मायबोली टी-शर्ट २०१३

Submitted by टीशर्ट_समिती on 20 June, 2013 - 08:38

आले! आले!! आले!!!

यंदा परत एकदा 'मायबोली' टीशर्ट आले!

मधले एक वर्ष मायबोलीकरांना टी-शर्ट विना करायला लागलेल्या विरहाचे आनंदात रुपांतर करायला यंदा परत एकदा 'मायबोली टीशर्ट' आणि त्याबरोबरच 'मायबोली बॅग' उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

ह्या वर्षाच्या सुरुवातीला गाजलेल्या मायबोली शीर्षक गीतातील दोन ओळी यंदा टी-शर्ट वर असणार आहेत.. आणि त्याचे सुलेखन केले आहे पल्लीने.

गेल्या काही वर्षातील वाढती मागणी लक्षात घेऊन यंदा तीन प्रकारात टी-शर्ट असणार आहेत.

१. खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट. (चारकोल रंग)
collar NEW.jpg

२. राऊंडनेक टी-शर्ट (चारकोल रंग)
T shirt Men NEW.jpg

३. महिलांसाठी व्ही-नेक टी-शर्ट (मोरपंखी रंग)
T shirt Women dark blue.jpg

४. बॅग
bag IMG_20130601_180551 new  2.jpg

बॅगचा आकार - ९ इंच X ७ इंच X ४ इंच. बॅग खांद्यावर घेता येईल अशा पाऊच सारखी आहे.

राऊंडनेक व व्हीनेक टी-शर्ट वर पुढे सुलेखन असेल, डाव्या बाहीवर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेबसाईट अ‍ॅड्रेस असेल.

खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट वर खिश्यावर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेब अ‍ॅड्रेस असेल.

लहान मुलांसाठी राऊंडनेक चारकोल रंगाचे आणि व्ही-नेक मोरपंखी रंगाचे टीशर्ट उपलब्ध आहेत.

लहान मुलांच्या टीशर्टसाठी अंदाजे साईज.
वय वर्षे १-२ साठी --> २२
वय ३-४ साठी --> २४
वय ५-६ साठी --> २६
वर ७-८ साठी --> २८
वय ९-१० साठी --> ३०
वय ११-१२ साठी --> ३२
आणि तिथून पुढे रेग्युलर साईज
(हे फक्त एक कोष्टक आहे जे शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मुलगा प्रत्यक्षात कसा आहे त्यानुसारच ऑर्डर नोंदवा.)

खिश्यासहीत कॉलर टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.३५०/-
राऊंड नेक व लेडिज टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
लहान मुलांच्या टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. २००/-
आणि बॅगची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-

(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.)

यंदाची देणगी प्रगती प्रतिष्ठान, जव्हार ह्या संस्थेस देण्यात येणार आहे. प्रगती
प्रतिष्ठानबद्दल आधिक माहिती पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.

टीशर्टांचे पैसे भरण्याची माहिती थोड्याच दिवसात देण्यात येईल. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.

आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टाची ऑर्डर नोंदवायची, कारण ४ जुलै, २०१३ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

ऑर्डर कशी नोंदवाल?-
इथे टिचकी मारुन

ऑर्डर फॉर्म मध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी वेगळा साईज असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.

टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-

साईज-------रुंदी(2 L)-------उंची(H)
XXL-------46"-------33"
XL -------44"-------31.5"
L -------42"-------30"
M -------40"-------28.5"
S -------38"-------27"
XS -------36"-------25.5"
XXS-------34"-------24"

tshirt size.jpgफॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टी-शर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात टोटल हवे असलेले टी-शर्ट लिहायची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या मेलबॉक्स मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंक मधे बघितल्यास बघता येईल.

महत्त्वाचे-
१. टीशर्ट 'राऊंड नेक' प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे-मुंबई आणि नाशिक मधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्‍या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्‍या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे -
२. हिमांशु कुलकर्णी -

हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? Happy तर, झटपट ऑर्डर नोंदवा.

टीशर्टचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना

पुणे , मुंबई आणि नाशिक येथे ७ जुलै २०१३ या एकाच दिवशी टीशर्टचे पैसे जमा केले जातील.

टीशर्टचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकच्या मायबोलीकरांनी पैसे भरण्यासाठी मायबोली आयडी विदिपा म्हणजेच विजय दिनकर पाटील यांच्याशी ९८८१४९७१८७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.

नोंदणी केलेल्यांचे पैसे ७ जुलैच्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.

टी शर्टस मिळण्यासंदर्भातली सूचना:-

टी शर्टस मिळण्याचे ठिकाण, तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे:-

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - इथला तपशील लवकरच देण्यात येईल.

ज्यांनी पोस्टाने टीशर्टस मागवले आहेत त्यांना पोस्टेज खर्चाची माहिती लवकरच मेलने पाठविण्यात येईल. आणि ७ जुलैच्या आत त्यांचे टी शर्ट+पोस्टेजचे पैसे आले असतील तर त्यांना २१ जुलै नंतर टीशर्टस पाठविले जातील. टी शर्ट पाठविल्यावर तशी त्यांना संयोजकांकडून मेलही करण्यात येईल.

लोकहो, टी शर्ट संदर्भात काही चौकशी करायची असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.

अत्यंत महत्त्वाची सूचना - ऑनलाईन पैसे भरणार्‍यांनी कृपया नवीन ऑर्डर्स करु नयेत. कारण योग्य वेळेत म्हणजेच ७ तारखेपर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही..

प्रत्यक्ष पैसे भरणारे अजूनही ऑर्डर बुक करु शकतात. त्यांच्यासाठी ऑर्डर नोंदविण्याची मुदत ६ जुलै पर्यंत करण्यात आलेली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या साईज मुळे मी अजुन कन्फुज्ड मला ४० कि ४२ L कि XL?
मी पुण्यात आल्यावर बुक केले तर चालेल ना? टीशसचा सदस्यास प्रत्यक्ष भेटून...

नी Proud
विनय Lol

बार्गेनिंग, निवडा निवडी शिवाय खरेदीत मज्जा नाही... माबो असली म्हणुन काय झालं? Proud

टी_स बघा की काही होतय का आमच्या मागणीचं Proud

खरं तर हरकत नाहीये रियाची मागणी पूर्ण करणं. कापड आणणार आहातच ते, फक्त स्टिचिंग वेगळं. लहान मुलींचे निळे टीशर्ट द्यायला होकार दिलातच की.

समिती, ईव्हॉल्व्ह! Proud

T shirt vatayala riyala basava sagali haus bhagel tichi balgandharvachya kattyavarach :Domaa:

रिया >+१००००
टी_स बघा की काही होतय का आमच्या मागणीचं
>>>>>>> अगदी .. अगदी हमारी मांगे पुरी करो ह्या टाइपच Proud

Proud

शुभातै मागच्या वेळे सारखं मी गेल्यावर हे लोक्स वडापाव नसतील खाणार तर थांबेन मी Proud

पूनम,तुमाखमै Proud

टी_स करा करा विचार करा

रुंदी म्हणले आहे, ते चित्रात दाखविल्याप्रमाणे व्यक्तिच्या छातीच्या फक्त दृष्य भागाची रुन्दी मोजायची की टेप आख्ख्या छातीपाठीला गुन्डाळून माप घ्यायचे?

ते चित्रात दाखविल्याप्रमाणे व्यक्तिच्या छातीच्या फक्त दृष्य भागाची रुन्दी मोजायची की टेप आख्ख्या छातीपाठीला गुन्डाळून माप घ्यायचे? -> टेप आख्ख्या छातीपाठीला गुन्डाळून माप घ्यायचे.

जनरली शर्ट ज्या मापाचा असतो त्या मापाचा टी-शर्ट व्यवस्थित बसतो.

>> बायकाही पोलो टी-शर्ट घेऊ शकतात की, पण तो टी-शर्ट रेग्युलर पोलो असेल. त्याचा आकार लेडिज टी-शर्ट >>सारखा नसेल
ते कळलं हो टीशर्ट समिती. म्हणूनच विचारलं बायांसाठी नाहीत का? तर नुसतं "नाही" म्हणायचं ना. मग तसं बाया तो चारकोल राउंड नेकही घेऊ शकतातच की. Wink

धन्यवाद समिती.
दुपारी माझी पोस्ट आणि तुमची पोस्ट साधारण एकाच वेळी आलं. तुमची पोस्ट पाहून मी माझी पोस्ट एडिट करायला गेले, तर माझं नेट-कनेक्शन गेलं.

मस्त आहेत सगळे प्रकार! यंदा घेणार म्हणजे घेणारच!

नाशिकला पैसे कुणाकडे द्यायचे? टी शर्टस कुठुन घ्यायचे? कधीपर्यंत पैसे भरायचे आणि टी शर्टस कधी मिळणार? जरा सांगा प्लीज!
(अनेक पोस्टी असल्याने अजुन वाचल्या नाहीत.)

शर्ट/ बॅग हे मायबोली खरेदी विभागात उपलब्ध होउ शकेल का? भारताबाहेरील मायबोलीकर सुद्धा ऑर्डर करु शकतील.

शर्ट/ बॅग हे मायबोली खरेदी विभागात उपलब्ध होउ शकेल का >>> +१

मायबोली खरेदीत पुस्तकं किंवा इतर भेटवस्तू असतात तसेच टी-शर्ट का नाहीत ? आम्ही हव्या त्या पत्त्यावर शिप करू शकतो.

टी शर्ट समिती.........जो पहिला कोलर वाला टी शर्ट आहे त्यावर मा बो लोगो व्यतिरीक्त अजुन काहीही लिहिलेले नाही हे कन्फर्म करायाचे होते...... प्लीज सागा .........

सुहास्य, पहिला कॉलर वाला टी-शर्ट प्लेन आहे. त्यावर फक्त मायबोलीचा लोगो आहे. त्या व्यतिरिक्त काहीही नसेल.

धन्यवाद ......... मी करते ऑरडर .......फक्त भारता बाहेर आसल्याने जरा विचार करतिये ....... मा बो वर इतर खरेदी जशी करता येते तसे हे टी शर्ट मिळाले तर बरे होईल .......

काय मस्त रंग आहे...... !!
सुलेखन पण खासच गं पल्ले Happy
मला पण एक हवाय.
बुक करेनच.

आत्तापर्यंत ऑर्डर केलेल्या सर्वांना नम्र विनंती.

आपण केलेली ऑर्डर कृपया परत एकदा ऑर्डर फॉर्म मध्ये चेक करा. बाफवर दिलेले टी-शर्टचे साईज आणि ऑर्डर फॉर्म मधले टी-शर्ट साईज बरोबर केलेले आहेत. त्यात काही फरक दिसत असेल तर तो बदल करा.

माझी आधीची ऑर्डर XL - 42 होती, सुधारित फॉर्ममधे ती XL-44 अशी दिसते आहे. ती बदलून मला L - 42 करायची आहे. पण XL-44 समोरील बॉक्समधला '१' हा आकडा डिलीट करण्याचा प्रयत्न केला की फॉर्म क्लोज होऊन अवलोकनाचं पेज येतंय.
मी काय करू? आधीची ऑर्डर डिलीट करून नवीन ऑर्डर प्लेस करू का?

Pages