मासे ४४) हेकरू

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 July, 2013 - 02:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

हेकरू मासे
हळद १ चमचा
२-३ चमचे रोजच्या वापरातला मसाला
चवीनुसार मिठ
तळण्यासाठी तेल
अर्ध्या लिंबाचा रस (ऑप्शनल)

क्रमवार पाककृती: 

हेकरू हा मासा चवीला तसा साधारण असतो. गुलाबी आणि राखाडी रंगाच्या छटा ह्या माशावर असतात. लहान पणी हा मासा आणला की आमचे चालू व्हायचे हे करू की ते करू ? Lol

१) हेकरू ची खवले, पर, शेपटी काढून, पोटातील टाकाऊ भाग काढून तुकड्या करुन घ्या व तिन पाण्यातून तिन वेळा स्वच्छ धुवून घ्या.

२) ह्या तुकड्यांना वरील तेल सोडून बाकीचे सर्व जिन्नस लावून घ्या.

३) गॅसवर तवा चांगला गरम करा नंतर त्यावर तेल टाका व त्यावर तुकडया शॅलो फ्राय करण्यासाठी सोडा.

४) गॅस मिडीयमच ठेवा व ५ मिनीटांनी पलटून दुसरी बाजू ३-४ मिनीटे शिजवून घ्या.

५) झाल का तुम्हाला ही रेसिपी वाचून हे करू की ते करु ? Lol

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी २ तुकड्या.
अधिक टिपा: 

ह्या माशाला तशी खवले खुपच नरम असतात. पटकन निघतात.

चवीला जरा कमीच असल्याने आल-लसुण, पेस्ट लावून रव्यात घोळून तळल्याने अधिक रुचकर लागेल.

मासे अगदी ताजे असतील तर आल-लसुण किंवा नुसत्या लसणीचा वापर तळण्यासाठी नाही केला तरी चालतो. त्यामुळे माशाची खरी चव कळते.

ह्याला पापलेट, बोईट वगैरे सारखाच मधला काटा असतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु तै ..
मस्तच आणि नवीन ..

बाकी एकदा मासा साफ कसा करायचा .. त्याची डीटेल टाक ना ..

शाकाहारी साठी ईईईई असेल तरी फार गरजेचे आहे ..मासे वाले प्रत्येक वे ळी योग्य करतात असा नाही..

जागू कुठुन शोधून आणतेस ग हे सगळे मासे ? आणि आमच्यासाठी फोटोसकट रेसिपी पोस्ट ही करतेस. ग्रेट आहेस.
मी बाजारात गेले की तुझे लेख वाचून एक एक ज्ञान पाजळत असते, कोळीणीं ना आच्छर्य वाटत असेल.

ए जागु तू टाकलेला तो पहिल्या फोटोतला तुकडा बघ की जरा निरखुन, त्या हेकरुचे दात दिसतायत का ते?:फिदी:

मी ही तेच म्हणणार होते की जागू कुठले कुठले नवीन मासे आणते शोधुन्.:स्मित: