ववि ववि ववि

Submitted by किरण कुमार on 26 June, 2013 - 03:01

पावसाळी माज, चढलाय आज,
सोडूनिया लाज , भटकाया .......

येरे येरे ववि,जाऊ जरा दूरी,
लावूनिया चावि,गाडीला त्या ......

जाउ मुरबाडी,करावया खोडी
भिजताना थोडी, पाण्यात या .......

मोरापरी नाच ,पोटालाही 'खा'च,
साफ करु काच,कॅमेराची............

माबोकर येती,ओलेचिंब होती
आठवण मोती.साठतसे..........

निघायाचे क्षण,जड जड मन
घराचेही भान ,ठेवताना ....

अशी ववि व्हावी,पावसाने नहावी
धाग्यांतूनी वहावी,मायबोली...........

(तटि: प्र काकांनी लावलेली चाल ऐकलीच पाहिजे अशी आहे
http://www.divshare.com/download/24251309-dfd

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काका - चाल मस्त आहे आणि आपला आवाजही

ववि म्हणजे वविच रे वैभव आणि काय असणार

योकु,राखी,देवकाका,सृष्टी,जिप्सी,पुश, वैकु,मुकू,भारती,किरण्य (नावबंधू),विप्र
धन्यवाद मित्रांनो,
Happy