Submitted by मयुरेश साने on 8 June, 2013 - 09:08
नयनांचे अन् आभाळाचे एकच हळवे उत्तर पाऊस
निश्वासाचे गंधीत वारे वसुंधरेचे अत्तर पाऊस
मखमल मखमल गार गालीचा देऊन जातो विणकर पाऊस
पान पान अन् कळी फुलांचे हिरवे हिरवे अस्तर पाऊस
एकसंध दिनरात बरसतो किती आपला असतो पाऊस
मना मनाच्या तळ्यात अपुल्या झर झर निर्झर झरतो पाऊस
तुझ्या नी माझ्या भेटीसाठी पुन्हा किती घुटमळला पाऊस
आस कोणती उरात त्याच्या सांग कुणाला कळला पाऊस
सरी सरी चे भान हरपले हिरवे हिरवे अक्षर गहिरे
शब्द शब्द कविता होताना पानातुन सळसळला पाऊस
उमलत जाते आत कुणीसे गोड गुलाबी स्वप्न कधीचे
तुझी आठवण चींब सरींची डोळ्यांमधुनी हळवा पाऊस
इंद्रधनुची कमान बांधत हिरव्या ठेचा खातो पाऊस
तुझे नी माझे नाते आणीक सहवासाची ओंजळ पाऊस
............ मयुरेश साने
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज खरोखर पडला पाऊस... हे भले
आज खरोखर पडला पाऊस...
हे भले मयुरेश ! लगे रहो
सहमत सुप्रियाशी. छानच.
सहमत सुप्रियाशी. छानच.
खूपच सुंदर........ आवडली....
खूपच सुंदर........ आवडली....
अतिशय सुंदर रचना ....
अतिशय सुंदर रचना ....
वाह! तुझ्या नी माझ्या
वाह!
तुझ्या नी माझ्या भेटीसाठी पुन्हा किती घुटमळला पाऊस
आस कोणती उरात त्याच्या सांग कुणाला कळला पाऊस
>>
आहाहा! क्या बात है !
उमलत जाते आत कुणीसे गोड
उमलत जाते आत कुणीसे गोड गुलाबी स्वप्न कधीचे
तुझी आठवण चींब सरींची डोळ्यांमधुनी हळवा पाऊस>>>>>>>>>>>>>> अगदी सुंदर मस्तच
वाह... फारच छान!!!!!!!
वाह... फारच छान!!!!!!!
छान कविता "सरी सरी चे भान
छान कविता
"सरी सरी चे भान हरपले हिरवे हिरवे अक्षर गहिरे
शब्द शब्द कविता होताना पानातुन सळसळला पाऊस
उमलत जाते आत कुणीसे गोड गुलाबी स्वप्न कधीचे
तुझी आठवण चींब सरींची डोळ्यांमधुनी हळवा पाऊस" >>>> या दोन द्वीपदी विशेष वाटल्या.
"इंद्रधनुची कमान बांधत हिरव्या ठेचा खातो पाऊस" >>> यातील 'हिरव्या ठेचा खाणे' हे नीटसे कळले नाही.
तुझ्या नी माझ्या भेटीसाठी
तुझ्या नी माझ्या भेटीसाठी पुन्हा किती घुटमळला पाऊस
आस कोणती उरात त्याच्या सांग कुणाला कळला पाऊस
इंद्रधनुची कमान बांधत हिरव्या ठेचा खातो पाऊस
तुझे नी माझे नाते आणीक सहवासाची ओंजळ पाऊस
>>>>>>>>>>....
व्व्वा क्या बात है
मस्तच
मस्तच रे !!
मस्तच रे !!
माझ्या मते प्रत्येक सानी ओळीत
माझ्या मते प्रत्येक सानी ओळीत 'पाउस' असं करावं लागेल.
सादरीकरणात उच्चारामुळे हा फरक लक्षात येत नाही.
(शेवटच्या कडव्यातल्या दोन
(शेवटच्या कडव्यातल्या दोन ओळींचा परस्परांमधला अर्थं मला लागत नाहीये... तरीही)
सुंदर.. सुरेख कविता.
अहाहा............नितांत सुंदर
अहाहा............नितांत सुंदर पाऊस अनुभवला तुझ्या कवितेतून.........मजा आ गया !!
तुझ्या नी माझ्या भेटीसाठी
तुझ्या नी माझ्या भेटीसाठी पुन्हा किती घुटमळला पाऊस
आस कोणती उरात त्याच्या सांग कुणाला कळला पाऊस
उमलत जाते आत कुणीसे गोड गुलाबी स्वप्न कधीचे
तुझी आठवण चींब सरींची डोळ्यांमधुनी हळवा पाऊस
>>>>>>>>> विशेष आवडल्या.
मस्तच कविता.
बहारदार कविता! पावसासारखीच!
बहारदार कविता! पावसासारखीच!
एकदम चिंब झाल्यासारखं वाटलं!
एकदम चिंब झाल्यासारखं वाटलं! मन पावसात भिजल्यासारखं ओलेतं हळवं झालं. अशा सुंदर कवितेला सलाम.
सुरेख कविता.
सुरेख कविता.
अफलातून !
अफलातून !
तुझ्या नी माझ्या भेटीसाठी
तुझ्या नी माझ्या भेटीसाठी पुन्हा किती घुटमळला पाऊस
आस कोणती उरात त्याच्या सांग कुणाला कळला पाऊस
सुरेख कविता !
तुझ्या नी माझ्या भेटीसाठी
तुझ्या नी माझ्या भेटीसाठी
यातला नी असा लिहिला जात नाही तो नि असा लिहिला पाहिजे.
हा एकमेव एकाक्षरी शब्द र्हस्व लिहिला जातो.
(र्हस्व यातला र मला पूर्ण दिसतो आहे. )
बाकी गझल छान आहे.
र्हस्व यातला र मला पूर्ण
र्हस्व यातला र मला पूर्ण दिसतो आहे.<<< मला तसा दिसत नहीये
आवडली मयुरेश
आवडली मयुरेश