Submitted by बागेश्री on 2 July, 2013 - 12:23
असमाधानाची जळमटे नाहीत
अस्वस्थतेची धूळ नाही..!
आठवणींचा बोचरा वारा नाही अन्
खारट पाण्याची डबकीही...... नाहीतच
गंजलेली शस्त्र नाहीत, की
जीर्ण झालेली वस्त्रदेखील.... नाहीत!
सगळं कसं स्वच्छ... नेटकं..
दारात सुबक रांगोळी..
सताड उघडी तावदानं,
नितळ सूर्यप्रकाश,
आत- बाहेर उनाड खेळता वारा..
फुलांचे सुवास,
सजीवतेचा मंगल भास..
छे!
हे माझं मन नसावंच....
परवा जाता जाता,
काही विसरून गेला आहेस का?
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खलास!
खलास!
मस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मस्त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
"बागेश्री" नावं वाचुन धागा उघडलेला आणि त्याचं सार्थक झालंच!
रच्याकने इथे मी "तो" म्हणजे पाऊस न घेता माझा सखा म्हणुन घेतला बरका
इतकी आवडली कविता की दोनदा
इतकी आवडली कविता की दोनदा पडला प्रतिसाद
रच्याकने जितक्यांदा कविता वाचली तितक्यांदा प्रतिसाद द्यायचा झाला तर कसं होणार माझ्यामुळे तुझ्या लेखनाचं
मस्तच
मस्तच
बागेश्री खूपच छान. खरंच सगळी
बागेश्री खूपच छान. खरंच सगळी जळमटं साफ झाली. प्रसन्न वाटलं
मस्त ग!
मस्त ग!
वा ! ..... छानच.
वा ! ..... छानच.
हे माझं मन नसावंच....>>> हे
हे माझं मन नसावंच....>>> हे माझं मनच नसावं अशी वाचली ही ओळ.
छान कविता, विशेषत: मांडण्याची शैली!
धन्यवाद... रियू, ह्यावेळी
धन्यवाद...
रियू, ह्यावेळी पावसाला उद्देशून नव्हतंच बरं हे, तू सही ट्रॅक पर है
विदिपा,
त्या "चं" मुळे खात्री व्यक्त झालीये ना?
ते माझं नसल्याचीच, खात्री!
बागेश्री, आपले वाक्य योग्यच
बागेश्री, आपले वाक्य योग्यच आहे. मी जरा वेगळा अर्थ निघण्यासाठी ती करामत केली इतकेच!
परवा जाता जाता, काही विसरून
परवा जाता जाता,
काही विसरून गेला आहेस का? ...खल्लास ग !
मी गंडलो या वेळी... शेवटचा
मी गंडलो या वेळी...
शेवटचा ट्विस्ट सुटला माझ्या नजरेतून. पण जिथपर्यंतची कविता मला पोहोचली..ती ही आवडलीच.
अतिशय आवडला शेवट, बागेश्री,
अतिशय आवडला शेवट, बागेश्री, झकास कविता!
छान गं. अगदी सुरेख
छान गं. अगदी सुरेख
जियो !!!! मी खल्लास !!!!!!!!
जियो !!!!
मी खल्लास !!!!!!!!
जबरदस्त
जबरदस्त
कित्ती सुंदर कविता! पुन्हा
कित्ती सुंदर कविता! पुन्हा पुन्हा वाचली. फारच खास!
उत्तम कविता. आवडली.
उत्तम कविता. आवडली.
बढिया. समीर
बढिया.
समीर
खूप सुंदर . परवा जाता
खूप सुंदर .
परवा जाता जाता,
काही विसरून गेला आहेस का? >> अप्रतिम.
सुंदर कविता.
सुंदर कविता.
वाह............ मस्तच
वाह............
मस्तच एकदम............. शेवटच्या वाक्याने तर कळसच गाठला..........
वाह!
वाह!
व्वा! सुंदर.
व्वा! सुंदर.
निशब्द
निशब्द
शेवट फारच क्लास!! कवितेच्या
शेवट फारच क्लास!!
कवितेच्या ढंगाला साजेसा....
मनापासून आवडली कविता..:)
धन्यवाद, दोस्तहो!
धन्यवाद, दोस्तहो!