Submitted by बेफ़िकीर on 19 June, 2013 - 12:47
साथ सोडुनी गेली शेवटी मनःशांती
भय मनात गर्दीचे भय मनात एकांती
काय काय सोडावे हे विचार सोडू... या
निर्णयाप्रती आलो पूर्णतः विचारांती
ते तुझ्याहुनी गोरे मानले सदा आम्ही
ज्या उन्हामुळे झाली सावळी तुझी कांती
जो दिसेल तो येथे धीट लोळ आगीचा
पण कधी न भ्याडांनो व्हायची इथे क्रांती
सांगुनी व्यथा घरच्या ते रजेवरी जाती
मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती
स्पष्ट कोसळे तो मी गोड बोलणे शिकलो
ऐन श्रावणामध्ये गाठलेस संक्रांती
माणसाळले प्राणी माणसे पशू झाली
रोज याइथे होते वेगळीच उत्क्रांती
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त लय अशी लय प्रथमच
मस्त लय अशी लय प्रथमच पाहिली
सर्व शेरात भरपूर नाविन्य आढळले
बरेच काही नवीन शिकायला मिळते आहे
अजून अनेकदा वाचावी लागणार आहे त्यामुळे प्रतिसाद आवरता घेतो
धन्यवाद बेफीजी
एक सांगायचे राहिलेच अख्खी गझल खूप आवडली
वेगळीच वाटतेय.
वेगळीच वाटतेय.
मस्तचै...
मस्तचै...
सांगुनी व्यथा घरच्या ते
सांगुनी व्यथा घरच्या ते रजेवरी जाती
मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती
माणसाळले प्राणी माणसे पशू झाली
रोज या इथे होते वेगळीच उत्क्रांती
गझलेत चमत्कृती इतक्या साधेपणाने आणता बेफिकीर !
सर्वच शेर
सर्वच शेर नाविन्यपूर्ण...
आवडली गझल.
छानं गझल ....
छानं गझल ....
गझलेची लय फार आवडली. ते
गझलेची लय फार आवडली.
ते तुझ्याहुनी गोरे मानले सदा आम्ही
ज्या उन्हामुळे झाली सावळी तुझी कांती>>> व्वा!
छान गझल बेफि, खयाल आवडले.....
छान गझल बेफि,
खयाल आवडले..... कवाफी/ रदिफ .. काही ठिकाणी फारच गद्य वाटले किंवा मिसर्यावर तसा प्रभाव वाटला.
उदा . निर्णयाप्रती आलो पूर्णतः विचारांती
पु.ले.शु!
सांगुनी व्यथा घरच्या ते
सांगुनी व्यथा घरच्या ते रजेवरी जाती
मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती
माणसाळले प्राणी माणसे पशू झाली
रोज या इथे होते वेगळीच उत्क्रांती
खुप आवडली..
खुप आवडली..
आवडेश
आवडेश
मतला, विचारांती, भ्रांती,
मतला, विचारांती, भ्रांती, संक्रांती..... एका वरचढ एक !
वा ! आवडली गझल.
शामच्या मताशी सहमत. रचनेला
शामच्या मताशी सहमत. रचनेला चौकट गझलेची आहे, पण एक एक ओळ गद्यच होत गेले आहे, असे वाटले.
उदा. निर्णयाप्रती आलो पूर्णतः विचारांती, ज्या उन्हामुळे झाली सावळी तुझी कांती, मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती.
पण चालायचंच....!
पुलेशु.
-दिलीप बिरुटे
मतला आणि मक्ता सर्वात विशेष
मतला आणि मक्ता सर्वात विशेष वाटले.
साथ सोडुनी गेली शेवटी
साथ सोडुनी गेली शेवटी मनःशांती
भय मनात गर्दीचे भय मनात एकांती
सांगुनी व्यथा घरच्या ते रजेवरी जाती
मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती
हे दोन शेर अधिक भावले.
प्रतिसाददात्यांचे आभार मानत
प्रतिसाददात्यांचे आभार मानत आहे. धन्यवाद!
साथ सोडुनी गेली शेवटी
साथ सोडुनी गेली शेवटी मनःशांती
भय मनात गर्दीचे भय मनात एकांती... हे खूप खूप आवडले..:) अगदी मनातले बोललात...:)
सांगुनी व्यथा घरच्या ते रजेवरी जाती
मी घरामधे नेतो नोकरीतल्या भ्रांती--:)
पु. ले. शु.