असा हि मुजरा शिवरायांना ,३४०वा शिवराज्याभिषेकसोहळा २०१३

Submitted by मी दुर्गवीर on 23 June, 2013 - 09:40

जय शिवराय रायगड 21 जून : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आज सकाळी सहा वाजता ध्वजारोहण केल्यानंतर सुरू झाला. सप्तगंगा स्नान, पंचगंगा स्नान, शत्रपूजन अशा विधींनी शिवकालीन स्मृतींना उजाळा दिला गेला. सामूहिक शिवआरती पठणानं गडावरचं वातावरण अगदी शिवमय होऊन गेलं होतं.

शिवललकारी, पोवाडे, शाहिरी नमन, मैदानी खेळ असे इतिहास जागवणारे विविध प्रकार रायगडावर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर निघालेल्या पालखी मिरवणुकीतल्या वाद्यांच्या गजरानं रायगड दुमदुमून गेला होता. सर्वत्र आनंदी वातावरण

तसेच ३४० शिवराज्याभिषेकसोहळा, रायगडी मोठ्या उत्सहात पार पडला तसेच दुरवीर ने आपल्याच वेगळ्या पद्धतीने हा सोहळा पार पडला .दुर्गवीर चे मावळे गडावर आणि श्रमदान नाही असे कधीच होणार नाही दुर्गवीरच्या शिलेदारांनी देशमुख खाणावळीतील सभोवतालचा संपूर्ण परिसर हा दुर्गवीर च्या मावळ्यांनी पडलेले कागदी ताट, प्लास्टिक च्या बाटल्या आणि इतर अस्तव्यस्त पडलेले कचरा (आणि मुख्य म्हणजे मद्य प्राशनाच्या बाटल्या) मुसळधार पाऊसाची तमा न बागळता हा सर्व कचरा एकत्र करून एका जागी ठेवण्यात आला व महाद्वारावर बिरुदावली देऊन दुर्गवीरच्या शिलेदारांनी रायगडचा निरोप घेतला …

स्वच्छता करतांना दुर्गवीर शिलेदार ….
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

सभोताली जमलेला कचरा
5.jpg

सतत पडणार्या पाऊस पडून देखील दुर्गवीर त्याच जोमाने आपले कार्य करत होते
7_0.jpg11.jpg10_0.jpg13.jpg14.jpg

सतत पडणार्या पाऊस पडून देखील दुर्गवीर त्याच जोमाने आपले कार्य करत होते
15.jpg16.jpg

मी एक दुर्गविर
17.jpg

स्वच्छ केलेला परिसर
18.jpg

स्वच्छ केलेला परिसर
19.jpg

स्वच्छ केलेला परिसर
20.jpg

__/\__ धन्यवाद नितीन पाटोळे 8655823748

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुपच प्रशंसनीय.

थोडी आगावू वाटेल, पण एक इच्छा :- कचरापेट्या उपलब्ध नसतील तर त्या करुन देता येतील का?