे, हें निर्विवाद.
म्हणूनच माझा सपोर्ट ऑस्ट्रेलियाला. पूर्वी इंग्लंडला असायचा. Proud
इंग्लंडचा अँडरसन काढला तर बाकी टीम ऑस्ट्रेलियासारखीच आहे.

म्हणूनच माझा सपोर्ट ऑस्ट्रेलियाला. पूर्वी इंग्लंडला असायचा. फिदीफिदी >>> +१००

२८/३ Happy

इंग्लंडचा अँडरसन काढला तर बाकी टीम ऑस्ट्रेलियासारखीच आहे. >> कूक पण घाल त्यात लिस्ट मधे. हे सगळे controversial प्रकार इंग्लंड्च्या बाबतच अधिक का होतात हल्ली ?

<< इतका वाईट ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्यांदाच बघतोय मी आयुष्यात.>> पाँटींग या संघाचा कर्णधार असायला हवा होता; 'संघाला जिंकून देतो तोच खरा ग्रेट खेळाडू' या त्याच्या दर्पोक्तीची दुसरी बाजू लक्षांत आली असती त्याच्या !!

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया कुणाबद्दलच फारस आदर्/प्रेम्/सहानभुती काहीच नसल्यामुळे ही सिरीज फारश्यी फॉलो करत नाहिये!

बूमरँग - मलाही टीम्स मधे फार इंटरेस्ट नाही. पण अ‍ॅशेस मधे क्रिकेटचा दर्जा २००५ पासून खूप चांगला असतो. पूर्वीही होता, पण फक्त ऑस्ट्रेलियाकडून Happy

इंग्लंड किमान ४५० ची आघाडी घेऊन ऑसीना चौथ्या डावात खेचणार असं दिसतंय. खेळपट्टीने रंग बदलायला सुरुवात केली तर बहुधा आजच चौथा डाव सुरू होईल.
-गा.पै.

बहुतेक मूळबाबांचं द्विशतक झालं की डाव घोषित होईल. दहाएक तास मिळतील इंग्लंडला गोलंदाजीस.
-गा.पै.

कसोटी क्रिकेटची लोकप्रियता उतरणीला कां लागली याचं प्रात्यक्षिकच या सामन्यात इंग्लंड सादर करत असावं. माझ्या मतें क्रिकेटच्या पंढरीवर कसोटी क्रिकेटही रंजक व रंगतदार होऊं शकतं हें दाखवण्याची संधी इंग्लंडने दवडली. रूटचं शतक होतांच ४००+ आघाडी असताना डाव घोषित करणं अपेक्षित व आवश्यक होतं. इंग्लंडचा खेळ बघून ' Work expands to occupy the time available' या व्यवस्थापन शास्त्रातील उक्तीची आठवण येत राहिली !
[स्टार स्पोर्टसवर मध्यंतराच्या वेळात कोहलीचं शतक दाखवत [ खास भारतीय प्रेक्षकांसाठी असावं]; रूटच्या तंत्राचं, टेंपरॅमेंटचं कौतुक वाटत असतानाच कोहलीच्या शैलीदार खेळातलं कसब खूपच वरच्या दर्जाचं व प्रेक्षणीय आहे हें जाणवलं. ]

भाऊ, दोन दिवस बाकी आहेत त्यामुळे इंग्लंड ऑसीज वर 'मनोवैज्ञानिक दबाव' टाकत असेल Happy अ‍ॅलन बोर्डर ने १९९३ च्या अ‍ॅशेस मधे एकदा डाव असाच लांबवला होता त्यामागे ऑसीज नी बरीच फिलॉसॉफी लावली होती. स्टीव वॉ ने त्याबद्दल लिहीले आहे.

अर्थात इंग्लिश समर आणि पाऊस यांचे घनिष्ट संबंध पाहता इंग्लंडने वेळ घालवायला नको. २००७ च्या भारताविरूध्दच्या लॉर्ड्स कसोटीत आधी धोनी व नंतर पावसाने आपल्याला वाचवले होते. ती लिन्क पाहिली तर याच दिवसांत ही कसोटी झाली होती. भूतकाळापासून शिका म्हणावं Happy
http://www.espncricinfo.com/engvind/engine/match/258468.html

कोहली चा खेळ बघायला आवडतो मलाही. सचिन निवृत्त झाल्यावर काही काळ क्रिकेट-विरक्ती येण्याचे चान्सेस आत्ताच दिसत आहेत. कोहली, अचानक फॉर्म मधे आलेला रोहित शर्मा, शिखर धवन आणि पुन्हा पहिल्यासारखा खेळू लागलेला धोनी हे त्यावरचे इलाज असावेत. आता फक्त बोलिंग ओपन करताना रन अप च्या सुरूवातीला गंभीरपणे विचार केल्यासारखा खाली बघणारा आणि पहिल्या काही ओव्हर्स मधे हमखास विकेट काढणारा २००७-२०११ मधला झहीर - तसा कोणीतरी नवीन हवा आहे Happy

ऑसीज , दुसरा डाव, ४८-३ ! स्वानचे २ बळी, अर्थात ४-५व्या दिवशीं स्वानकडून हें अपेक्षितच .