निसर्गमय महाबळेश्वर (१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 24 June, 2013 - 12:35

मे महिन्याच्या अखेरीस हवापालट म्हणून महाबळेश्वरला ४ दिवसांसाठी गेलो. तसे आधीही ८ वर्षांपुर्वी २-३ वेळा गेले होते. तेंव्हाही तिथला निसर्ग आवडला होताच पण हल्ली निसर्गाच्या गप्पांमुळे निसर्गाच्या घटकांचा आस्वाद घेण्याचा, त्यातील बारकावे टिपण्याची नजर तिक्षण होऊन निसर्गाची अधीक गोडी लागली आहे त्यामुळे हे ४ दिवस महाबळेश्वरच्या सौंदर्याला दृष्टीत मावण्यास कमीच पडले. अगदी उगाच पॉइंट पहायची धावपळ न करता जिथे राहीलो तिथले सौंदर्य न्याहाळले व एक दिवस शेरबागेत घालवला.

१) सकाळी उठल्यावर स्वर्ग जमिनीवर उतरल्यासारखे वाटले. डोंगराला पुर्ण ढगांनी अच्छादले होते. ढग अगदी आमच्या बाल्कनीतून सुद्धा जात होते.

२)

३) हे पहाटेचे सूर्यदर्शन.

४)

५) सुर्योदयानंतर आमच्या हॉटेलच्या बाहेरील नजारा.

६)

७) ही हिरवाई जमिनीवर वाढलेय हे ओळखायला जमीनच दिसत नाही इतके घनदाट जंगल आहे.

८) आमचा सगळ्यात जास्त वेळ गेला तो हॉटेलवरच कारण आम्ही डिस्कव्हरी चॅनेलवर जसे सिन असतात तसे अनुभवत होतो पहिले दोन दिवस शेकरूंसोबत तर पुढचे दोन दिवस शेकरू + वानरांसोबत.

पहिल्या दिवशी अचानक बाल्कनीतून प्रथमच शेकरूची जोडी दिसली पण एकालापण कॅमेर्‍यात कैद करणे मुश्किल होते त्यांच्या चपळपणामुळे.


९)

१०) ही शेकरू आणि वानरे इतका धुमाकुळ घालत होती की फांद्यांवरून जांभळे टपाटप खाली पडायची त्याचा आवाज झाड वादळात हलल्याप्रमाणे भास व्हायचा. एक गंमत पाहीली ती म्हणजे शेकरूच्या मागेही साळूंख्या त्यांना मारायला धावत होत्या. बहुतेक ते शेकरू साळूंख्यांची अंडी खात असणार.

११) डिस्कव्हरी चॅनेल मध्ये पाहतो तसे आम्ही माकडांच्या बाबत इथे अनुभवले मोठे मोठे वानर इकडून तिकडून नुसते उड्या मारत होते. एक तर आमच्या बाल्कनीत येणार होता तेवढ्यात मी दरवाजा लाऊन घेतला.

१२)

१३)

१४) माकडाचे बाळ.

१५) ज्या झाडांवर ही सेना होती त्या झाडाला लगडलेली ही जांभळे. जांभळे आकाराने लहान होती.

१६)

१७) त्याच्याच बाजूला वेगळ्या फळांचे झाड होते. त्या फळांना सगळे जांभळाचेच झाड म्हणत होते. पण शोधक नजर व कॅमेर्‍याने त्या दोघांतील फरक ओळखला ती फळे पिकून फक्त लाल होत होती.

१८) येथील सगळ्या झाडांवर मॉस आहे.

१९) ह्याला कसाबसा टिपला. Happy

२०) हे काय आहे ते ओळखा.

महाबळेश्वरमधील थंड वातावरणामुळे तिथे फुलांच्या विविध जाती व रंग अगदी मन मोहून घेतात. प्रत्येक हॉटेलच्या समोर विविध आकर्षक फुलझाडे फुलांनी बहरलेली दिसतात. ती पुढील भागात टाकते.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेकरु छानच मिळालेत .दुसरी जी लहान फळे आहेत त्यातीलच एक दोन शेकरु खातात आणि पुढे जातात .माथेरानला अंजनीच्या झाडाला हिरवे मिरीसारखे घोस येतात ते खातात .पावसाळयात मात्र ही फळे नसतात तेव्हा शेकरु दुसऱ्या खाद्याच्या शोधात रानात दूर जातात .

जागु....... फार्र्च सुरेख्,गारेगार फोटोज..
शेकरु चं इंग्लिश नांव काय आहे???
शेवटचा फोटो , रगडा पॅटिस चाहे??? वॉव..किती आर्टिस्टिक!!!

जागु..,' क्षेत्र महाबळेश्वर' ला भेट दिलीस कि नाही???

मस्त घुमावदार रस्ते,दोन्ही बाजूला भरगच्च झाडी आणी तेथील पंचगंगा मंदीर सुपर पाहणेबल!!!

सुंदर प्रचि! Happy

महाबळेश्वरला जाऊन य वर्ष झालित....

तो शेवटचा फोटो भारी आहे... पदार्थ सजावट कल्पकतेला सलाम!

मस्त फोटो आलेत सगळेच, शेकरूचा भारीच आहे. महाबळेश्वरात शेकरू दिसलं नशीबवान आहात.

तिथल्या सगळ्याच झाडांवर हे मॉस असतं आणि एरवी मस्त दिसणारी ही झाडं खूप पाऊस असताना, ढग उतरून आल्यावर अंधारलेलं असताना भयानक वाटतात.

शेकरु दिसण ही भाग्याची गोष्ट.
<<
<<
पर्यटकांसाठी कदाचीत ही भाग्याची गोष्ट असु शकते. पण स्थानिकाना काय भयंकर त्रास देतात हे प्राणी. त्यात ह्यांना सरकारकडुन संरक्षणही मिळालेय महाराष्ट्र राज्याचा प्रतिक प्राणि म्हणून.

हिमस्कुल, जुई बरोबर तो रगडाच आहे. कोथिंबीर आणि टोमॅटो चिकटवून भैया ने त्याची अशी सुंदर सजावट केली होती.

सुयोग, मिरा, तुपशी हॉटेलच नाव साई हेरीटेज. मार्केट पासुन थोड आत आहे.

सुमंगल, भाऊ, कांदापोहे, विजय, जिप्सि, किशोर, शशांक, जो.एस, झाकासराव, मानुषी, इंद्रा, किशोर, सृष्टी धन्यवाद.

एस.आर.डी. धन्यवाद. खरच माहीती वाचून आनंद झाला.

वर्षू गेले होते श्री क्षेत्र महाबळेश्वरला. छानच आहे.

Pages