निसर्गाच्या गप्पा (भाग - १५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 June, 2013 - 03:52

निसर्गाच्या गप्पांच्या १५ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

धुवाधार पावसाने निसर्ग पुर्ण हिरवागार, शांत केला आहे. निसर्गानेही पशु-पक्षांच्या, माणसांच्या अन्न-धान्याच्या, पाण्याच्या तरतूदीची सोय करण्यास सुरुवात केली आहे. आनंदी आनंद वातावरण काही ठिकाणी पसरले आहे तर उत्तरांचलसारख्या भागात निसर्गाचे संतुलनही ढासळले आहे. हजारो जीवांचा बळी त्या प्रलयात गेला आहे. त्या सर्व मृतात्म्यांना श्रद्धांजली.

आपले बरेचसे निसर्गमय आयडी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपाआपल्यापरीने खारीचा वाटा उचलतात मग तो त्यांचा छंद असो व निसर्गाविषयी आस्था. पण आता आपणही एक पण करुया आपल्याला जमेल तसे महिन्यातून, सहामहिन्यातून, किंवा वर्षातून एकदातरी प्रत्येकाने आपल्या घराभोवती किंवा आपल्या कॉलनीत किंवा रस्त्याच्या कडेला किंवा पटांगण किंवा गार्डन मध्ये एक तरी झाड लावायचे. झाड फळा फुलांचेच हवे असे काही नाही. आपल्याला जे उपलब्ध असेल ते लावू. बियाही रुजवू शकतो आपण त्या ठिकाणी. मागे काहींनी झाडांच्या बियाही जंगलात फेकल्या आहेत त्याची आता नक्कीच झाड झाली असणार. तो उपक्रम पुढेही आपण सगळेच चालू ठेऊया. तसेच ज्याला जमेल त्याने पावसाचे पाणी साठवण्याचा प्रयत्न करुया जेणेकरून आपल्याकडून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास काही अंशी मदत होईल.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf ३३) विपुलाच सृष्टी - प्रा. श्री अ दाभोळकर ३४) एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर ३५) आरण्यक - बिभुतीभुषण बंडोपाध्याय ३६) महाराष्ट्र दर्शन - गो. नि. दांडेकर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोलला माझा राजा तो एकदाचा !
१३/१४ जुलै तारखा सोयीच्या आहेत का ते सांगा. आणि जमल्यास साधनाला फोन करुन ती अंबोलीला १४ तारखेला असेल का ? ते जरा विचारून सांगा मला. मग मी ईमेल करतो.

उफ्फ दिनेशदा... यावेळीही चान्स हुकणार म्हणायचा माझा!
आमची स्टाफ ट्रीप चाल्लीये १२-१३-१४ दापोलीला. आणि बिग बॉसीण, बॉस अस्ल्याने आम्हा काही लोकांना कंपल्सरी केलय. Sad

सुदुपार,
जागु,गौरी
सर्व फोटो मस्तच आहेत.. आणि माणसाला त्यातुन शिकण्यासारखे आहे !

सध्या पुण्यात खुप दिवसातुन चक्क कडक ऊन पडले आहे ...

दिनेशदा,
आमचा तर या तारखांना ग्रीन सिग्नल आहे...

आर्या, १२ तारखेला संध्याकाळी मी असेन पुण्यात. फोनवर तरी बोलूच.
अनिल, मी करतो इमेल आज उद्या. साधनाच्या उत्तराची वाट बघतोय.

१४ ला मला जमेल आंबोलीला पण मी आता लगेच कंफर्म नाही करु शकत. उद्या किंवा परवा पर्यंत कंफर्म करु शकेन.

आणि दिनेशनी पाहिलेय माझे घर. जरी मी नसले तरी तुम्हा सगळ्यांचे तिथे स्वागत आहे. मी आज येतानाच काकाशी बोलुन आलेय की माझा मोठा ग्रुप येणार आहे जुलाय्मध्ये म्हणुन.

ओके साधना, मी वाट बघतो. फ्लेक्सिबल ठेवतो प्रोग्रॅम. म्हणजे ज्याला हवे तिथे जॉईन होता येईल.
अंबोलीला अनेक जणांना यायचे होते. आता करतोच इमेल सगळ्यांना.

दिनेशदा, माझी खूप इच्छा असूनही, जमेल की नाही काहीच सांगता येत नाही. माझ्या साहेबाच्या तेव्हाच्या मूडवर अवलंबून आहे. Uhoh

शोभे मी वाचले की तुला माझी सकाळी आठवण येते का ग?>>>>>>>>>.जागू आजच वाचलेस का? Uhoh
अग, ओळख बरं. दररोज सकाळीच का येत असेल. सोप्प आहे. Happy

जागू, ह्याचा पूर्ण फुललेल्या फुलाचा फोटो दे ना. बहुतेक मी२-३ दिवस ज्या फुलाचे नाव आठवण्याचा प्रयत्न करतेय तेच हे फुल आहे. Happy

शोभे मी वाचले की तुला माझी सकाळी आठवण येते का ग? >>>>

सडे "प्राजक्ता"चे नित्य उदयी अंगणी पडे
मंद सुगंधाचे वाटे शुभ्र ओतीयले कुणी घडे >>>> कळले का जागूमैया / प्राजक्ताबै Happy

अनंताच्या फुलाला कोकंणात चटकचांदणी असे अर्थपूर्ण नाव आहे.झाड फुलांनी बहरल्यावर चांदण्यांनी भरल्यसारखे वाटते.

अनंताच्या फुलाला कोकंणात चटकचांदणी असे अर्थपूर्ण नाव आहे.झाड फुलांनी बहरल्यावर चांदण्यांनी भरल्यसारखे वाटते.

सेम पिंच गं.... इथे ज्याला तगर म्हणतात त्याला कोकणात अनंत म्हणतात आणि इथल्या अनंताला चटकचांदणी. गेल्या आठवड्यात सावंतवाडीत फिरताना चटकचांदणीची झाडे अगदी पांढरी शुभ्र झालेली पाहिलि... इतका हेवा वाटला......

१३-१४ जुलै म्हणजे शनिवार्-रविवार आहे ना ! मी पुण्यातल्या गटगला नक्कीच येणार Happy

१३-१४ जुलै म्हणजे शनिवार्-रविवार आहे ना ! मी पुण्यातल्या गटगला नक्कीच येणार>>>>>>>>>>>>>>>???? मुंबईतपण असेल का? यायची फार - फार ईच्छा आहे.

सुप्रभात!

DSC_0346~1.jpg

या फुलाला टणटणी किंवा घाणेरी म्हणतो आपण. दुर्गा भागवतांनी याचे एक छान नाव सांगितलेले आहे कुठेतरी, कोणाला आठवतेय?

ह्या घाणेरीला गंधाली म्हणतात. काही ठिकाणी घंडाली,घंडाळी, घण्णाली,घण्णेली घण्णेरी,घंडेरी असे शब्दही ऐकले आहेत. दुर्गाबाईनी सांगितलेले नाव मात्र आठवत नाही.

सुप्रभात.
वर्षू खुपच सुंदर फोटो आहे.

सहेली ह्या घाणेरीमध्ये खुप रंग आहेत. मागच्या कुठल्यातरी भागात घाणेरीवर बरीच चर्चा झालि आहे.

Pages