बँकेत लॉकर उघडण्याबाबत...

Submitted by दिपु. on 15 July, 2013 - 06:32

नमस्कार ..
दागिने सुरक्षेचा उपाय म्हणून मला एक लॉकर ओपन करायचे आहे. त्यासंबंधी काय प्रोसेस असते, रेट काय असतो, डिपॉझीट काय असते, कुठली बँक विश्वासपात्र आहे, या संबंधी माहिती हवी आहे. आपल्या पैकी बरयाच जणांचे लॉकर असतील म्हणून ईथे विचारत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपु. सर्वात आधी घराजवळ कुठली बँक आहे ते बघ. लॉकर फार लांबच्या बँकेत ठेवू नयेत असे माझे मत.

त्या बँकेमधे प्रत्यक्ष जाऊन तिथल्या रेट्सची चौकशी कर. प्रत्येक बँकेनुसार हे रेट बदलतात शिवाय काही बँका ठराविक रकमांची एफ्डी देखील करून मागतात. बँकेचे लॉकर रिकामे असल्यास प्रोसेस फार किचकट नाही, अकाऊंट ओपन करून लगेच लॉकर ताब्यात मिळून जाते.

मी आतापर्यंत जनता सहकारी, बँक ऑफ इंडिया (रत्नगिरी), अ‍ॅक्सिस बँक मंगलोर आणि इंडियन बॅंक चेन्नई इथले लॉकर्स वापरले आहेत. सर्वत्र अनुभव चांगलाच आलेला आहे

दक्षे, अगं घरी कोणीच नसतं, आमच्या बिल्डींग मध्ये परवा घरातुन २ मोबाईल चोरीला गेलेत.. आणि जर लॉकर घेतले तर साबांचे दागिने पण ठेवता येतील ह्या सोयीने बघत आहे.
नंदिनी धन्स..
स्टे बॅकेत लॉकर साठी वेटींग आहे. महाराष्ट्र बँकेत १२०० वार्षिक रेट सांगितला, तर डिपॉझीट २०,०००/- आहे पण तुम्ही जास्त पण भरु शकता कारण आम्हाला ५लाख, ७ लाख घ्या पण लॉकर द्या असे म्हणणारे कस्टमर आलेत असे उत्तर आले. Uhoh खरंच एवढी असते का डिपॉझीट? ती रिफंडेबल असते का?

नंदिनीने माहिती दिलीच आहे. एकदा लॉकर उघडल्यावर आणि त्यात वस्तू ठेवल्यावर लॉकर नियमित (३-४ महिन्यात एकदा) उघडून बघावे (जरी लॉकरमधल्या वस्तू लागणार नसतील किंवा नवीन काही लॉकरमधे ठेवणार नसला तरीपण) पुण्यात एका सहकारी बँकेच्या मॅनेजरनेच फारसे वापरात नसलेले लॉकर्स उघडून चोर्‍या केल्या होत्या ज्या बर्‍याच उशीरा उघडकीला आल्या (तोपर्यंत मॅनेजरने राजिनामा दिला होता)

खरंच एवढी असते का डिपॉझीट? ती रिफंडेबल असते >> दिपु, नीट चौकशी कर. ते बहुतेक एफ्डीबद्दल म्हणत असावेत. म्हणजे तेवढ्या रकमेची एफ्डी आपण आपल्या नावावर करून ठेवायची, जोपर्यंत लॉकर आहे तोपर्यंतच्या कालावधीसाठी. रकमेच्या व्याजामधून लॉकरचे रेंट कापून घेतात. ही प्रोसेस मला बँक ऑफ महाराष्ट्रामधे सांगितली होती.

कस्टमर केअर ला फोन करुन सगळी माहीती विचारुन घ्या निट........बँकेत बहुदा व्यवस्थित सांगितली जात नाही...... परंतु फोन करुन कस्टमर केअर ला विचारल्यावर त्यांना व्यवस्थितच सांगावी लागते.......

लॉकर शक्यतो सहकारी बँकेत बघा, रेट्स कमी असतात. HDFC, ICICI च्या वाटेला जाउ नका.. वेटिंग लिस्ट असेलच बहुधा, पण तरी जर नवीन ब्रँच उघडली असेल तर सहजपणे मिळुन जाइल. अजून एक म्हणजे फिक्स डीपॉझिट सोबत एखादी विमा पोलिसी गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
अर्थात हे सर्व तुमचे शहर, प्रभाग आणि कोणती बँक यावर ठरेल.

Enquire at your branch about availability of lockers.

Now a days this is one more avenue to bankers to get deposits. The bank insist for deposits while giving locker facilities. The deposit is kept in your name and hence refundable.
You must have savings bank account there.

The charges depend on the size of the lockers , the smallest size available in our bank have Rs. 1000/- p.a. charges. At some places even suitcase lockers are also available.
I have seen these big lockers at our main branch in Hyderabad.

पुण्यात एका सहकारी बँकेच्या मॅनेजरनेच फारसे वापरात नसलेले लॉकर्स उघडून चोर्‍या केल्या होत्या ज्या बर्‍याच उशीरा उघडकीला आल्या (तोपर्यंत मॅनेजरने राजिनामा दिला होता)
seems to be doubtful (actually impossible )because the locker can not be opened without the key with the customer.
The main object of the lockers is defeated if such things happen.

Generally the Banks insist for depositing amount in matching FDR so as to receive the annual charges from the interest thereon.

अजून एक म्हणजे फिक्स डीपॉझिट सोबत एखादी विमा पोलिसी गळ्यात पडण्याची शक्यता आहे.

हे शक्यतो टाळा , आजकाल हे नविन प्रकार सुरु झालेत.

मोनालि सामानाची जबाबदारी बँकेवर नसते. ती कस्टमरवर असते, मात्र सुरक्षेची जबाबदारी बँकेची असते.

बँकेचे लॉकर उघडताना अथवा बंद करताना चुकूनदेखील आपली चावी मॅनेजरच्या हातात देऊ नका. त्याच्या चावीने लॉकरचा दरवाजा उघडल्यावर त्याला बाहेर जाऊ द्या आणी मगच तुमच्या चावीने पूर्ण लॉकर उघडा. बंद करताना तुमच्या चावीने व्यवस्थित लॉक करून खात्री करून घ्या आणि मगच बाहेर या. बहुतेक बँकांच्या लॉकरसाठी उत्तम सुविधा वापरलेली असते, त्यामुळे चोरीचा फारसा प्रश्न येत नाही. बँकेचे लॉकर तुमच्या चावीखेरीज इतर चावीने उघडत नाही. काही कारणास्तव लॉकर फोडावे लागले (इन्कम्ट्याक्सची धाड!!) तर ते लॉकर कायमस्वरूपी बाद होते असे मला सांगण्यात आले होते खरेखोटे माहित नाही.

मॅनेजरकडे तुमची चावी वगैरे दिल्यास मात्र तो त्याचा गैरफायदा घेऊ शकतो हे कायम लक्षात ठेवा. कुणावरही विश्वास ठेवायचे दिवस नाहीत हल्ली.

बँकेमधे दागिने नेआण करताना पूर्ण काळजी बाळगा. आमच्या ओळखीच्या बाईंनी रत्नागिरीतल्या जनता बँकेतून लॉकरमधून दागिने काढले आणि समोरच असलेल्या रेशन दुकानात धान्य आणायला गेल्या, तिथून त्यांची पर्स कशी आणि कधी लंपास झाली ते त्यांना समजलंसुद्धा नाही. त्यामुळे पूर्ण सावधानता बाळगा.

अतिशय सुरक्षीत लॉकर हवे असतील तर स्विसच्या जुरिक बँकेत चौकशी करा. पाहीजे असेल तर आपला मुकेश सविस्तर माहीती देउ शकेल

लॉकरमधले व्यवहार करतानाची महत्त्वाची काळजी नंदिनीने लिहीलेली आहेच.. त्यातच अजून एक मुद्दा...
लॉकरचे काम करायच्या वेळेस घरून बँक आणी बँकेतून घर एवढाच प्रवास करावा.. नंतर काय करायची असतील ती कामे करायला वेगळे बाहेर पडावे.

१. राष्ट्रीयकृत किंवा सहकारी बँकेत पहा
२. घराजवळ असणे सोयीचे
३. लॉकर साठी काही ठराविक वेळ आहे का हे विचारा
४. एका वर्षात किती वेळा लॉकर उघडता येईल [कि असे काही बंधन नाही] हे विचारा. काही बॅंक एका ठराविक लिमिट नंतर प्रत्येक वेळेस थोडी फी आकारतात
५. कोणकोणत्या साईझ मध्ये लॉकर मिळेल हे विचारून आपल्याला काय साईझ लागेल हे ठरवा
६. लॉकर साठी नॉमिनेशन करता येते का विचारा

दक्षे, अगं घरी कोणीच नसतं, आमच्या बिल्डींग मध्ये परवा घरातुन २ मोबाईल चोरीला गेलेत >>>>

मोबाईल लॉकरमध्ये ? आयडिया चांगली आहे Happy

शक्यतो जवळची आणि खात्रीलयक बँक, नेहमी जाउन लॉकरमधील वस्तू सुरक्षित असल्याची खात्री करुन घेणे. कोणालाही न सांगता दिवाळिला सोने आणणे व नेणे.

लॉकर उघडताना व बंद करताना काही गोष्टी मी कटाक्षाने पाळते. सर्वांनाच त्याचा फायदा व्हावा म्हणून इथे लिहीते आहे. (शेअर करणेसाठी काय शब्द आहे?)

लॉकर रुम मधे जाताना खाली काही पडले आहे का (आधीच्या ग्राहकाच्या वस्तुंपैकी), ते पहाते. असेल तर ते बँकेकडे देऊन टाकते. एकदा एक वस्तु सापडली होती तेव्हापासून ही सवय लागली आहे. हे करण्यात किमान आधी आलेला माणूस लगेच बँकेत आला तर त्याची वस्तु त्याला परत मिळण्याची शक्यता वाढते एवढेच.

लॉकर उघडल्यावर भसाभसा वस्तु बाहेर काढत नाही. शांतपणे हळूवारपणे काढते. नो गडबड. मग हव्या त्या वस्तु एका कॉटनच्या पिशवीत ठेवून मग ती पिशवी, खांद्याला अडकवायच्या भल्या थोरल्या पर्स मधे आत गुडूप होईल अशा रितीने ठेवते. खांदयाच्या पर्स् मधून ही पिशवी बाहेर डोकावता कामा नये.

आता महत्वाची गोष्ट, आधी काढलेल्या वस्तु नीटनेटकेपणाने परत जागेवर ठेवणे. म्हणजे पुढच्या वेळेस लॉकर उघडताना आपोआप काहीही खाली पडणार नाही.

लॉकरमधे सोन्याचे सर्व दागिने एकाच दृष्टी़क्षेपात दिसतील अश्या प्रकारे एकाच मोठ्या ज्वेलरी बॉक्स मधे ठेवणे, म्हण़जे सोन्याचे दागिने काढताना फक्त एक डबा बाहेर काढून मग त्यातले हवे ते घेता येते. सतरांदा सतरा डब्या उघडाव्या लागत नाहीत.

चांदीचे दागिने, उपकरणी वगैरे वेगळ्या मलमलच्या कपड्यात किंवा कॉटनच्या पिशवीत एकात एक नीट रचून ठेवावेत. सोने चांदी सगळे एकत्र ठेवू नये. कमी किमतीच्या चांदीच्या किंवा मोत्याच्या वस्तु ठेवून लॉकरची जागा अडवू नये.

लॉकर बंद करायच्या आधी मी आतील वस्तुंचा एक फोटो काढते. सोन्याच्या वस्तु आकाराने आटोपशीर असल्याने तो पटकन काढता येतो. ट्रान्स्प्ररंट कव्हरची ज्वेलरी बॉक्स असण्याचा हा एक फायदा.

लॉकरमधे एका पिशवीत सर्व दागिन्यांच्या रिसिट्सच्या झेरॉक्स ठेवाव्यात म्हणजे त्यासुद्धा एका ठिकाणी नीट रहातात.

लॉकर बंद करताना खालील स्टेप्स मधे बंद करावा.
१. वस्तू आत ठेवणे.
२. बाहेर, शिडीवर, कपाटावर, किंवा इतरत्र काही राहिले नाहीना ते चेक करणे.
३. लॉकर बंद करणे. नीट बंद केला का त्याची खात्री करणे
किल्ली बाहेर काढणे, व काढली की पर्स मधे ठरावीक ठिकाणी नीट ठेवणे.

मी आजवर अनेकदा किल्ली हरवली आहे. घरी आल्यानंतर लॉकर नीट बंद केला का ते आठवत नसल्याने परत बँकेत खेटे घातले आहेत. दागिने खाली पाडले आहेत. बँकेतून काय आणले व काय नाही ह्याचा काउंट विसरले आहे. ह्या सग्ळ्या अनुभवांतून गेल्यावर माझी माझी तयार केलेली ही चेकलिस्ट आहे व आता मला त्याचा खूपच उपयोग होतो.

छान धागा आहे आणि तो दर सहा महिन्यांनी अथवा दरवर्षी नवीन सुरू करावा कारण नियम ,भाडं आणि डिपॉझिट रक्कम फार बदलतेय .वरील प्रतिसादात सर्व महत्वाचे मुद्दे आले आहेत .मी एक सांगू इच्छितो .दोन नावाने लॉकर असल्यास बंद करतांना दोघांच्या सह्या लागतात .वडिलांचे नाव असल्यास आणि दुर्दैवाने मृत्यू झाल्यास इतर भावंडाच्या सह्या वारस वगैरे प्रतिज्ञापत्र मागतात .बरेचवेळा दुसरा लॉकर मिळत नाही आणि नवीन नावांसाठी वाढीव नवे डिपॉझिट लागेल म्हणून मुली लग्नाअगोदरचा वडिलांच्या नावासह उघडलेला लॉकर चालू ठेवतात .कुटुबात कलह असल्यास अप्रिय वादाला सामोरे जावे लागते/ निर्माण होतात .

चिंगी आणि सुमेधा. पोस्टी आवडल्या.
मला मुख्यतः काय ठेवलेय तेच विसरायला होते. त्यामुळे अनेक घोळ झाले आहेत. आता एक यादि करुन ठेवली आहे लॉकरमध्ये काय सामान आहे त्याची.
(ती हरवली नाही म्हणजे नशीब आहे) Proud

नैसर्गीक आपती किंवा जबरी चोरी किंवा दरोडा बँकेतच पडला तर आपल्या लॉकरमधील वस्तू आपल्याला गमावाव्या लागतात. त्यामुळे ती शक्यता गृहीत धरुनच लॉकरमधे वस्तु ठेवाव्यात. अद्याप तरी त्यातल्या वस्तुंचा विमा उतरवणे सुरु झाले नाहीये. मध्यंतरी ह्या विम्याबद्दल बातमी वाचली परंतु नंतर पुढे काहीच नाही ऐकले.

मनीष , लिन्क वाचल्या.
मोडस ऑपरडी काहीतरी वेगळी असेल , बातमीत ते क्लिअर होत नाही. कारण डुप्लिकेट चावी हा प्रकार नसतोच.
एखाद्याने किल्ली हरवली तर कपनीच्या माणसाला बोलाउन लॉकर ब्रेक ओपन करुन दुसरे लॉक लावतात.
बॅकेचा माणुस आपल्यासोबत त्याची चावी लावतो , तेव्हाच लॉकर ओपन होते, त्यानतर तो बाहेर जातो , आपल्या चावीने लॉकर ब.न्द होते.
वर एका प्रतीसादाप्रमाणे , लॉकर ब.न्द करायचे राहून गेल्यास हे शक्य आहे.

लॉकर बंद करायच्या आधी मी आतील वस्तुंचा एक फोटो काढते. सोन्याच्या वस्तु आकाराने आटोपशीर असल्याने तो पटकन काढता येतो. ट्रान्स्प्ररंट कव्हरची ज्वेलरी बॉक्स असण्याचा हा एक फायदा.>>>>>>
मी यादी करून ठेवते पण हि आयडिया भारी आहे.

ज्या बँकेत आपले नेहमी जाणे होते तिथे लॉकर असावा. इतर कामासाठी गेलो की १-२ महिन्यातून लॉकर उघडून बघावा, लॉकरचे काही काम नसेल तरी सुद्धा.

विप्रा.. माझे स्वतःचे पण लॉकर आहे त्यामुळे मला माहिती आहे प्रोसिजर काय असते ती. तरीपण हे घडले आहे म्हणून आम्ही आमच्या लॉकरची काळजी घेतो. आणि तेच मी दिपुला सुचवले. काळजी घेउ नये असं तुमचं मत असेल तर जाउद्या.

आता एक यादि करुन ठेवली आहे लॉकरमध्ये काय सामान आहे त्याची >> रैना.. आम्ही २ याद्या केल्यात, एक लॉकर मधे आणि एक आमच्या जवळ Happy फक्त दोन्ही याद्या नेहमी sync मधे ठेवायला पाहिजेत Happy

काळजी घेउ नये असं तुमचं मत असेल तर जाउद्या.

नाही , असे नाही. पण गैरसमजाने बँकांच्या विष्वासार्ह्तेवर प्रश्न निर्माण होतात त्यामुळे मी बाजु मांडली.

As a banker I wish you all HAPPY BANKING .

Pages