मायबोली टी-शर्ट २०१३

Submitted by टीशर्ट_समिती on 20 June, 2013 - 08:38

आले! आले!! आले!!!

यंदा परत एकदा 'मायबोली' टीशर्ट आले!

मधले एक वर्ष मायबोलीकरांना टी-शर्ट विना करायला लागलेल्या विरहाचे आनंदात रुपांतर करायला यंदा परत एकदा 'मायबोली टीशर्ट' आणि त्याबरोबरच 'मायबोली बॅग' उपलब्ध करून देण्यात आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

ह्या वर्षाच्या सुरुवातीला गाजलेल्या मायबोली शीर्षक गीतातील दोन ओळी यंदा टी-शर्ट वर असणार आहेत.. आणि त्याचे सुलेखन केले आहे पल्लीने.

गेल्या काही वर्षातील वाढती मागणी लक्षात घेऊन यंदा तीन प्रकारात टी-शर्ट असणार आहेत.

१. खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट. (चारकोल रंग)
collar NEW.jpg

२. राऊंडनेक टी-शर्ट (चारकोल रंग)
T shirt Men NEW.jpg

३. महिलांसाठी व्ही-नेक टी-शर्ट (मोरपंखी रंग)
T shirt Women dark blue.jpg

४. बॅग
bag IMG_20130601_180551 new  2.jpg

बॅगचा आकार - ९ इंच X ७ इंच X ४ इंच. बॅग खांद्यावर घेता येईल अशा पाऊच सारखी आहे.

राऊंडनेक व व्हीनेक टी-शर्ट वर पुढे सुलेखन असेल, डाव्या बाहीवर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेबसाईट अ‍ॅड्रेस असेल.

खिश्यासहीत कॉलर टी-शर्ट वर खिश्यावर मायबोलीचा लोगो असेल आणि मागच्या बाजूला मायबोलीचा वेब अ‍ॅड्रेस असेल.

लहान मुलांसाठी राऊंडनेक चारकोल रंगाचे आणि व्ही-नेक मोरपंखी रंगाचे टीशर्ट उपलब्ध आहेत.

लहान मुलांच्या टीशर्टसाठी अंदाजे साईज.
वय वर्षे १-२ साठी --> २२
वय ३-४ साठी --> २४
वय ५-६ साठी --> २६
वर ७-८ साठी --> २८
वय ९-१० साठी --> ३०
वय ११-१२ साठी --> ३२
आणि तिथून पुढे रेग्युलर साईज
(हे फक्त एक कोष्टक आहे जे शक्यतो मध्यम शरीरयष्टीच्या मुलांसाठी बरोबर ठरते. लहान मुलगा प्रत्यक्षात कसा आहे त्यानुसारच ऑर्डर नोंदवा.)

खिश्यासहीत कॉलर टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.३५०/-
राऊंड नेक व लेडिज टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-
लहान मुलांच्या टी-शर्टची देणगीसह किंमत असेल रु. २००/-
आणि बॅगची देणगीसह किंमत असेल रु.२५०/-

(महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक टीशर्टाच्या किंमतीचा काही भाग आपण एका उत्तम पार्श्वभूमी असलेल्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थेला देतो. त्यामुळे टीशर्ट घेऊन आपण खारीचा का होईना, पण समाजासाठी एक वाटा उचलत असतो.)

यंदाची देणगी प्रगती प्रतिष्ठान, जव्हार ह्या संस्थेस देण्यात येणार आहे. प्रगती
प्रतिष्ठानबद्दल आधिक माहिती पुढील दुव्यावर उपलब्ध आहे.

टीशर्टांचे पैसे भरण्याची माहिती थोड्याच दिवसात देण्यात येईल. तसंच, ज्यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचे शक्य होणार नाही, त्यांना आपण 'ऑनलाईन पेमेन्ट ऑप्शन'ही देत आहोत. ऑनलाईन पैसे भरणार असल्यास, फॉर्ममध्ये तसा पर्याय निवडा, मग पुढील डीटेल्स तुम्हाला कळवण्यात येतील.

आता तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, तेही त्वरीत- ते म्हणजे टीशर्टाची ऑर्डर नोंदवायची, कारण ४ जुलै, २०१३ ही ऑर्डर नोंदवण्याची शेवटची तारीख आहे.

ऑर्डर कशी नोंदवाल?-
इथे टिचकी मारुन

ऑर्डर फॉर्म मध्ये उपलब्ध असलेल्या साईज पेक्षा वेगळा साईज हवा असेल तर त्यासाठी वेगळा साईज असा पर्याय उपलब्ध आहे तिथे नोंद करावी. तसेच हव्या असलेल्या साईजच्या समोरील चौकोनात हव्या असलेल्या टी-शर्टची संख्या लिहावी.

टीशर्टची मापे पुढिलप्रमाणे:-

साईज-------रुंदी(2 L)-------उंची(H)
XXL-------46"-------33"
XL -------44"-------31.5"
L -------42"-------30"
M -------40"-------28.5"
S -------38"-------27"
XS -------36"-------25.5"
XXS-------34"-------24"

tshirt size.jpgफॉर्म भरण्यासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना -
१. साईजच्या समोर दिलेल्या चौकोनात तुम्हाला हव्या असलेल्या टीशर्टचा आकडा लिहिणे अपेक्षित आहे. तिथे परत साईज लिहू नये.
२. वेगळी साईज आणि त्या नंतर असलेला संख्या हा चौकोन हा उपलब्ध नसलेल्या साईज पैकी कुठला साईज हवा असेल तरच वापरायचा आहे. (उदा. लहान मुलांचे टी-शर्ट किंवा ४४ पेक्षा मोठा साईज असेल तर हा चौकोन वापरावा.)
३. कुठल्याही चौकोनात टोटल हवे असलेले टी-शर्ट लिहायची आवश्यकता नाही.
४. ऑर्डर सबमिट केल्यावर तुम्हांला त्याची पोच पावती तुमच्या मायबोली खात्याशी संलग्न असलेल्या मेलबॉक्स मध्ये मिळेल. ऑर्डर मध्ये बदल केल्यास पुन्हा मेल येणार नाही, परंतु तुमची ऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा आलेल्या मेल मधील लिंक मधे बघितल्यास बघता येईल.

महत्त्वाचे-
१. टीशर्ट 'राऊंड नेक' प्रकारचे आहेत. हे टीशर्ट अंगाबरोबर बसतात, याची कल्पना असेलच. तर हे लक्षात घेऊन टीशर्टाचा साईझ त्याप्रमाणे ऑर्डर करा.
२. यावर्षीही टीशर्ट देशाबाहेर पाठवले जाणार नाहीत. देशाबाहेरच्या मायबोलीकरांना देशातल्या मित्र/ नातेवाईक/ मायबोलीकर मित्रांकडून टीशर्ट घेता येतील.
३. पुणे-मुंबई आणि नाशिक मधील मायबोलीकरांशिवाय, भारतामध्ये इतरत्रही टीशर्ट पाठवता येतील. त्या मायबोलीकरांना मात्र टीशर्टाच्या किंमतीव्यतिरिक्त, पोस्टेजचा खर्चही द्यावा लागेल.
४. प्रत्यक्ष मिळणार्‍या वस्तूचा रंग फोटोत दिसणार्‍या वस्तूच्या रंगापेक्षा थोडासा वेगळा असू शकेल.

काही शंका असल्यास तुम्ही खालील सदस्यांना संपर्क साधू शकता.
१. विनय भिडे -
२. हिमांशु कुलकर्णी -

हे टीशर्ट आपल्याला आपल्या वर्षाविहारापर्यंत मिळणार आहेत!! वविला सर्व मायबोलीकर हे टीशर्ट घालून आले, तर काय धमाल येईल, कल्पना आली ना? Happy तर, झटपट ऑर्डर नोंदवा.

टीशर्टचे पैसे भरण्यासंदर्भातील सूचना

पुणे , मुंबई आणि नाशिक येथे ७ जुलै २०१३ या एकाच दिवशी टीशर्टचे पैसे जमा केले जातील.

टीशर्टचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: ७ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - नाशिकच्या मायबोलीकरांनी पैसे भरण्यासाठी मायबोली आयडी विदिपा म्हणजेच विजय दिनकर पाटील यांच्याशी ९८८१४९७१८७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्वरीत संपर्क साधावा.

नोंदणी केलेल्यांचे पैसे ७ जुलैच्या आत आले नाहीत तर नाईलाजास्तव ऑर्डर रद्द करावी लागेल.

टी शर्टस मिळण्यासंदर्भातली सूचना:-

टी शर्टस मिळण्याचे ठिकाण, तारीख आणि वेळ खालीलप्रमाणे:-

पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकीशेजारील कट्टा. वेळ: २१ जुलै २०१३, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २१ जुलै २०१२, सं. ५.३० ते ८.००
नाशिक - इथला तपशील लवकरच देण्यात येईल.

ज्यांनी पोस्टाने टीशर्टस मागवले आहेत त्यांना पोस्टेज खर्चाची माहिती लवकरच मेलने पाठविण्यात येईल. आणि ७ जुलैच्या आत त्यांचे टी शर्ट+पोस्टेजचे पैसे आले असतील तर त्यांना २१ जुलै नंतर टीशर्टस पाठविले जातील. टी शर्ट पाठविल्यावर तशी त्यांना संयोजकांकडून मेलही करण्यात येईल.

लोकहो, टी शर्ट संदर्भात काही चौकशी करायची असेल तर tshirt2013@maayboli.com या मेल पत्त्यावर मेल करून विचारा.

अत्यंत महत्त्वाची सूचना - ऑनलाईन पैसे भरणार्‍यांनी कृपया नवीन ऑर्डर्स करु नयेत. कारण योग्य वेळेत म्हणजेच ७ तारखेपर्यंत पैसे अकाऊंट मध्ये जमा होणे शक्य नाही..

प्रत्यक्ष पैसे भरणारे अजूनही ऑर्डर बुक करु शकतात. त्यांच्यासाठी ऑर्डर नोंदविण्याची मुदत ६ जुलै पर्यंत करण्यात आलेली आहे ह्याची कृपया नोंद घ्यावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवांतर :

टीशर्टला मराठीत टंगरखा ( = ट + अंगरखा) हा प्रतिशब्द कसा वाटतो? राउंड नेक व व्ही नेक यांना गोलमुंडी व खोलमुंडी हे प्रतिशब्द कसे वाटतात? Biggrin

-गा.पै.

अवो, लाँग विकेंड ला बिजी असणार ना आम्ही. मुदत थोडी जास्त द्या. १ आठवड्याने वाढवा. १४ जुलै करा प्लिज.

मुदत थोडी जास्त द्या. १ आठवड्याने वाढवा. १४ जुलै करा प्लिज....>>अनिलभाई, लोकांना वविला येताना टीशर्ट घालुन यायचय. त्यामुळे २१ जुलैला आपण टीशर्ट वाटप करतोय..त्याआधी टीशर्टस तयार करायला वेळ नको का? Happy त्यामुळे मुदत वाढवणं शक्य नाही..

ऑस्ट्रेलियात टीशर्ट मिळु शकतील! एक माबोकर पुढच्या महिन्यात जातोय .
फॉर्म भरताना 'नाशिक' कलेक्षन सेंटर घ्यावे आणि पैसे रोख रक्कम दिली जाईल असे लिहावे.
ऑर्डर दिल्यावर मला संपर्कातून कळवावे!

७ जुलैला मी मुंबईत नाही. पैसे आधीच दिले तर चालतील का? कुणाकडे , कसे द्यायचे?..>>>मिरा,तुम्ही ऑनलाईन पैसे भरणार असाल तर तुम्हाला ७ तारखेच्या आत कधीही पैसे भरता येतील.

टी शर्टचा रंग सुंदर आहे. मी नोंदणी केली आहे पण तो नाही बसला तर तिथे बदलून मिळेल का? कारण साईझ वेगवेगळ्या असतात ना !

बयो, टी-शर्ट तुम्ही दिलेल्या ऑर्डर नुसार बनवलेले असतात. त्यामुळे तुम्ही जी ऑर्डर केली असेल त्यात बदल शक्यतो होणार नाही. तुमचा टी-शर्ट दुसऱ्या कोणाला बसत असेल आणि त्याला तुमचा टी-शर्ट बसत असेल तर तशी अदलाबदली करता येईल.

केदार, प्रत्यक्ष पैसे भरणे शक्य नसल्यास आधी ऑन लाईन पैसे भरले तरी चालतील. तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठीचे डीटेल्स पाठवतो.

धन्यवाद हिम्सकूल ,
मी ४ तारखेपर्यंत पुण्यात कुणालाही भेटूनही पैसे देऊ शकतो . फक्त ५,६.७ चा प्रॉब्लेम आहे .

मला मैत्रीणिसाठी बॅगची ऑर्डर नोंदवायची आहे. पण तिथे फक्त टी-शर्ट चाच कॉलम आहे. बॅग असे कुठेच लिहिता येत नाही. शेवटच्या कॉलम मध्ये फक्त संख्या नोंदवता येते. मग कशी ऑर्डर द्यायची?

ओके. जमले एकदाचे. दिली ऑर्डर बॅगची. पण बॅगची ऑर्डर द्यायला त्या फोर्मवर गोंधळ उडतो हे नक्की. प्लिज जरा ते अधिक स्पष्ट करुन लिहा. आणि ऑर्डर दिल्यावर काय आणि किती ऑर्डर आपण दिली आहे हे लगेच दिसले तर जास्त बरे होइल.

मधुरिता, ऑर्डर दिल्यावर तुम्हाला केलेली ऑर्डर बघता येते. तसेच तुम्हाला मेलही येते. तिथे ऑर्डरची लिंक असते. त्या लिंक वर क्लिक केलेत तरी तुम्हाला तुमची ऑर्डर बघता येते.

ओह हो हो मिळाली इमेल. स्पॅम मधे गेली होती.
अलिकडे मला आलेल्या मायबोलीच्या सगळ्याच इमेल्स स्पॅममधे गेल्यात असे दिसतेय

बस्के, ते ही एकाच विक्रेत्याकडे सगळे गिर्‍हाईक जमा होतात तसे! Lol ' रांगेचा फायदा सर्वांना ' पाटी लावावी काय? Proud

Pages