बंडखोर मी !

Submitted by रसप on 4 July, 2013 - 04:53

मनातले मी
कवितेमधुनी
मांडत असतो
असे सांगतो
जरी तुम्हाला
मलाच माहित
हे तर आहे
केवळ वरवर

आवड आहे
एकच मजला
प्रस्थापितता
मोडुन काढुन
बंड करावे
म्हणून लिहितो

जे जे दिसते
लोकमान्य अन्
पारंपारिक
ते ते सगळे
चूकच आहे
असे म्हणावे
म्हणजे येते
नजरेमध्ये
तेव्हढेच तर
मला पाहिजे

मला म्हणा हो
नव्या पिढीचा
कारण आहे
बंडखोर मी !
लिहितो केवळ
ठरण्यासाठी
बंडखोर मी..

....रसप....
४ जुलै २०१३

http://www.ranjeetparadkar.com/2013/07/blog-post_4.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली कविता. Happy

कडवे १,३,४ ह्यात आशयाची उपहासात्मक मांडणी जाणवली मात्र,
कडवे २ मध्ये आशय गंभीरतेने आणि प्रामाणिकपणे मांडल्याचे जाणवत आहे. Happy