तुझ्या नी माझ्या भेटीसाठी पुन्हा किती घुटमळला पाऊस...

Submitted by मयुरेश साने on 8 June, 2013 - 09:08

नयनांचे अन् आभाळाचे एकच हळवे उत्तर पाऊस
निश्वासाचे गंधीत वारे वसुंधरेचे अत्तर पाऊस

मखमल मखमल गार गालीचा देऊन जातो विणकर पाऊस
पान पान अन् कळी फुलांचे हिरवे हिरवे अस्तर पाऊस

एकसंध दिनरात बरसतो किती आपला असतो पाऊस
मना मनाच्या तळ्यात अपुल्या झर झर निर्झर झरतो पाऊस

तुझ्या नी माझ्या भेटीसाठी पुन्हा किती घुटमळला पाऊस
आस कोणती उरात त्याच्या सांग कुणाला कळला पाऊस

सरी सरी चे भान हरपले हिरवे हिरवे अक्षर गहिरे
शब्द शब्द कविता होताना पानातुन सळसळला पाऊस

उमलत जाते आत कुणीसे गोड गुलाबी स्वप्न कधीचे
तुझी आठवण चींब सरींची डोळ्यांमधुनी हळवा पाऊस

इंद्रधनुची कमान बांधत हिरव्या ठेचा खातो पाऊस
तुझे नी माझे नाते आणीक सहवासाची ओंजळ पाऊस

............ मयुरेश साने

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!

तुझ्या नी माझ्या भेटीसाठी पुन्हा किती घुटमळला पाऊस
आस कोणती उरात त्याच्या सांग कुणाला कळला पाऊस
>>
आहाहा! क्या बात है !

उमलत जाते आत कुणीसे गोड गुलाबी स्वप्न कधीचे
तुझी आठवण चींब सरींची डोळ्यांमधुनी हळवा पाऊस>>>>>>>>>>>>>> अगदी सुंदर Happy मस्तच Happy

छान कविता
"सरी सरी चे भान हरपले हिरवे हिरवे अक्षर गहिरे
शब्द शब्द कविता होताना पानातुन सळसळला पाऊस

उमलत जाते आत कुणीसे गोड गुलाबी स्वप्न कधीचे
तुझी आठवण चींब सरींची डोळ्यांमधुनी हळवा पाऊस" >>>> या दोन द्वीपदी विशेष वाटल्या.

"इंद्रधनुची कमान बांधत हिरव्या ठेचा खातो पाऊस" >>> यातील 'हिरव्या ठेचा खाणे' हे नीटसे कळले नाही.

तुझ्या नी माझ्या भेटीसाठी पुन्हा किती घुटमळला पाऊस
आस कोणती उरात त्याच्या सांग कुणाला कळला पाऊस

इंद्रधनुची कमान बांधत हिरव्या ठेचा खातो पाऊस
तुझे नी माझे नाते आणीक सहवासाची ओंजळ पाऊस
>>>>>>>>>>....

व्व्वा क्या बात है Happy
मस्तच

तुझ्या नी माझ्या भेटीसाठी पुन्हा किती घुटमळला पाऊस
आस कोणती उरात त्याच्या सांग कुणाला कळला पाऊस

उमलत जाते आत कुणीसे गोड गुलाबी स्वप्न कधीचे
तुझी आठवण चींब सरींची डोळ्यांमधुनी हळवा पाऊस

>>>>>>>>> विशेष आवडल्या. Happy
मस्तच कविता.

तुझ्या नी माझ्या भेटीसाठी पुन्हा किती घुटमळला पाऊस
आस कोणती उरात त्याच्या सांग कुणाला कळला पाऊस

सुरेख कविता !

तुझ्या नी माझ्या भेटीसाठी
यातला नी असा लिहिला जात नाही तो नि असा लिहिला पाहिजे.
हा एकमेव एकाक्षरी शब्द र्‍हस्व लिहिला जातो.
(र्‍हस्व यातला र मला पूर्ण दिसतो आहे. Sad )

बाकी गझल छान आहे.