(वविसाठी प्रोत्साहन आणि शुभेच्छा)

ववि ववि ववि

Submitted by किरण कुमार on 26 June, 2013 - 03:01

पावसाळी माज, चढलाय आज,
सोडूनिया लाज , भटकाया .......

येरे येरे ववि,जाऊ जरा दूरी,
लावूनिया चावि,गाडीला त्या ......

जाउ मुरबाडी,करावया खोडी
भिजताना थोडी, पाण्यात या .......

मोरापरी नाच ,पोटालाही 'खा'च,
साफ करु काच,कॅमेराची............

माबोकर येती,ओलेचिंब होती
आठवण मोती.साठतसे..........

निघायाचे क्षण,जड जड मन
घराचेही भान ,ठेवताना ....

अशी ववि व्हावी,पावसाने नहावी
धाग्यांतूनी वहावी,मायबोली...........

Subscribe to RSS - (वविसाठी प्रोत्साहन आणि शुभेच्छा)