आले! आले!! आले!!!
यंदा परत एकदा 'मायबोली' टीशर्ट आले!
मधले एक वर्ष मायबोलीकरांना टी-शर्ट विना करायला लागलेल्या विरहाचे आनंदात रुपांतर करायला यंदा परत एकदा 'मायबोली टीशर्ट' आणि त्याबरोबरच 'मायबोली बॅग' उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.
ह्या वर्षाच्या सुरुवातीला गाजलेल्या मायबोली शीर्षक गीतातील दोन ओळी यंदा टी-शर्ट वर असणार आहेत.. आणि त्याचे सुलेखन केले आहे पल्लीने.
गेल्या काही वर्षातील वाढती मागणी लक्षात घेऊन यंदा तीन प्रकारात टी-शर्ट असणार आहेत.
१. खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट. (चारकोल रंग)
२. राऊंडनेक टी-शर्ट (चारकोल रंग)
३. महिलांसाठी व्ही-नेक टी-शर्ट (मोरपंखी रंग)
४. बॅग
बॅगचा आकार - ९ इंच X ७ इंच X ४ इंच. बॅग खांद्यावर घेता येईल अशा पाऊच सारखी आहे.
राऊंडनेक व व्हीनेक टी-शर्ट वर पुढे सुलेखन असेल, डाव्या बाहीवर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेबसाईट अॅड्रेस असेल.
खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट वर खिश्यावर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेब अॅड्रेस असेल.
लहान मुलांसाठी राऊंडनेक चारकोल रंगाचे आणि व्ही-नेक मोरपंखी रंगाचे टीशर्ट उपलब्ध आहेत.
लहान मुलांच्या टीशर्टसाठी अंदाजे साईज.
वय वर्षे १-२ साठी --> २२
वय ३-४ साठी --> २४
वय ५-६ साठी --> २६
वर ७-८ साठी --> २८
वय ९-१० साठी --> ३०
वय ११-१२ साठी --> ३२
आणि तिथून पुढे रेग्युलर साईज
(हे फक्त एक कोष्टक आहे जे शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मुलगा प्रत्यक्षात कसा आहे त्यानुसारच ऑर्डर नोंदवा.)
खिश्यासहीत कॉलर टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.३५०/-
राऊंड नेक व लेडिज टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
लहान मुलांच्या टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. २००/-
आणि बॅगची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.)
यंदाची देणगी प्रगती प्रतिष्ठान, जव्हार ह्या संस्थेस देण्यात येणार आहे. प्रगती
प्रतिष्ठानबद्दल आधिक माहिती पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.
टीशर्टांचे पैसे भरण्याची माहिती थोड्याच दिवसात देण्यात येईल. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.
आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टाची ऑर्डर नोंदवायची, कारण ४ जुलै, २०१३ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.
ऑर्डर कशी नोंदवाल?-
इथे टिचकी मारुन
ऑर्डर फॉर्म मध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी वेगळा साईज असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.
टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-
साईज-------रुंदी(2 L)-------उंची(H)
XXL-------46"-------33"
XL -------44"-------31.5"
L -------42"-------30"
M -------40"-------28.5"
S -------38"-------27"
XS -------36"-------25.5"
XXS-------34"-------24"
फॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टी-शर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात टोटल हवे असलेले टी-शर्ट लिहायची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या मेलबॉक्स मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंक मधे बघितल्यास बघता येईल.
महत्त्वाचे-
१. टीशर्ट 'राऊंड नेक' प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे-मुंबई आणि नाशिक मधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.
काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे -
२. हिमांशु कुलकर्णी -
हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? तर, झटपट ऑर्डर नोंदवा.
टीशर्टचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना
पुणे , मुंबई आणि नाशिक येथे ७ जुलै २०१३ या एकाच दिवशी टीशर्टचे पैसे जमा केले जातील.
टीशर्टचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकच्या मायबोलीकरांनी पैसे भरण्यासाठी मायबोली आयडी विदिपा म्हणजेच विजय दिनकर पाटील यांच्याशी ९८८१४९७१८७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.
नोंदणी केलेल्यांचे पैसे ७ जुलैच्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
टी शर्टस मिळण्यासंदर्भातली सूचना:-
टी शर्टस मिळण्याचे ठिकाण, तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - इथला तपशील लवकरच देण्यात येईल.
ज्यांनी पोस्टाने टीशर्टस मागवले आहेत त्यांना पोस्टेज खर्चाची माहिती लवकरच मेलने पाठविण्यात येईल. आणि ७ जुलैच्या आत त्यांचे टी शर्ट+पोस्टेजचे पैसे आले असतील तर त्यांना २१ जुलै नंतर टीशर्टस पाठविले जातील. टी शर्ट पाठविल्यावर तशी त्यांना संयोजकांकडून मेलही करण्यात येईल.
लोकहो, टी शर्ट संदर्भात काही चौकशी करायची असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.
अत्यंत महत्त्वाची सूचना - ऑनलाईन पैसे भरणार्यांनी कृपया नवीन ऑर्डर्स करु नयेत. कारण योग्य वेळेत म्हणजेच ७ तारखेपर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही..
प्रत्यक्ष पैसे भरणारे अजूनही ऑर्डर बुक करु शकतात. त्यांच्यासाठी ऑर्डर नोंदविण्याची मुदत ६ जुलै पर्यंत करण्यात आलेली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.
ऑर्डर नोंदवली आहे. व्ही नेक
ऑर्डर नोंदवली आहे.
व्ही नेक - १ - ४२ साईझ
कॉलर - १ - ४४ साईझ
व्ही नेक - १ - २२ साईझ
मी एका मित्राला सांगितले
मी एका मित्राला सांगितले आहे...
तो टी शर्ट पुण्यातुन कलेक्ट करेल....
मला पुणे येथील व्यक्तीचा सम्पर्क क्रमांक मिळेल का??
नाशकात पैसे कोणाकडे द्यायचे
नाशकात पैसे कोणाकडे द्यायचे आहेत?
हेम हे मायबोलीकर माझ्या वतीने पैसे देणार आहेत.
व्ही नेकमध्ये लहान मुलांच्या
व्ही नेकमध्ये लहान मुलांच्या २ वेगवेगळ्या साईझ नोंदवायच्या होत्या. एकच नोंदवता आली. आता दुसरं पिल्लू माझ्या उरावर बसणार.. कांय करावं? .. आणि आता वेळही संप्प्प्प्प्प्प्प ली...
मी दोन टी शर्ट्सची ऑर्डर
मी दोन टी शर्ट्सची ऑर्डर नोंदवली आहे. एक व्ही नेक लार्ज आणी एक व्ही नेक २४ साईझ. मला ईमेल मिळालेली नाही. अगदी स्पॅम फोल्डरमधे पण नाही. पैसे मुलुंडच्या मायबोलीकरांकडे सुपुर्द केलेले आहेत. कृपया ऑर्डर मिळाली की नाही याची पोच द्याल का?
नमस्कार संयोजक, मी काल (३
नमस्कार संयोजक,
मी काल (३ जुलै) ऑर्डर नोंदविली होती.
आज (४ जुलै) आणखी शर्टांसाठी ऑर्डर संपादित केली.
संपादन केल्यानंतर मेल आली नाही.
भिडेकाका, संपादन केल्यावर
भिडेकाका, संपादन केल्यावर इमेल येत नाही. वर मुद्दा क्रमांक ४ पहा ठळक अक्षरातला. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही,
मी काल online पैसे transfer
मी काल online पैसे transfer केले.. सोबत screen shot सुद्धा लावला.. त्याचे confirmation mail आले नाही.. राऊंड नेक टीशर्ट XXL - 46: १, व्ही-नेक टीशर्ट L - 42: १ व XL - 44: १ आणि वेगळी साईझ: ३२ संख्या: १ साठी एकुण १००० रु. धन्यवाद..
सतिश.. स्पॅम मध्ये पहा.
सतिश.. स्पॅम मध्ये पहा.
Junk folder सुद्धा check केला
Junk folder सुद्धा check केला आहे.. कदाचित busy schedule मुळे मेल पाठवीला गेला नसेलही..
रविकांत, पुण्यातील संपर्क
रविकांत, पुण्यातील संपर्क नंबर - हिमांशु कुलकर्णी - ९८२२०१८७९५
वत्सला, नाशिक मध्ये पैसे कोणाकडे द्यायचे ते लवकरच जाहिर केले जाईल.
हेम, प्रत्यक्ष पैसे भरणार्यांसाठी मुदत ६ जुलै पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तुम्ही तुमची ऑर्डर अजूनही बदलू शकता.
प्राडी, तुमची ऑर्डर नोंदवली गेली आहे.
सतिश, तुमचे पैसे जमा झाले आहेत. कळविण्यास झालेल्या उशिराबद्दल दिलगीर आहोत.
मी काल ऑर्डर नोंदवली आहे.
मी काल ऑर्डर नोंदवली आहे. ऑनलाईन पैसे भरण्यासाठी लिंक केव्हा मिळेल?
मी ऑर्डर नोंदवली आहे पण
मी ऑर्डर नोंदवली आहे पण प्रत्यक्ष पैसे देणार्यांनी पैसे कसे द्यायचे (म्हणजे कुठे, कोणाकडे ) ते कळालं नाहीये अजुन
किंवा मी मिसलय ते वाचायचं
प्लिज एकदा कोणी तरी परत सांगा
रिया, पुणे , मुंबई आणि
रिया,
पुणे , मुंबई आणि नाशिक येथे ७ जुलै २०१३ या एकाच दिवशी टीशर्टचे पैसे जमा केले जातील.
टीशर्टचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - इथला तपशील लवकरच देण्यात येईल.
नोंदणी केलेल्यांचे पैसे ७ जुलैच्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.
रिया, कित्ती ग आळशी तू
रिया, कित्ती ग आळशी तू वाचनाचे बाबतीत.
>>>> ही घे सूचना, वर आहेच्चे.
टीशर्टचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना
पुणे , मुंबई आणि नाशिक येथे ७ जुलै २०१३ या एकाच दिवशी टीशर्टचे पैसे जमा केले जातील.
टीशर्टचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - इथला तपशील लवकरच देण्यात येईल. <<<<<
केले order आणि पैसेही भरले!
केले order आणि पैसेही भरले!
अत्यंत महत्त्वाची सूचना -
अत्यंत महत्त्वाची सूचना - ऑनलाईन पैसे भरणार्यांनी कृपया नवीन ऑर्डर्स करु नयेत. कारण योग्य वेळेत म्हणजेच ७ तारखेपर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही.. >>>> हे मला नीटस समजल नाही, काही अपरिहार्य कारणामुळे मला पैसे ट्रान्स्फर करायला उशीर होत आहे. मी उद्या पैसे ट्रान्स्फर करू शकतो. ते होतील कां रविवार दि. ०७.०७.२०१३ पर्यंत जमा ?
केदार. पूर्णतः नवीन ऑर्डर्स
केदार. पूर्णतः नवीन ऑर्डर्स करु नयेत.. कारण त्या ऑर्डर्स आल्यावर त्यांना अकाउंट डिटेल्स पाठवून, अकाऊंट अॅड करुन, फायनल पेमेंट होई पर्यंत ७ जुलै उलटून गेलेली असेल.
ज्यांनी काल पर्यंत ऑनलाईन ऑर्डर नोंदवलेली आहे त्यांना आज पेमेंट डिटेल्स पाठवलेले आहेत. त्यांचे पैसे जमा होई पर्यंत नक्कीच वेळ दिला जाईल. पैसे ट्रान्सफर केल्याची मेल पाठवल्यावर पैसे डिपॉझीट होई पर्यंत वेळ जाईल त्याचा काहीही प्रश्न येणार नाही. उद्या पैसे ट्रान्सफर केले तरी चालतील.
ज्यांनी काल पर्यंत ऑनलाईन
ज्यांनी काल पर्यंत ऑनलाईन ऑर्डर नोंदवलेली आहे त्यांना आज पेमेंट डिटेल्स पाठवलेले आहेत. >> मला नाही मिळाले अजूनपर्यंत ऑन्लाईन पैसे transfer करण्यासाठी डिटेल्स..
प्रत्यक्ष पैसे भरणार्यांसाठी
प्रत्यक्ष पैसे भरणार्यांसाठी मुदत ६ जुलै पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. तुम्ही तुमची ऑर्डर अजूनही बदलू शकता.>>
माझी अडचण वेगळीच आहे. संपादन केल्यावर व्ही नेकचे मला २ वेगळ्या साईझचे हवे आहेत. (लहान मुलांसाठी)
एक ३२ व एक २४ चा.. पैकी ३२ ची ऑर्डर नोंदवली आहे. आता २४ साठी ऑर्डर कुठल्या रकान्यात देऊ???
हेम, २४ चा साईज त्याच
हेम, २४ चा साईज त्याच रक्यान्यात भरा.. २४.३२ - १,१ अशी नोंद करा..
श्यामली, लिंबुभाऊ
श्यामली, लिंबुभाऊ धन्स!
लिंबुभाऊ मी जाम गडबडीत होते. ऐन वेळेला निर्णय घेतला आणि नोंदणी करुन टाकली पण सगळं वाचण्याएवढा वेळ नव्हता म्हणून इथे विचारलं
केदारदादा तुला हवं असेल तर तुझे पैसे मी भरते प्रत्यक्ष आणि माझ्याकडे ठेवते तुझे टीशर्ट्स... बघ कस ते!
हिम्स, ठांक्यू. नोंदणी झाली..
हिम्स, ठांक्यू. नोंदणी झाली.. नासिकला रक्कम कुठे जमा करायची?
हिम्स, ठांक्यू. नोंदणी झाली..
हिम्स, ठांक्यू. नोंदणी झाली.. नासिकला रक्कम कुठे जमा करायची?..>>> आज दुपारपर्यंत ती माहिती इथे मिळेल तुम्हाला.
पैसे ट्रान्सफर केले आहेत.
पैसे ट्रान्सफर केले आहेत. स्क्रिन शौट सुध्दा इमेल केला आहे....
टी शर्ट आणि बॅग मुग्धानंद कलेक्ट करेल. धन्यवाद.
पैसे जमा केले.स्क्रीन शॉट
पैसे जमा केले.स्क्रीन शॉट पाठवला.आयडु ठाण्यातुन कलेक्ट करेल्....धन्यवाद
एक महत्वाची सूचना:-
एक महत्वाची सूचना:-
नाशिकच्या मायबोलीकरांनी पैसे भरण्यासाठी मायबोली आयडी विदिपा म्हणजेच विजय दिनकर पाटील यांच्याशी ९८८१४९७१८७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.
ऑर्डर नोंदवली आहे. माझे
ऑर्डर नोंदवली आहे. माझे टीशर्ट श्यामली घेईल आणि प्रत्यक्ष पैसे भरेल. धन्यवाद.
मी माझ्या फोर्म मध्ये बदल
मी माझ्या फोर्म मध्ये बदल केला आहे, ऑन्लाईन पैसे भरण्यात तन्त्रीक अडचणी येत असाल्या कारणाने मी पैसे प्रत्यक्श/मीत्र भरेल असा बदल केला आहे (रीया उद्या पुणयेथे पैसे भरेल ) काही अडचणी येत असेल तर कळवणे
केदार
ड्न! दक्षीची भेट थोडक्यात
ड्न!
दक्षीची भेट थोडक्यात चुकली
मानसीला भेटले
Pages